सांगोला तालुक्यातील बागलवाडी मतदान केंद्रावर एक अनुचित प्रकार घडला. एका युवकाने मतदान केल्यानंतर ज्वलनशील पदार्थ मतदान मशीन वर टाकून पेटवण्याचा प्रत्यन केला. मात्र मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांनी सतर्कता दाखवत त्या युवकाला पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र या घटनेनंतर तातडीने दुसरे मतदान मशीन दिले. पहिल्या मतदान मशीनमध्ये झालेले सर्व मतदान सुरक्षित आहेत अशी माहिती सांगोला विधानसभेचे सहाय्यक निवडणूक अधिकारी अमित माळी यांनी दिली.

माढा लोकसभा अंतर्गत सांगोला तालुक्यात सकाळपासून मतदान शांततेत सुरू होते. मात्र दुपारी तालुक्यातील बागलवाडी या मतदान केंद्रावर एक अनुचित प्रकार घडला. या मतदान केंद्रावर दादासो मनोहर तळेकर हे मतदान करण्यासाठी गेले. त्यांनी मतदानाची प्रक्रिया पूर्ण करून मतदान केले. त्या नंतर त्यांनी खिशातून एक बाटली काढली आणि त्याने खिशातील बाटलीतील ज्वलनशील पदार्थ काढून मतदान मशीनवर टाकून ती पेटवून दिली. हि बाब उपस्थित कर्मचाऱ्याच्या निदर्शनास आल्यावर तात्काळ मशीनवर पाणी टाकले. त्यावेळेस तळेकर हे पळून जात होते. मात्र मतदानासाठी आलेले नागरिक आणि पोलिसांनी तातडीने त्याला पकडले. मात्र या प्रकारामुळे मतदान थांबविण्यात आले. बागलवाडी मतदान केंद्र प्रमुखांनी या घटनेची माहिती तातडीने वरिष्ठांना दिली.

Ajit pawar and sharad pawar (1)
“माझ्या वडिलांना कोणत्या आजारावर उपचार करायला नेलं होतं?”, अजित पवारांचा शरद पवारांना थेट प्रश्न
prithviraj chavan loksabha election 2024
“या निवडणुकांनंतर महाराष्ट्रात दोन पक्ष लोप पावतील”, पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा दावा; म्हणाले, “या पक्षांमधली माणसं…”
uddhav thackeray viral video
शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना बाहेर जायला सांगितलं, ठाकरेंनी हात जोडले अन्..; भाजपाने शेअर केला ‘तो’ VIDEO
What Ajit pawar Said?
अजित पवार यांनी शरद पवारांच्या आरोपांना दिलं उत्तर, “मी जर इतका भ्रष्टाचारी, नालायक आणि…”
narendra modi
“मुस्लिम समुदायाला पहिल्यांदाच सांगतोय, त्यांनी आता…”, आरक्षणाबाबत पंतप्रधान मोदींकडून भूमिका स्पष्ट
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
devendra fadnavis sharad pawar
“मला उद्ध्वस्त करण्यासाठी…”, ‘त्या’ आंदोलनाचा उल्लेख करत फडणवीसांचा शरद पवारांवर गंभीर आरोप
ajit pawar narendra modi
नरेंद्र मोदींच्या शरद पवारांवरील ‘अतृप्त आत्मा’ टीकेवर अजित पवार म्हणाले, “मी पुढच्या सभेत मोदींनाच…”

मतदान प्रक्रिया सुरळीत, मतेही सुरक्षित

त्या नंतर एक तातडीने मतदान मशीन त्या केंद्रावर पाठविण्यात आले. त्या ठिकाणी सर्व प्रक्रिया पूर्ण करून मतदान पुन्हा सुरळीत करण्यात आले. बागलवाडी मतदान केंद्रावर १३०२ एकूण मतदार आहेत. हि घटना होण्यापूर्वी ४१० मतदान झाले होते. अर्धवट जळालेले मशीन तपासले असता त्यातील झालेले सर्व मतदान सुरक्षित आहेत. तसेच ते मशीन देखील वापरण्या योग्य आहे. मात्र मतदान प्रक्रिया सुरु रहावी. या साठी त्या मतदान केंद्रावर तातडीने दुसरे मशीन पाठवून दिले. आणि पुन्हा मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला अशी माहिती सांगोला विधानसभेचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अमित माळी यांनी दिली. दरम्यान , तळेकर यांनी या वेळी घोषणा दिल्या होत्या असे स्थानिक आणि मतदान केंद्रातील उपस्थित नागरिकांचे म्हणणे आहे. या प्रकरणी पोलिसांनी तळेकर यांना ताब्यात घेतले असून त्याचा पुढील तपास पोलीस करीत आहेत. असे असले तरी या घटनेने खळबळ उडाली आहे