महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या ठाकरे गटाने आज लोकसभेसाठी पहिली यादी जाहीर केली आहे. या पहिल्या यादीत १७ उमेदवारी जाहीर केले आहेत. या यादीमध्ये ज्या जागांवर काँग्रेस पक्षही आग्रही होता, तिथेही ठाकरे गटाने उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत आता रस्सीखेच पाहायला मिळत आहे. दरम्यान, काँग्रेसने दावा केलेल्या सांगली लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाने उमेदवार दिला असल्याने महाविकास आघाडीत अंतर्गत नाराजी निर्माण झाल्याची चर्चा आहे. यावरून उमेदवार चंद्रहार पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते टीव्ही ९ मराठीशी बोलत होते.

सांगली लोकसभा मतदारसंघात सध्या भाजपाचे संजय पाटील खासदार आहेत. तर, काँग्रेसने या जागेवरून आता दावा केला होता. त्यामुळे महाविकास आघाडीत वाद निर्माण झाला होता. चंद्रहार पाटील यांनी नुकतेच ठाकरे गटात प्रवेश केला होता. प्रवेश केल्यानंतर दोनच दिवसांत उद्धव ठाकरेंनी सांगलीत जाऊन त्यांची उमेदवारी जाहीर केली होती. तर, आज (२७ मार्च) संजय राऊतांनी अधिकृतरित्या त्यांची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे महाविकास आघाडीत काँग्रेस आता शिवसेनेला मदत करणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Ramtek Lok Sabha seat, rasmi barve Caste Certificate, Caste Certificate Controversy, raju parve Nomination Displeasure, favours congress, Challenges Shiv Sena, eknath shinde shivsena, lok sabha 2024, politics news, election news, marathi news
रश्मी बर्वे यांना मिळणाऱ्या सहानुभूतीमुळे शिवसेनेपुढे आव्हान; रामटेक लोकसभा मतदारसंघाचे चित्र
Forest Minister Sudhir Mungantiwar controversial statement while criticizing Congress got trolls on social media
काँग्रेसवर टीका करताना वनमंत्री मुनगंटीवारांची जीभ घसरली, समाजमाध्यमांवर ट्रोल
Former Congress president Rahul Gandhi filed his candidature from Wayanad in Kerala
वायनाडमध्ये शक्तिप्रदर्शनासह राहुल गांधी यांचा अर्ज; अमेठीमधून उमेदवारीबाबत मौन
Ayodhya Paul and uddhav thackeray
अयोध्या पौळ यांच्या ‘त्या’ पोस्टमुळे कल्याणच्या उमेदवारीची चर्चा; नंतर खुलासा करत म्हणाल्या…

हेही वाचा >> लोकसभेसाठी शिवसेना ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर, राजन विचारे, चंद्रहार पाटील यांना संधी

“उमेदवारी जाहीर झाल्यानंतर चंद्रहार पाटील म्हणाले, महाविकास आघाडीतून आम्ही एकत्र काम करू. माझी उमेदवारी घोषित होण्याआधीच सांगितलं होतं की आम्ही एकसंथपणे पाठीमागे राहून महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी करू”, असं चंद्रहार पाटील म्हणाले.

“ही जागा राजू शेट्टींची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ही जागा होती. परंतु, ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मिळाली. त्यामुळे आम्ही महाविकास आघाडीत एकत्र काम करू आणि विजय खेचून आणू”, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पाटलांना आपल्याला दिल्लीत पाठवायचं आहे – ठाकरे

भाजपच्या संजय पाटील यांनी मागील लोकसभा निवडणुकीत एक लाख ६४ हजार मतधिक्याने बाजी मारली होती. त्यांचा सामना करण्यासाठी महाविकास आघाडीने तयारी सुरू केली आहे. दोन वेळा महाराष्ट्र केसरी राहिलेले कुस्तीगीर चंद्रहार पाटील यांनी ११ मार्च रोजी मातोश्रीवर ठाकरे गटात प्रवेश केला. ‘त्यांची उमेदवारी लोकांनी जाहीर केली आहे. त्यामुळे पाटील यांना आपल्याला दिल्लीत पाठवायचे आहे,’ असे सांगून ठाकरे यांनी पाटील उमेदवारी जाहीर केली.

शिवसेना ठाकरे गटाकडून १७ नावं जाहीर

१) नरेंद्र खेडकर-बुलढाणा
२) संजय देशमुख-यवतमाळ-वाशिम
३) संजोग वाघेरे पाटील-मावळ
४) चंद्रहार पाटील-सांगली
५) नागेश आष्टिकर-हिंगोली
६) चंद्रकांत खैरे-छत्रपती संभाजी नगर
७) ओमराजे निंबाळकर-धाराशिव
८) भाऊसाहेब वाघचौरे-शिर्डी
९) राजाभाऊ वाजे-नाशिक
१०) अनंत गीते-रायगड
११) विनायक राऊत-सिंधुदुर्ग, रत्नागिरी

१२) राजन विचारे-ठाणे
१३) अनिल देसाई- मुंबई दक्षिण मध्य
१४) संजय दिना पाटील-मुंबई ईशान्य
१५) अरविंद सावंत-मुंबई दक्षिण
१६) अमोल किर्तीकर-मुंबई वायव्य
१७) संजय जाधव-परभणी