पंजाबसह देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका आहेत. दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नवी मोहीम सुरू केली आहे. मुख्यमंत्री केजरीवाल यांनी एक मौका केजरीवाल को या नावाने मोहीम सुरू केली आहे. दिल्लीत केजरीवाल असल्याने काय फायदा झाला हे इतर राज्यातील लोकांना व्हिडीओच्या माध्यमातून सांगा, असे अरविंद केजरीवाल म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“दिल्लीत मोठा बदल झाला आहे कारण दिल्लीच्या जनतेने आम्हाला एक संधी दिली, आता हा बदल संपूर्ण देशात आला पाहिजे. एक मौका केजरीवाल को अंतर्गत दिल्लीचे लोक इतर राज्यातील लोकांना आप सरकारने केलेल्या चांगल्या कामाबद्दल सांगणारा व्हिडिओ बनवू शकतात आणि निवडणुकीपूर्वी आपला संधी देण्याचे आवाहन करू शकतात. दिल्ली सरकारची कोणती कामे चांगली होती आणि त्यांचा किती फायदा झाला हे या व्हिडिओंमध्ये लोकांनी सांगावे,” असे केजरीवाल यांनी सांगितले.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, “दिल्लीच्या जनतेने स्वतःचा व्हिडिओ बनवावा आणि इतर राज्यांतील लोकांना दिल्लीत कोणती चांगली कामे झाली हे सांगावे. दिल्लीत मोहल्ला क्लिनिक उघडल्याचा तुम्हाला कसा फायदा झाला? अरविंद केजरीवाल यांच्या येण्याचा तुम्हाला काय फायदा झाला ते तुम्ही व्हिडिओच्या शेवटी सांगा आणि हा व्हिडिओ तुमच्या सोशल मीडिया हँडलवर अपलोड करा.”

“देशातील पाच राज्यांमध्ये निवडणुका आहेत. तुमचे नातेवाईक यापैकी कोणत्याही राज्यात राहत असतील तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा आणि तुमच्या राज्यातील निवडणुकीत आम आदमी पक्षाला मतदान करण्याचे आवाहन करा. तरच त्यांनाही दिल्लीसारख्या सुविधा मिळू शकतील,” असे केजरीवाल म्हणाले. मी आम आदमी पक्षाच्या स्वयंसेवकांनाही आवाहन करतो की, ‘एक मौका केजरीवाल को’ मोहिमेचे त्यांनी सोशल मीडियावर जास्तीत जास्त शेअर करावेत, असेही केजरीवाल म्हणाले.

निवडणुकीनंतर सोशल मीडियावर सर्वाधिक व्हायरल होणार्‍या ५० दिल्लीकरांना मी फोन करेन आणि त्यांच्यासोबत जेवण करणार आहे, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delhi cm arvind kejriwal campaign ek mauka kejriwal ko for assembly polls abn
First published on: 24-01-2022 at 15:32 IST