लोकसभा निवडणुकीचा हंगाम सुरू आहे. देशभरातील कानाकोपऱ्यातून हजारो लोक देशाच्या संसदेत जाण्यासाठी उत्सूक आहेत. काही जणांना मान्यताप्राप्त पक्षाकडून तिकीट मिळतं, तर काही जण अपक्ष उभे राहून आपला झेंडा रोवतात. देशात असेही काही लोक आहेत. जे वर्षानुवर्ष निवडणूक लढवत आहेत, मात्र त्यांना यश काही लाभलेलं नाही. ७८ वर्षीय हसूनराम आंबेडकरी त्यापैकीच एक आहेत. १९८५ पासून अपक्ष निवडणूक लढविण्याची सुरूवात करून २०२४ पर्यंत त्यांनी तब्बल ९८ वेळा निवडणूक लढविली आहे. यंदा त्यांनी दोन ठिकाणाहून उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यामुळे हसनूराम पराभवाचे शतक करणार का? याबद्दल चर्चा होत आहेत.

मनरेगा योजनेत मजूर म्हणून काम करणारे हसूनराम माध्यमांशी बोलताना म्हणाले की, मला माहितीये की यावेळीही मी दोन्ही जागांवर पराभूत होणार आहे. पण मी १०० वेळा निवडणूक लढवू इच्छितो, हे माझं ध्येय आहे. त्यानंतर मी निवडणूक लढविणार नाही. आग्रा जिल्ह्यातील खेरागड तालुक्यातील रहिवासी असलेल्या आंबेडकरी यांनी १९८५ साली खेरागड विधानसभा मतदारसंघातून बहुजन समाज पक्षाच्या उमेदवाराविरोधात अपक्ष निवडणूक लढविली होती. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा आग्रा आणि फतेहपुर सिक्री या दोन मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hasnuram ambedkari lost election 98 times this time contest again kvg
First published on: 16-04-2024 at 16:15 IST