दिल्लीतील नेत्यांमध्ये मागच्या चार वर्षात विविध संभाषणात “डॉ. रमण सिंह कुठे गायब झालेत?” हा प्रश्न वारंवार विचारला गेला. २००३ ते २०१८ असा दीर्घकाळ छत्तीसगडचे नेतृत्व करणारा नेता अचानक कुठे गेला? सार्वजनिक मंचावरून ते अचानक नाहीसे झाले. छत्तीसगडमधील राजनंदगाव या घरच्या विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिल्यानंतर रमण सिंह पुन्हा चर्चेत आले आहेत. पहिल्या टप्प्यात ७ नोव्हेंबर रोजी या मतदारसंघात मतदान संपन्न होणार आहे.

रमण सिंह यांच्यासमवेत तीन टर्म मंत्रिपदाची धुरा सांभाळणाऱ्या अनेक सहकाऱ्यांनाही या निवडणुकीत भाजपाकडून तिकीट देण्यात आले आहे. राजनंदगाव मतदारसंघासाठी पक्षाकडे दुसरा चेहरा नाही, त्यामुळे रमण सिंह यांनाच पुन्हा उमेदवारी देण्यात आली. तसेच जर यदाकदाचित भाजपा सत्तेत आल्यास त्यांच्याकडे मुख्यमंत्रिपदासाठी दुसरा मोठा नेता नाही, त्यामुळे रमण सिंह पुन्हा एकदा या खुर्चीवर आरूढ होऊ शकतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Narendra Modi, Sanjay Singh,
पंतप्रधान नरेंद्र मोदी पराभवाच्या भीतीने बावचळले, खासदार संजय सिंह यांचा आरोप
Pimpri, eknath shinde, eknath shinde latest news,
पिंपरी: मुख्यमंत्री आले अन् काहीही न बोलता निघून गेले…
Dhule District Congress President,
धुळे जिल्हा काँग्रेस अध्यक्षांचा राजीनामा देण्याचे कारण काय ?
dekhi cabinet minister raajkumar anand
‘आप’ला धक्का! ईडीच्या छाप्यानंतर केजरीवाल सरकारमधील दलित मंत्र्याचा राजीनामा, कोण आहेत राज कुमार आनंद?

हे वाचा >> ‘अदाणी आणि खाणीच्या खासगीकरणामध्ये मी उभा आहे’, मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचा भाजपावर प्रहार

विनम्र, मितभाषी असलेल्या रमण सिंह यांच्या राजनंदगाव येथील सन सिटी शहरातील निवासस्थानी निवडणुकीची लगबग जोरात सुरू आहे. या प्रचाराच्या धामधुमीत द इंडियन एक्स्प्रेसच्या ज्येष्ठ राजकीय पत्रकार नीरजा चौधरी यांनी माजी मुख्यमंत्री रमण सिंह यांच्याशी संवाद साधला आणि थेट प्रश्न विचारले. या मुलाखतीचा भाग प्रश्नोत्तराच्या स्वरुपात खालीलप्रमाणे :

प्रश्न : भाजपा सत्तेत आल्यास छत्तीसगडचा मुख्यमंत्री कोण असेल?

रमण सिंह : कुणाकडे नेतृत्व द्यायचे हे पक्ष ठरवेल. निवडणुकीनंतर विधानसभेत भाजपा पक्षाच्या आमदारांची बैठक होते, त्यातून मुख्यमंत्री निवडला जातो. २००३, २००८ आणि २०१३ साली हेच करण्यात आले.

प्रश्न : तुमच्याबद्दल पक्षाचे काय मत आहे?

रमण सिंह : जर पक्षाने मला पुन्हा एकदा संधी दिली, तर माझी ना नाही. पण, माझ्या बाजूने मुख्यमंत्रिपदासाठी माझा आग्रह नाही.

प्रश्न : तुमच्या अनेक सहकाऱ्यांना पक्षाने तिकीट दिले आहे, त्यामुळे तुम्हीच व्हाल अशी अटकळ…

रमण सिंह : पक्षाने उमेदवारांची क्षमता पाहून तिकीट दिलेले आहे, माझ्या सांगण्यावरून नाही.

प्रश्न : यावेळी छत्तीसगडमध्ये काँग्रेस विरोधात लढण्यासाठी भाजपाकडे स्पष्ट असा मुद्दा नाही, असे सांगितले जात आहे?

रमण सिंह : आमच्या जाहीरनाम्यात सर्व काही मुद्दे समाविष्ट केलेले असतील. काँग्रेसने हजारो कोटींचे घोटाळे केले आहेत. महादेव बेटिंग घोटाळ्यात ईडीकडे पुरावे आहेत. इतर भ्रष्टाचार आणि मद्य धोरण घोटाळ्याबाबत आम्ही सरकारवर तुटून पडलो. काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी छत्तीसगडला लुबाडण्याचे काम केले आहे.

हे वाचा >> Chhattisgarh : नक्षलग्रस्त बस्तरच्या अबूझमाडमध्ये ७ नोव्हेंबर रोजी मतदान; निवडणूक यंत्रणेसमोर आव्हान?

प्रश्न : पाच वर्षांपूर्वी तुमचा पराभव का झाला?

रमण सिंह : लोकांना वाटले आता सरकार बदलून पाहू आणि त्यांनी आमचा पराभव केला. त्यामुळे भूपेश यांना लाभ झाला.

प्रश्न : जर तुम्ही सत्तेत आलात, तर पहिला निर्णय कोणता घ्याल?

रमण सिंह : सर्वात आधी स्पष्ट करतो, पक्षाने मलाच मुख्यमंत्री करायचे असे काही ठरविलेले नाही. पण मी एक सांगू इच्छितो की, आमचे सरकार राज्यात १६ लाख घरांची बांधणी करेल, जी भूपेश बघेल यांनी मागच्या पाच वर्षात केलेली नाही. ज्या लोकांना घर नाकारले गेले आहे, त्यांनाही आम्ही घर देऊ.

प्रश्न : इतर पक्षांशी जुळवून घेऊन काम करण्याबाबत तुमची ख्याती आहे. युपीएच्या काळातही तुम्ही केंद्राशी समन्वय ठेवून काम केले होते.

रमण सिंह : मला त्यात काही गैर वाटत नाही. राजकारणात कुणी शत्रू असतो, असे मी मानत नाही. आता राज्यात आणि केंद्रात डबल इंजिनचे सरकार असेल तर नक्कीच त्याचा लाभ होतो. यावेळी छत्तीसगडमध्ये भाजपाचा बहुमताने विजय होईल आणि सरकार स्थापन करण्यात कोणतीही अडचण येणार नाही, हे तुम्ही आताच लिहून ठेवा. यावेळी राज्यात परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहेत.

आणखी वाचा >> काँग्रेस पुन्हा सत्तेवर आल्यास छत्तीसगडमध्ये मोफत शिक्षण; राहुल गांधींचे आश्वासन : तेंदू पाने गोळा करणाऱ्यांना वार्षिक चार हजार 

प्रश्न : १५ वर्ष सत्तेत राहिल्यानंतर तुम्हाला कोणता धडा मिळाला, जो महत्त्वाचा वाटतो?

रमण सिंह : छत्तीसगडमध्ये जर सत्तेत राहायचे असेल तर शेतकऱ्यांना समाधानी राखावे लागले, हा एक महत्त्वाचा धडा मला शिकायला मिळाला.

प्रश्न : भूपेश बघेल यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांना कर्जमाफी, हमीभाव आणि बोनसची घोषणा केली आहे. भाजपा याचे उत्तर कसे देणार?

रमण सिंह : यावर आम्ही नक्कीच चर्चा करू. आमचा जाहीरनामा अजून बाहेर यायचा आहे.