भाजपाने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांची आठवी यादी जाहीर केली आहे. या यादीत पंजाबची सहा तर ओदिशाची तीन नावं आहेत. गुरुदासपूर लोकसभा मतदारसंघातून सनी देओलचा पत्ता कापण्यात आला आहे. त्याऐवजी दिनेश सिंह बब्बू यांना तिकिट देण्यात आलं आहे. तर अमृतसरच्या जागेवर तरणजीत सिंह संधू यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पटियालातून परनीत कौर यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवण्यात आलं आहे. परनीत कौर या कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पत्नी आहेत.

कुणाकुणाला तिकिट?

भाजपाने फरिदकोटच्या जागेवर हंसराज हंस यांना उमेदवारी दिली आहे. हंसराज हंस सध्याच्या घडीला उत्तर पश्चिम दिल्ली लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. लुधियानातून रवनीत सिंह बिट्टू, जालंधरहून सुशील कुमार रिंकू यांना उमेदवारी दिली आहे. ओदिशातल्या तीन जागा जाहीर झाल्या आहेत. रबिंद्र नारायण बेहरा, सुकांत कुमार पाणिग्रही आणि भर्तृहरी महताब यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवण्यात आलं आहे.

21 candidates for teachers constituency NCPs candidacy has caused a breakdown in mahayuti
नाशिक : शिक्षक मतदारसंघात २१ उमेदवार रिंगणात, राष्ट्रवादीच्या उमेदवारीने महायुतीत बिघाडी
Shiv Sena Thackeray group candidate Arvind Sawant got less votes from Worli and Shivdi assembly constituencies Mumbai
सावंत यांना वरळीतून कमी मताधिक्य; मुंबादेवी, भायखळ्यातील मताधिक्यामुळे विजय सुकर
New faces from Sharad Pawar group in assembly elections
विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाकडून नव्या चेहऱ्यांना संधि
Mahavikas Aghadi, Uran ,
उरणमधून महाविकास आघाडीला मताधिक्य, निकालातून विधानसभेची नांदी
Dhananjay Munde, Pankaja Munde,
पंकजांचा पराभव धनंजय मुंडेंसाठी धोक्याची घंटा
Rajshri Patil, Yavatmal, mahayuti,
यवतमाळ : ‘माहेरच्या ऋणाईतच राहील’, महायुतीच्या राजश्री पाटील यांचा विधानसभेपाठोपाठ लोकसभेतही पराभव
What Girish Kuber Sir About Election Result?
‘लोकसभेच्या निवडणूक निकालाने काँग्रेसला काय दिलं?’ वाचा लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांचं सविस्तर विश्लेषण
BJP candidate actress Kangana Ranaut on Lok Sabha Election Result
Kangana Ranaut : निकालाच्या दिवशी कंगणाला आईने भरवली दही साखर; कंगणा म्हणाली, “मी मंडी सोडून कुठेही जाणार नाही.”

सनी देओलने व्यक्त केली होती लोकसभा न लढवण्याची इच्छा

अभिनेता सनी देओलला २०१९ मध्ये भाजपाने गुरुदासपूरमधून तिकिट दिलं होतं. भाजपाच्या तिकिटावर सनी देओल निवडूनही आला. काही महिन्यांपूर्वी सनी देओलने जी आश्वासनं २०१९ च्या प्रचारात दिली होती ती पूर्ण केली नाहीत असा आरोप त्याच्यावर झाला होता. दरम्यान गदर २ सिनेमा हिट झाल्यानंतर आपण लोकसभा लढवण्यास इच्छुक नाही असं त्याने म्हटलं होतं. आता भाजपाच्या आठव्या यादीत सनी देओलचा पत्ता कापण्यात आला आहे.

हे पण वाचा- ईशा देओल भेटल्यावर ‘अशी’ होती सावत्र आईची प्रतिक्रिया; आजारी काकांसाठी अभिनेत्री गेली होती सनी देओलच्या घरी

आठव्या यादीत बंडखोरांना तिकिट

भाजपाने आपमधून बंडखोरी करुन भाजपात आलेल्या सुशील कुमार रिंकू आणि काँग्रेस बंडखोर रवनीत सिंह बिट्टू तसं परनीत कौर यांना तिकिटं दिली आहेत. पंजाबचे माजी मुख्यमंत्री बेअंत सिंग यांचे नातू रवनीत बिट्टू यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत कमळ हाती घेतलं होतं. रवनीत बिट्टू लुधियानातून खासदार आहेत. राहुल गांधींचे निकटवर्तीय अशी त्यांची ओळख होती. २६ मार्चला त्यांनी भाजपात प्रवेश केला आणि आता त्यांना तिकिट देण्यात आलं आहे.