लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा अवघ्या काही तासांवर आला तरी महाविकास आघाडीमधील धुसफूस अद्याप चालू आहे. मविआत सांगली लोकसभा मतदारसंघ शिवसेनेच्या उबाठा गटाकडे आला आहे. परंतु, काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांनी या जागेवरील त्यांचा दावा सोडलेला नाही. काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी सोमवारी (१५ एप्रिल) काँग्रेस आणि अपक्ष असे दोन उमेदवारी अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून ते मतदारसंघात जोरदार शक्तिप्रदर्शन करत आहेत. विशाल पाटलांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे या मतदारसंघात ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटलांची कोंडी होत आहे.

दरम्यान, काँग्रेसने विशाल पाटलांना कारवाईचा इशारा दिला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, विशाल पाटलांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम तारखेपर्यंत आम्ही प्रयत्न करत राहू. विशाल पाटलांनी पक्षशिस्त मोडली तर आम्ही त्यांच्यावर कारवाईदेखील करू. आम्ही अजूनही विशाल पाटलांना समजावत आहोत. यामध्ये आम्हाला यश मिळेल असं मला वाटतं.

Vijay Wadettiwar warning to the Grand Alliance regarding Manoj Jarange Mumbai
उगाच विरोधकांवर खापर फोडू नका; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला इशारा
What Narendra Modi Said?
Narendra Modi : नरेंद्र मोदींची विरोधकांवर जोरदार टीका, “त्यांना या गोष्टीचा पश्चातापही नाही की…”
Mav leaders bjp Campaigning convention ajit pawar mahayuti
मविआ नेते लक्ष्य; भाजप अधिवेशनात प्रचाराची दिशा स्पष्ट, ‘संभ्रमा’तील कार्यकर्त्यांना संदेश
rahul gandhi
“राजकारणात जय, पराजय होत असतो, पण…”; स्मृती इराणींना ट्रोल करणाऱ्यांसाठी राहुल गांधींची पोस्ट!
readers comments on loksatta editorial readers reaction on loksatta articles
लोकमानस : विरोधकांनी ही संधी सोडू नये!
Bahujan Vikas Aghadi leader Prashant Raut beaten
बहुजन विकास आघाडीचे नेते प्रशांत राऊत यांना मारहाण
supriya shrinate replied to jagdeep dhankhar
“मर्यादा विरोधकांनी नाही, तर मोदींनी सोडली”, जगदीप धनखड यांच्या ‘त्या’ विधानाला सुप्रिया श्रीनेत यांचे प्रत्युत्तर!
Narendra Modi And Rahul Gandhi (4)
“हिंदू समाजाविरोधातील अपमानजनक वक्तव्ये योगायोग की…”, मोदींचं काँग्रेसविरोधात सूचक विधान; म्हणाले, “देवाच्या रुपांचा…”

दरम्यान, विशाल पाटील उमेदवारी अर्ज मागे घेतील, असा विश्वास ठाकरे गटानेही व्यक्त केला आहे. ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले, यंदाच्या निवडणुकीत मविआचं जागावाटप पूर्ण झालं आहे. त्यात आता बदल होणार नाही. मागच्या लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील हे शेतकरी संघटनेच्या तिकीटावर लढले होते. तेव्हा त्यांना काँग्रेसने तिकीट दिलं नव्हतं. त्यामुळे यंदा ते पुन्हा एकदा तसाच प्रयत्न करतायत. मात्र काँग्रेस नेतृत्व योग्य ती पावलं उचलेल आणि अर्ज मागे घेण्याची वेळ येईल किंवा त्याची अंतिम तारीख असेल तेव्हा विशाल पाटील तो अर्ज मागे घेतील, तसेच चंद्रहार पाटलांच्या पाठिशी उभे राहतील.

हे ही वाचा >> “नशीब त्यांनी डॉक्टरांना विषाचं इंजेक्शन…”, अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून जितेंद्र आव्हाडांचा टोला

विशाल पाटलांनी दोन दिवसांपूर्वी सांगलीत शक्तिप्रदर्शन केलं. त्यानंतर ते म्हणाले, “महाविकास आघाडीने मोठी चूक केली आहे. भाजपाला पराभूत करण्यासाठी एक सक्षम उमेदवार देणं आवश्यक होतं. परंतु, तसं झालेलं नाही. म्हणूनच मी उमेदवारी अर्ज भरून पक्षाकडे मागणी करावी, अशा पद्धतीचा निर्णय मतदारसंघातील लोकांनीच घेतला आहे. काँग्रेस पक्षाच्या ३८ हजार कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर आम्ही काही निर्णय घेतले आहेत. याचाच एक भाग म्हणून मी सोमवारी (१५ एप्रिल) उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.