गेल्या काही दिवसांपासून अजित पवार गटाचे नेते नरहरी झिरवळ पक्षावर नाराज असल्याच्या चर्चा आहेत. पण या चर्चा उथळ असून यात तथ्य नसल्याचं नरहरी झिरवळ यांनी आधीच स्पष्ट केलं होतं. तरीही आज त्यांना काहीजणांनी नाराज असल्याबाबत विचारलं. याबाबत त्यांनी आज खुल्या व्यासपीठावरूनच त्यांची भूमिका स्पष्ट केली. महायुतीतर्फे आज नाशिकमध्ये भव्य सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही संबोधित केलं. त्याआधी नरहरी झिरवळ यांनीही जमलेल्या जनतेबरोबर संवाद साधला.

नरहरी झिरवळ म्हणाले, “पहिला मी माझा खुलासा करतो. भुजबळसाहेब काही मंडळींनी माझं असं केलंय ना की माझ्याच काही जोडीदारांकडून मला ना घर का ना घाट का करण्याचा प्रयत्न चालू आहे. पण मी राजकारणात आज आलोय असं नाही. कै. हरिभाऊ महाले, सीताराम भोईर, हरिश्चंद्र चव्हाण असं करत करत इथंवर आलोय.

हेही वाचा >> नरहरी झिरवळ शरद पवार गटाच्या वाटेवर? ‘त्या फोटोबाबत स्पष्टीकरण देत म्हणाले, “मी तुतारीचा प्रचार…”

“इथे येताना मला वाटलं होतं की प्रोटोकॉलप्रमाणे यादी असेल. पीएम साहेब आहेत. आपल्या माणसाचा आदर सन्मान आपणच करायचा असतो. कार्यक्रम आयोजित केलेला असतो त्यानुसार शासकीय यंत्रणा किंवा आपण सगळे म्हणून आपणच गर्दी करायची. माझ्यापेक्षा मला घडवणारे अनेकजण खाली बसले आहेत. तो प्रोटोकॉल आहे. पण मला वाटलं आपण विचारून घेऊ. इथं नाव असेल तर वरतीही जाऊ. नाहीतर खालूनही बाय बाय करू शकतो”, असं मिश्किलीत त्यांनी भाषण केलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मला सर्वांनी फोन केले, याचं आश्चर्य

दरम्यान, काही दिवसांपूर्वी दिंडोरी लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बैठकीत विधानसभेचे उपसभापती तथा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते नरहरी झिरवळ हे उपस्थित राहिल्याची चर्चा होती. परंतु, ते बैठकीला उपस्थित राहिले नसून तिथे असलेल्या पूजाल आले होते, असा त्यांनी खुलासा केला होता. याबाबत बोलताना ते म्हणाले की, “ते फोटो प्रसिद्ध झाल्यानंतर दिवसभर मला फोन यायला लागले. देवेंद्र फडणवीस, सुनील तटकरे, अजित पवारांचा फोन आला. भारती पवार यांना वेळ नाहीय. उमेदवार काय असतो हे मी अनुभवलंय. म्हणून भारतीताईंनी निव्वळ काम किंवा धोरण, नेता याच्याबरोबर पॉलिसी असली पाहिजे. ती आपल्याला नाही जमली. भारतीताईंच्या कार्यक्रमात घसा खरडून खरडून बोललो. चार तासात असं काय झालं की मी दुसऱ्या मंडपात जाऊ शकतो? त्यावर इतरांचा विश्वास बसावा याचंच मला नवल वाटतं. मी एकदा हो बोललो की मी मागे जात नसतो. हो तर हो, नाहीतर नाही”, असं नरहरी झिरवळ म्हणाले.