पाच राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच प्रमख राजकीय पक्षांकडून उमेदवारी याद्या जाहीर केल्या जात असून, मुख्यमंत्री पदाचा उमेदवार देखील जाहीर केला जात आहे. पंजाबमध्ये आम आदमी पार्टीकडून भगवतं मान हे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतील हे जवळपास निश्चित झाले आहे. अरविंद केजरीवाल हे आज भगवंत मान यांच्या नावाची घोषणा देखील करण्याची शक्यता आहे.

प्राप्त माहितीनुसार नागरिकांकडून आलेल्या फोन कॉल्स व मेसेजमध्ये भगवंत मान यांचेच नाव आघाडीवर दिसून आले आहे. पंजाबच्या राजकारणात येण्या अगोदर भगवंत मान यांनी आपलं संपूर्ण कुटुंबं सोडलं आहे. २०१५ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला आहे आणि आता त्यांच्या मुलांशी देखील त्यांचा फारसा संपर्क नसल्याची माहिती समोर आली आहे.

प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी स्वतः सांगितले होते की, आता ते मुलांशी बोलू शकत नाही. ते आपल्या कुटुंबाला वेळ देऊ शकले नाही, त्यानंतर त्यांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेतला. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी त्यांना मुख्यमंत्री बनण्याची ऑफर दिली होती. सामान्य जनतेच्या मतावरून त्यांनी मुख्यमंत्री होण्याचे मान्य केले होते. ४८ वर्षीय भगवंत मान यांना एक मुलगा आणि एक मुलगी असून ते परदेशात राहतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भगवंत मान यांना २०१७ मध्ये पक्षाचे पंजाब प्रमुख बनवण्यात आले होते. ते पक्षाचे संसदेत निवडून आलेले एकमेव खासदार आहेत आणि पक्षाचे सभागृहात नेतृत्व करतात. संगरूरमधून त्यांनी दोनदा लोकसभा निवडणूक जिंकली आहे. राजकारणात येण्यापूर्वी ते प्रसिद्ध विनोदी कलाकार होते. कॉमेडी विश्वात खूप नाव कमावल्यानंतर त्यांनी आम आदमी पार्टीत प्रवेश केला.