लोकसभेचे निवडणूक निकाल जाहीर झाले आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि एनडीएला २९३ जागा मिळाल्या आहेत. पण त्यांचं ४०० पारचं स्वप्न भंगलं आहे. तर इंडिया आघाडीने २३२ जागा मिळवल्या आहेत. यामध्ये सर्वात मोठा पक्ष काँग्रेस ठरला आहे. काँग्रेसला ९९ जागा मिळाल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सरकार पुन्हा एकदा स्थापन करु अशी घोषणा केली आहे. मात्र ठाकरे गटाने नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे. एनडीएचे बहुमत टेकूवरचे आहे आणि ते टेकू डळमळीत आहेत अशी टीका ठाकरे गटाने सामनातून केली आहे.

काय म्हटलं आहे सामनाच्या अग्रलेखात?

“स्वतःला ईश्वराचा अवतार समजणाऱ्या नरेंद्र मोदी या व्यक्तीचा दारुण पराभव भारतीय जनतेने केला आहे. हा लोकशाहीने हुकूमशाही, झुंडशाहीवर विजय मिळवला आहे असंच म्हणावं लागेल. नरेंद्र मोदींचा चारशेपारचा नारा सुकलेल्या पाचोळ्यासारखा उडून गेला. लोक सार्वभौम आहेत. लोकशाहीचे संरक्षणकर्ते लोकच असतात हे भारताने दाखवून दिलं आहे. चारशे जागा निवडून द्या, नव्हे चारशे जागा निवडून आणणारच या अहंकाराला भारतीय जनतेने पायदळी तुडवलं. खुद्द वाराणसीत मोदी सुरुवातीच्या टप्प्यात पिछाडीवर पडले तेव्हा देव जागा आहे हे दिसून आले. नरेंद्र मोदी आणि अमित शाह या जोडगोळीने भारत देशाचा तुरुंग केला. जनतेलाही मोकळेपणाने बोलण्याचं किंवा वावरण्याचं स्वातंत्र्य नव्हतं. विरोधात बोलणाऱ्यांना सरळ तुरुंगात टाकलं गेलं.” अशी टीका सामनात करण्यात आली आहे.

हे पण वाचा- उत्तर प्रदेशात भाजपचे गर्वहरण; दलितमुस्लीम आणि ओबीसींच्या पाठिंब्यामुळे ‘इंडिया’ची सरशी

भाजपाने पक्षाचं वॉशिंग मशीन केलं

“दिल्ली, झारखंडच्या बहुमतातील मुख्यमंत्र्यांना सरळ तुरुंगात टाकणाऱ्या मोदी शाह यांनी भारतीय जनता पक्षाचं वॉशिंग मशीन केलं. देशातल्या सर्व पक्षांतील भ्रष्ट नेत्यांना भाजपात आणून आयेगा तो मोदीही हा नारा देणाऱ्यांना जनतेने जागा दाखवली. लोकसभा निवडणुकीचे निकाल हाच जनादेश आहे. या जनादेशाचा आदर मोदी करणार आहेत काय? भाजपाला बहुमत मिळालेले नाही हे पहिले सत्य व कथित एनडीएच्या बहुमताचा आकडा काठावर आहे. चारशे पारच्या रथावर स्वार होऊ पाहणाऱ्या मोदींना रिक्षात बसून रायसिना हिल्सवर फिरावं लागेल. देशाचं चित्र स्पष्ट झालं आहे. ज्या उत्तर प्रदेशात राम मंदिराचं राजकारण करुन मोदी स्वतःला हिंदूंचे नवे शंकराचार्य म्हणून प्रस्थापित करु पाहात होते त्या उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि काँग्रेसने मोठी आघाडी घेतली. अमेठीत स्मृती इराणींचा पराभव राहुल गांधींच्या सामान्य कार्यकर्त्याने केला. रायबरेलीत राहुल गांधी विजयी झाले. मोदींच्या अहंकाराचा गाडा रोखण्याचं काम उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राने केलं. “

PM Narendra Modi Speech: निवडणूक निकालानंतर नरेंद्र मोदी भावूक, “सगळ्या देशवासीयांचे आभार, मी पुन्हा…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोदी-शाह यांनी घाणेरडं राजकारण केलं

“शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस फोडून मोदी शाह यांनी घाणेरडं राजकारण केलं. शिवसेना राष्ट्रवादी फोडून एकतर्फी विजय मिळवता येईल या भ्रमाचा भोपळा मराठी जनतेने फोडला. सत्तेचा अमर्याद वापर, पैशांचा धो-धो पाऊस मिंधे सेनेने पाडला, अजित पवारांनी अनेकांना मतदारसंघात धमक्या दिल्या, दहशत निर्माण केली. फडणवीसांनी अनाजीपंतांचं राजकारण केलं. या सगळ्या कारस्थानांचा पराभव महाराष्ट्राने केला. मोदी-शाह यांनी महाराष्ट्रात ५० सभा घेतल्या पण हाती काहीही लागलं नाही. “