भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला व्हॉट्सॲपवर ‘विकसित भारत’ मेसेज पाठवणे “तत्काळ थांबवण्याचे” निर्देश दिले आहेत. निवडणूक आयोगाने मंत्रालयाकडून या प्रकरणाचा अनुपालन अहवालही मागवला आहे. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

२०२४च्या लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊनही आणि आदर्श आचारसंहिता (MCC) लागू होऊनही केंद्र सरकारच्या उपक्रमांवर प्रकाश टाकणारे संदेश नागरिकांच्या फोनवर वितरित केले जात असल्याच्या अनेक तक्रारी मिळाल्या असल्याचे आयोगाने म्हटले आहे.

निवडणूक आयोगाचे निर्देश येताच केंद्र सरकारनेही त्वरीत उत्तर कळवलं आहे.आचारसंहिता लागू होण्यापूर्वी हे संदेश पाठवण्यात आले आहेत. यंत्रणा आणि नेटवर्कमुळे विलंबाने मेसेज पोहोचले जात आहेत, असं सरकारने म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आगामी लोकसभा निवडणूकीसाठी निवडणूक आयोगाने हे पाऊल उचलले आहे. निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता लागू झाली होती. १६ मार्च रोजी निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर केली. त्यानुसार, १९ एप्रिलपासून मतदान होणार आहे. तर, ४ जून रोजी निकाल जाहीर होईल.