Supriya Sule : महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जाहीर झाली आहे. महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे आणि कुणाचं सरकार महाराष्ट्रात येईल ते चित्र स्पष्ट होणार आहे. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना असणार आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) यांनी अजित पवारांना दिल्लीला जायला आवडत नाही असं एक वक्तव्य केलं आहे. तचं खेड शिवापूर या ठिकाणी नेमकी किती रोख रक्कम सापडली? याची पारदर्शी पद्धतीने चौकशी व्हायला हवी अशीही मागणी त्यांनी केली आहे.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

खेड-शिवापूर हा भाग माझ्या मतदारसंघाचा आहे. मी गेल्या १८ वर्षांपासून त्या ठिकाणाहून अनेकदा ये-जा करते. तिथले भाजीवाले, शेतकरी सगळेच मला ओळखतात. त्या ठिकाणी एका कारमध्ये पाच कोटीची रक्कम सापडल्याचं सांगण्यात आलं. मला पत्रकारांनी जी माहिती दिली त्यानुसार त्या कारमध्ये १५ कोटी रुपये होते. तसंच मला जी माहिती मिळाली आहे त्यानुसार कारमध्ये १५ ते ५० कोटींच्या मधली एक रक्कम होती. सरकारने या प्रकरणाची पारदर्शीपणे चौकशी केली पाहिजे. तसंच नोटबंदी झाल्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात रोख रक्कम मिळतेच कशी? या प्रकरणात रक्कम कुणाची? कार कुणाची? या सगळ्याची पारदर्शी चौकशी झाली पाहिजे अशी मागणी सुप्रिया सुळेंनी ( Supriya Sule ) केली. त्याच प्रमाणे अजित पवारांबाबतही त्यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

हे पण वाचा- गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपीच्या पक्षप्रवेशावरून सुप्रिया सुळेंचं एकनाथ शिंदेंवर टीकास्र; म्हणाल्या, “मावळते मुख्यमंत्री अन् त्यांचा पक्ष…”

अजित पवारांबाबत काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

“अजित पवार हे असे नेते आहेत ज्यांना दिल्लीला जायला आवडत नाही. मी ज्या अजितदादांना ओळखते त्यांना तरी दिल्लीला सारखं जायला आवडत नाही. ते दिल्लीला गेलेत कशासाठी ते मला माहीत नाही. कारण माझा आणि त्यांचा संपर्क बऱ्याच दिवसांपासून नाही.” असं सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) म्हणाल्या.

बारामतीचा मविआचा उमेदवार कोण?

महाविकास आघाडीचे सगळे निर्णय आम्ही एकत्र मिळून करतो आहोत. प्रत्येकाने ठरवायचं की इथे निर्णय घ्यायचा की दिल्लीला. पण आम्ही सगळे बरोबर आहोत, जागावाटपाचा प्रश्नही लवकरच सुटेल असंही सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) यांनी म्हटलं आहे.बारामतीचा मविआचा उमेदवार कोण हे विचारलं असता सुप्रिया सुळे म्हणाल्या की येत्या दोन ते तीन दिवसांत तुम्हाला सगळंच चित्र स्पष्ट होईल. लोकांच्या मनात जे उमेदवार आहेत त्याच लोकांना महाविकास आघाडीकडून संधी देण्यात येईल असं सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) यांनी स्पष्ट केलं.

Story img Loader