पुण्यात महाविकास आघाडीची सभा पार पडते आहे. सुप्रिया सुळे, रवींद्र धंगेकर आणि अमोल कोल्हेंच्या प्रचारासाठी शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि काँग्रेस यांनी एकत्र सभा घेतली. या सभेत शिवसेना उबाठाच्या फायरब्रांड नेत्या अशी ओळख असलेल्या सुषमा अंधारेंनी जोरदार भाषण केलं . आपल्या भाषणात त्यांनी वाघांचं आणि कुत्र्यांचं उदाहरण देत एक किस्सा सांगितला ज्याची चर्चा होते आहे.

quiziframe id=37 dheight=282px mheight=417px] – IPL2 Quiz

काय म्हणाल्या सुषमा अंधारे?

“निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. वेगवेगळ्या पद्धतीने माझीच पाठ कशी मऊ असं सगळ्या घोरपडी सांगत आहेत. घोरपडींमध्ये त्याची स्पर्धाच चालू आहे.” असा टोला सुषमा अंधारेंनी लगावला. तसंच वाघ आणि कुत्र्यांचा किस्सा सांगत त्यांनी भाजपावर जोरदार टीका केली.

दोन वाघ होते आणि…

“एका वाघाचं कुटुंब होतं. वाघाच्या कुटुंबात त्याचे बछडेही होते. दोन बछडे अतिशय प्रेमाने राहात होते. एकत्र खेळायचे, एकत्र शाळेत जायचे. मी असं म्हटल्यावर भाजपाचे भक्तुल्ले म्हणतील काय बोलते बघा, त्या भक्तुल्ल्यांना सांगते, प्राण्यांना पंचतंत्रात हे सगळं करायला सांगितलं जातं. काही दिवस निघून गेले. जसे जसे वयात आले आणि समृद्ध झाले तसं या दोघांमध्ये भांडण झालं. भांडण इतकं टोकाला गेलं की त्याचं वैरात रुपांतर झालं. दुश्मनी इतकी टोकाला गेली की एकमेकांचं तोंड बघेनासे झाले.

हे पण वाचा- Sushma Andhare : भाजपासह शिंदे आणि अजित पवार गटावर सुषमा अंधारेंचा हल्लाबोल, नेमकं काय म्हणाल्या?

सुषमा अंधारे पुढे काय म्हणाल्या?

आता उदाहरण म्हणून सांगते एक अ नावाचा वाघ होता आणि दुसरा ब नावाचा वाघ होता. अ नावाचा वाघ रोज त्याच्या कुटुंबातल्या लोकांना सांगायचा मला ब ने खूप त्रास दिला. ब ने आज मला नाकारलं बरं का, ब ने आज मला हुलकावणी दिली. अ इतकं सांगू लागला की अच्या मुलांमध्येही ब बद्दल नकळत द्वेष निर्माण झाला. एके दिवशी अ आपल्या बछड्याला जंगलात शिकार शिकवायला घेऊन गेला. त्याला सांगितलं आज तुला शिकार शिकवतो. बाप-लेक म्हणजेच अ आणि त्याचा बछडा चालले होते तेव्हा समोरून ब आला. त्यावर अ चा बछडा म्हणाला बाबा ब येतो आहे. ब थोडा थकला होता, आजाराने जर्जर झाला होता. ब ची अवस्था पाहून बाप लेक हसू लागले. तितक्यात एक कुत्र्यांचं टोळकं तिथे आलं. अ चा पोरगा खुश झाला. तो म्हणाला बाबा ब वर सगळे कुत्रे तुटून पडणार. अ हे सगळं बघत होता, ब बद्दल त्याच्या मनात तक्रारी होत्या पण कुत्रे जसे जवळ आले, ब च्या जवळ गेले तेव्हा अ ने जोरात झेप घेतली आणि सगळ्या कुत्र्यांचा खात्मा केला. त्यानंतर मिशांना लागलेला रक्त पुसत बछड्याजवळ येऊन बसला. त्यावर अ चा मुलगा म्हणाला बाबा तुम्ही कशाला त्या ब ला वाचवलं सुंठीवाचून खोकला गेला असता. काय गरज होती मदत करायची? त्यावर शहाणा वाघ असलेला अ म्हणाला कुछ भी हो जाये झगडा दो शेरो के बीच का है, बीच में कुत्तोंका फायदा नहीं होना चाहिये. कुत्रे कुठून कुठून तुटून पडत आहेत मी सांगायची गरज नाही. कधी मुंबईत भांडण लावतात कधी बारामतीत भांडण लावतात.” असं म्हणत सुषमा अंधारेंनी भाजपावर टीका केली आहे. महाराष्ट्रातली जनता शहाणी आहे ती मधल्या कुत्र्यांचा फायदा होऊ देणार नाही असं सुषमा अंधारे म्हणाल्या.