उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेसनं आज उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. काँग्रेसच्या उमेदवार यादीकडे सगळ्यांचच लक्ष होतं. कारण यावेळी एकूण उमेदवारांपैकी ४० टक्के उमेदवारी ही महिलांना देण्याचं वचन काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी दिलं होतं. त्यानुसार काँग्रेस पक्षानं निवडणुकांसाठी पहिली १२५ उमेदवारांची यादी जाहीर केली असून दिलेल्या आश्वासनानुसार यातल्या ५० मतदारसंघात महिलांना उमेदवारी देण्यात आली आहे. या यादीमध्ये उन्नाओ बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या आईला देखील उमेदवारी देण्यात आल्यामुळे त्याविषयी जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

२०१७मध्ये उत्तर प्रदेशच्या उन्नावमध्ये घडलेल्या बलात्कार प्रकरणामुळे देशभरात खळबळ उडाली होती. कारण एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणात भाजपाचा तत्कालीन आमदार कुलदीप सेनगर याचं नाव समोर आलं होतं. या प्रकरणी दीर्घकालीन खटला चालल्यानंतर कुलदीप सेनगरला १० वर्षांचा कारावास आणि १० लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. सेनगरला भाजपानं पक्षातून देखील आधीच निलंबित केलं आहे.

pune aimim, mim lok sabha candidate anis sundke pune
“काँग्रेस पक्षाने ७० वर्षांत मुस्लिम, दलित समाजासाठी काय केले?”, एमआयएमचे उमेदवार अनिस सुंडकेंचा पलटवार
ips abdur rahman marathi news, ips abdur rahman latest news in marathi
“लोकसभेच्या ४८ जागांवर काँग्रेस, भाजपकडून मुस्लिमांना प्रतिनिधीत्वच नाही”, वंचितचे उमेदवार अब्दुल रहमान यांची टीका
Congress manifesto
३० लाख युवकांना नोकरी, महिलांना वर्षाला १ लाख ते शेतीमालाला हमीभाव; काँग्रेसच्या जाहीरनाम्यात मोठ्या घोषणा
Congress manifesto for Lok Sabha election 2024 will be announced and campaign will be done across the country regarding 25 promises
काँग्रेसचीही ‘घरघर हमी’! पंचसूत्रीतील २५ आश्वासनांबाबत देशभर प्रचार

पोलिसांनी गैरवर्तन केलेल्या आशा कार्यकर्तीलाही उमेदवारी!

दरम्यान, आता काँग्रेसच्या उमेदवार यादीमुळे पुन्हा एकदा या प्रकरणाविषयी चर्चा सुरू झाली आहे. पीडितेची आई आशा सिंह यांचा काँग्रेसच्या उमेदवारांच्या पहिल्या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणावरून काँग्रेस पक्ष भाजपाला आगामी निवडणुकांमध्ये लक्ष्य करण्याची शक्यता आहे. आशा सिंह यांच्यासोबतच पूनम पांडे नामक आशा कार्यकर्तीला देखील उमेदवारी देण्यात आली आहे. नोव्हेंबर २०२०मध्ये शाहजगानपूरमध्ये योगी आदित्यनाथ यांना भेटण्याच्या प्रयत्नात असलेल्या पूनम पांडे यांच्याशी उत्तर प्रदेश पोलिसांनी गैरवर्तन केलं होतं. यावरूनही बराच वाद झाला होता.

“आज जाहीर करण्यात आलेल्या एकूण १२५ उमेदवारांपैकी ४० टक्के महिला असून ४० टक्के तरुण आहेत. या ऐतिहासिक धोरणाच्या माध्यमातून उत्तर प्रदेशात नव्या पद्धतीचं राजकीय वातावरण निर्माण होईल अशी आम्हाला आशा आहे”, अशी प्रतिक्रिया प्रियांका गांधी यांनी यावेळी दिली.