पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीतील निवडणूक रॅलीत विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला आणि राष्ट्रीय संकटाच्या वेळी राजकीय फायदा मिळवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, “ आमच्या गावांची एक ताकद अशाी देखील आहे की जेव्हा संकट येते तेव्हा सर्वजण आपापल्या तक्रारी विसरून एकत्र येतात. मात्र देशासमोर एखादं आव्हान निर्माण झालं असेल, तर हे कट्टर घराणेशाहीवादी यामध्ये देखील राजकीय स्वार्थ शोधत असतात. भारताची जनता आणि सैन्य संकटाशी लढत असेल तर हे त्यांचा आणखी त्रास वाढवण्यासाठी जे काही करता येईल ते पूर्ण ताकदीने करत राहतात. करोनाच्या काळातही आपण हे पाहिले आणि आज युक्रेन संकटकाळातही तेच पाहात आहोत. पंतप्रधान मोदी म्हणाले की, सतत विरोध, आंधळा विरोध, निराशा आणि नकारात्मकता ही त्यांची राजकीय विचारधारा बनली आहे.”

तसेच, “ मला आनंद आहे की ज्याच्याकडे क्षमता आहे, तो राष्ट्रहितासाठी योगदान देत आहे. आज भारताविरुद्ध काहीही झाले तर सर्व नागरिक एकत्र उभे राहतात. कोणी पंचायतीलाही मत देत असेल तर देशाचे हित पाहून मतदान करा. तसेच, उत्तर प्रदेशमधील जनतेने गुंडगिरी, माफिया, भ्रष्टाचार, कट्टर घराणेशाहीवाद्यांना पूर्णपणे नाकारले आहे.” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याचबरोबर, “ आज एकीकडे डबल इंजिनचा दुहेरी फायदा आहे, ज्याचा लाभ यूपीतील प्रत्येक नागरिक घेत आहे. दुसरीकडे, घराणेशाहीवाद्यांच्या कोरड्या घोषणा आहेत, ज्या कधीही पूर्ण होऊ शकत नाहीत. २१ व्या शतकातील हे तिसरे दशक संपूर्ण जगासाठी नवीन आव्हाने, अभूतपूर्व संकट घेऊन आले आहे. पण भारताने ठरवले आहे की, आम्ही या अभूतपूर्व संकटाचे आणि आव्हानांचे संधींमध्ये रूपांतर करू. हा संकल्प केवळ माझा नाही, तर भारतातील १३० कोटी नागरिकांचा आहे, तो तुम्हा सर्वांचा आहे.” असंही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी बोलून दाखवलं.