आगामी विधानसभा निवडणुकांचं वारं आता देशातल्या पाच राज्यांमध्ये वाहू लागलं आहे. कोण कोणासोबत युती करणार, कोण कोणाची साथ सोडणार अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. याच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उत्तरप्रदेशात चंद्रशेखर आझाद यांनी आपण समाजवादी पार्टीसोबत युती केल्याचं काही वेळापूर्वीच स्पष्ट केलं आहे. त्यानंतर काही वेळातच अखिलेश यादव यांना दलितांची गरज नाही, असं विधान आझाद यांनी केलं आहे.

यासंदर्भात आज झालेल्या पत्रकार परिषदेत चंद्रशेखर आझाद म्हणाले की, आपण बहुजन समाजाला एकत्र केलं आणि समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांच्याशी गेल्या सहा महिन्यांपासून चर्चा सुरू ठेवली. अखिलेश यांना भेटण्यासाठी आपण दोन दिवस लखनौमध्ये असल्याचंही आझाद यांनी सांगितलं. आझाद म्हणाले, मी आता अखिलेश यांच्याकडे जबाबदारी सोपवली आहे. त्यांनी मला न बोलावून माझा अपमान केला आहे. माझ्या लोकांना वाटत आहे की आपला नेता आता समाजवादी पार्टीत प्रवेश करणार, पण अखिलेश यादवांना दलितांची गरज नाही.

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, चंद्रशेखर आझाद यांनी असाही आरोप केला की अखिलेश यादव यांना सामाजिक न्याय माहितच नाही आणि त्यामुळे त्यांनी दलितांसंदर्भातल्या मुद्द्यांवर कायम मौन बाळगलेलं आहे. आझाद पुढे म्हणाले की, आपण अखिलेश यादव यांना मोठा भाऊ मानतो आणि भाजपाला रोखण्यासाठी आपण बहुजन समाज पार्टी आणि समाजवादी पार्टीसोबत हातमिळवणी करण्याचे प्रयत्न केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सामाजिक न्यायासाठी आपला लढा सुरूच राहील. आपण विरोधी पक्षांसोबत युती करू अथवा एकट्याने लढू, असं आझाद यांनी म्हटलं आहे.