वाराणसीकडे विशेष लक्ष

उत्तर प्रदेश विधानसभेसाठी बुधवारी सातव्या व शेवटच्या टप्प्यात मतदान होत आहे. विशेष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघाकडे लक्ष असेल. पंतप्रधान तीन दिवस प्रचारासाठी तळ ठोकून होते. वाराणसीमधील पाच मतदार संघातील कामगिरीबाबत औत्सुक्य आहे.

नक्षलप्रभावीत सोनभद्र, मिर्झापूर व चंडोली या जिल्ह्य़ांमध्ये मतदानासाठी कडेकोट सुरक्षा आहे. याखेरीज गाझीपूर, जौनपूर व भदोहीमध्ये उद्या मतदान होत आहे. भाजप ३२ जागा लढवत असून त्यांचा मित्रपक्ष अपना दल व सुहेलदेव भारतीय समाज पक्ष प्रत्येकी चार जागा लढवत आहे. बसप सर्व चाळीस जागा लढवत आहे. तर समाजवादी पक्ष ३१ तर काँग्रेस ९ जागा लढवत आहे. गेल्यावेळी या टप्प्यातील ४० जागांपैकी समाजवादी पक्षाने २३ तर बसप ४, भाजप ३ व इतरांना पाच जागा मिळाल्या होत्या.  या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच मंत्रिमंडळातील इतर सहकाऱ्यांनी वाराणसीत प्रचार केला. मुख्यमंत्री अखिलेश यादव व काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपच्या प्रचाराला जोरदार प्रत्युत्तर दिले होते. बसपप्रमुख मायावती यांनी वाराणसी येथून २० किमी अंतरावर रोहयाना येथे जाहीरसभा घेतली.  बुधवारच्या मतदानात माजी केंद्रीय मंत्री ओम प्रकाश, पारसनाथ यादव, अजय राय, माजी खासदार धनंजय सिंह, मुख्तार अन्सारीचा भाऊ सिगबत्तुल्लाह अन्सारी हे उमेदवार प्रामुख्याने रिंगणात आहेत. एका उमेदवाराच्या निधनाने अलपूर विधानसभा मतदारसंघात गुरुवारी मतदान होईल. त्यामुळे निवडणूक आयोगाने मतदानोत्तर चाचण्या गुरुवारी साडेपाचपर्यंत पुढे ढकलल्या आहेत.

वाराणसीत काय होणार?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या वाराणसी मतदारसंघात येणाऱ्या पाच विधानसभा जागांवर लक्ष केंद्रित केले होते. मोदींनी तीन दिवसांत दोन रोड रो तसेच चार जाहीरसभा घेतल्या. प्रभावशाली अशा आश्रमाला भेट तसेच माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या निवासस्थानी त्यांना आदरांजली वाहिली. सध्या वाराणसीमधील पाचपैकी तीन जागा भाजपकडे तर दोन ठिकाणी सत्ताधारी समाजवादी पक्षाचे आमदार आहेत.

सातवा टप्पा

  • एकूण मतदारसंघ ४०
  • मतदार १ कोटी ४१ लाख १४ हजार ४५७ मतदान केंद्रे