Uttar Pradesh election : माजी मुख्यमंत्री मायावती विधानसभा निवडणूक लढणार नाहीत

बसपा खासदार सतीशचंद्र मिश्रा यांनी दिली आहे माहिती

(प्रातिनिधिक छायाचित्र)

उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बहुजन समाज पार्टीच्या सर्वोसर्वा मायावती या यंदाची विधानसभा निवडणूक लढणार नाहीत, अशी माहिती बहुजन समाज पार्टीचे खासदार सतीशचंद्र मिश्रा यांनी माध्यमांना दिली आहे. याचबरोबर त्यांनी बसपा उत्तर प्रदेशमध्ये सरकार स्थापणार असल्याचा दावा देखील केला आहे.

“माजी मुख्यमंत्री मायावती आणि मी विधानसभा निवडणूक लढवणार नाही. समाजवादी पक्षाकडे ४०० उमेदवार नसतील तर ते ४०० जागा कशा जिंकणार? समाजवादी पार्टी किंवा भाजपा सत्तेवर येणार नाही, बसपा उत्तर प्रदेशात सरकार स्थापन करणार आहे.” असं बसपा खासदार सतीश चंद्र मिश्रा यांनी म्हटलं आहे.

निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेश, उत्तराखंडसह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्र यांनी, उत्तर प्रदेशच्या ४०३ जागांच्या विधानसभेच्या निवडणुका सात टप्प्यात होणार असल्याचे सांगितले आहे. उत्तर प्रदेशमध्ये १०, १४ , २०, २३ , २७ फेब्रुवारी, ३ मार्च आणि सात मार्चला मतदान होणार आहे. १० मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. करोनामुळे निवडणुकीसाठी नवीन प्रोटोकॉल करण्यात आला आहे. कोविडमुळे मतदानाची वेळ एक तासाने वाढली आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिली आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२२ ( Elections ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Uttar pradesh election former chief minister mayawati will not contest assembly elections msr

Next Story
UP Assembly election : “… तर योगी आदित्यनाथ बनतील पंतप्रधान पदाचे दावेदार” ; अखिलेश यादव यांचं विधान
फोटो गॅलरी