PM Modi Net Worth : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा वाराणसी लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या सातव्या टप्प्यात १ जून रोजी वाराणसीमध्ये मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करत असताना मोदींनी प्रतिज्ञापत्राद्वारे आपली संपत्ती जाहीर केली. तसेच त्यांचा फोन नंबर, सोशल मीडिया अकाऊंट आणि ईमेल आयडीचीही माहिती दिली. विशेष म्हणजे, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारताची अर्थव्यवस्था १० व्या स्थानावरून पाचव्या क्रमाकांवर आली, असल्याचा दावा केला जातो. देशातील नागरिक आता गुंतवणुकीसाठी नवे नवे पर्याय स्वीकारत असताना पंतप्रधान मोदी मात्र पारंपरिक पद्धतीने बँकेत एफडी करून गुंतवणूक करत असल्याचे समोर आले आहे.

वार्षिक करपात्र उत्पनात दुपटीने वाढ

पंतप्रधान मोदींची एकूण संपत्ती ३.०२ कोटींची असल्याचे आणि त्यांच्याकडे ५२,९२० हजारांची रोकड असल्याचे प्रतिज्ञापत्राद्वारे समोर आले आहे. त्यांच्याकडे स्वतःचे घर, गाडी, जमीन काहीही नसल्याचेही यात नमूद करण्यात आले आहे. तसेच मोदींच्या करपात्र उत्पन्नात मागच्यावेळेपेक्षा दुपटीने वाढ झाल्याचेही दिसत आहे. २०१८-१९ च्या प्रतिज्ञापत्रानुसार पंतप्रधान मोदींचे वार्षिक करपात्र उत्पन्न ११ लाख रुपये होते. ते आता २०२२-२३ मध्ये वाढून २३.५ लाख रुपये इतके झाले आहे.

Narendra Modi
“मी मुस्लीम कुटुंबांत राहिलो, मला अनेक मुस्लीम मित्र, पण २००२ नंतर…”, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं विधान चर्चेत
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
narendra modi
“मुस्लिम समुदायाला पहिल्यांदाच सांगतोय, त्यांनी आता…”, आरक्षणाबाबत पंतप्रधान मोदींकडून भूमिका स्पष्ट
Pm Narendra modi Speech in Nashik
“मोदींनी भाषणात अल्पसंख्याकांचा मुद्दा काढताच, शेतकरी ओरडला कांद्यावर बोला..”, पुढे नेमकं काय घडलं?
pm modi on prajwal revanna sex tape row
प्रज्वल रेवण्णा प्रकरणावर पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं भाष्य; म्हणाले…
Ghatkopar incident
Hording Collapse : घाटकोपर दुर्घटनेत मृतांची संख्या वाढली, महाकाय होर्डिंग उचलण्याचे काम सुरूच; VIDEO समोर!
uddhav thackeray viral video
शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना बाहेर जायला सांगितलं, ठाकरेंनी हात जोडले अन्..; भाजपाने शेअर केला ‘तो’ VIDEO
Arvind Sawant On Rahul Narwekar
अरविंद सावंत यांचा राहुल नार्वेकरांना अप्रत्यक्ष टोला; म्हणाले, “रंग बदलणारा सरडा…”

पंतप्रधान मोदींनी पैसे कुठे गुंतवले?

पंतप्रधान मोदी हे अर्थव्यवस्थेचा हवाला देत असताना म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढल्याचे सांगतात. पण त्यांनी मात्र स्वतःचे पैसे फिक्स डिपॉझिट आणि राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (National Savings Certificates) मध्ये गुंतवले आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये मोदींनी २.८५ कोटींचे फिक्स डिपॉझिट ठेवले आहे. तसेच ९.१२ लाख रुपये राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र या योजनेत गुंतवले आहेत.

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र ही सरकारची योजना असून भारतीय पोस्टाद्वारे चालविली जाते. या योजनेत वर्षाला ७.७ टक्क्यांचे व्याज मिळते. तसेच व्याजातून मिळणारे उत्पन्न हे ८०सी नुसार करमुक्त असते. एफडी आणि पोस्ट अशी मिळून मोदींची ३ कोटी रुपयांची गुंतवणूक आहे.

२०१९ साली किती गुंतवणूक होती?

पंतप्रधान मोदींनी २०१९ साली दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांचे उत्पन्न जाहीर केले होते. त्यावेळी त्यांनी पोस्टाच्या योजनेत ७.६१ लाख तर बँकेत फिक्स डिपॉझिटद्वारे १.२८ कोटी रुपये ठेवले होते. तसेच त्यांनी २० हजार रुपये एल अँड टी इन्फ्रस्ट्रक्चर बाँडमध्ये गुंतविल्याचे दाखविले होते. यंदा मात्र त्यांनी बाँडमध्ये कोणतीही गुंतवणूक दाखविली नाही.

पंतप्रधान मोदी व्हॉट्सॲपवर नाहीत

गुंतवणुकीच्या तपशीलासह इतरही माहिती प्रतिज्ञापत्रात जाहीर करण्यात आली आहे. जसे की, मोदींचा मोबाइल नंबर, सोशल मीडिया अकाऊंटस आणि ईमेल आयडी वैगरे. विशेष बाब म्हणजे आजकाल प्रत्येकाच्या मोबाइलमध्ये असणारे व्हॉट्सॲप पंतप्रधान मोदी वापरत नाहीत. तसेच त्यांचा ईमेल आयडी हा त्यांच्या नरेंद्र मोदी डॉट इन या वेबसाईटवरून तयार करण्यात आलेला आहे.