उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सामाजिक वातावरण बिघडवणाऱ्यांना सज्जड इशारा दिला आहे. जे लोक सामाजिक सौहार्दाला धक्का लावतील त्यांचे ‘राम नाम सत्य’ केले जाईल, असे ते म्हणाले. शुक्रवारी अलीगढ येथील एका जाहीर सभेत बोलत असताना त्यांनी हा इशारा दिला. अलीगढमध्ये भाजपाने सतीश कुमार गौतम यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिल रोजी याठिकाणी मतदान होणार आहे. गौतम यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या सभेत योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशच्या कायदा व सुव्यवस्थेबाबत भाष्य केले.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पुढे म्हणाले, उत्तर प्रदेशमध्ये महिला आणि व्यापारी रात्रीच्या वेळी कधी सुरक्षितपणे घराबाहेर पडू शकतील, असा विचार कुणीही केला नव्हता. काही वर्षांपूर्वीपर्यंत लोक विचार करायचे की, गुन्हेगारांना काहीही होणार नाही. पण याच गुन्हेगारांना त्यांचे आयुष्य नकोसे करून टाकू, असा शब्द मी दिला होता. आम्ही कमी बोलतो आणि जास्त काम करतो, असेही ते सांगायला विसरले नाहीत.

rajnath singh on pakistan
‘घरात घुसून मारू’, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या आक्रमक भूमिकेनंतर पाकिस्तानचा जळफळाट
Sanjay Raut on Congress Sangli
“तुमची नौटंकी…”, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यानाच संजय राऊंताचा इशारा
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
prashant kishor on bjp in loksabha election 2024
Video: २०२४च्या निवडणुकीत भाजपाचं काय होणार? प्रशांत किशोर यांनी मांडलं गणित; म्हणाले, “यावेळी पहिल्यांदाच…”

“आम्ही फक्त प्रभू रामालाच आणले नाही तर जे लोक मुली आणि व्यापाऱ्यांसाठी धोका बनले होते, त्यांचे ‘राम नाम सत्य’ करण्यासाठी मागेपुढे पाहत नाहीत. आम्ही रामाचे नाव घेऊन जीवन जगतो. प्रभू रामाला वगळले तर काहीच शक्य नाही. पण ज्यावेळी कुणी समाजात दहशत निर्माण करतो, त्यावेळी त्याचे राम नाम सत्य केल्याशिवाय आम्ही राहत नाही”, असे योगी आदित्यनाथ आपल्या भाषणात म्हणाले.

बाबरी मशीद, गुजरात दंगली, हिंदुत्वाचे संदर्भ हटवले; NCERT च्या पुस्तकामधील मजकुरात बदल!

मतदानाबाबत आवाहन करताना योगी आदित्यनाथ म्हणाले की, लोकशाहीमध्ये मतदानाचे फार महत्त्व आहे. तुम्ही चुकीच्या उमेदवारासमोरील बटण दाबले तर देश भ्रष्टाचाराच्या दरीत ढकलला जाऊ शकतो. उत्तर प्रदेशमध्ये याआधी अराजक, कायदा व सुव्यवस्थेचा अभाव आणि कर्फ्यू सारखी परिस्थिती असायची. महिला आणि तरूण मुले नेहमी दहशतीत असायचे. पण १० वर्षांपूर्वी लोकांनी जे स्वप्न पाहिले होते, ते केवळ योग्य मतदानामुळे आता सत्यात उतरत आहे.

सोनम वांगचुक यांचा मोठा दावा; म्हणाले, “चीननं भारताचा मोठा भूभाग…”

उत्तर प्रदेशचा जेव्हा विकास होईल, तेव्हाच भारताचा विकास होईल आणि अलीगढचा विकास झाला तरच उत्तर प्रदेशचा विकास होईल, त्यामुळे मतदानाच्या दिवशी लोकांनी विकासासाठी मतदान करावे, असे आवाहन योगी आदित्यनाथ यांनी केले.