– राजेंद्र येवलेकर

एप्रिलमध्ये गुगल व अ‍ॅपल यांनी कोविड-१९ बाधितांशी संपर्क आलेल्या लोकांचा शोध घेण्यासाठी विविध देशांच्या सरकारांशी सहकार्य करण्याचे ठरवले होते. या दोन प्रतिस्पर्धी कंपन्या असल्या तरी या मोहिमेत त्या एकत्र आल्या. त्यात कोविड १९ एक्स्पोजर नावाची सूचना असलेले फीचर अँड्रॉइडमध्ये समाविष्ट केले आहे. अ‍ॅपल फोनमध्येही त्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पण त्याचा भारतात फारसा परिणाम होणार नाही.

chatting with scammer viral photo
“मित्रा, तू अजिबात अशा लिंक डाउनलोड करू नको!” खुद्द Scammer ने दिला हिताचा सल्ला; पाहा व्हायरल चॅट्स
Indian advertising, Diversity,
भारतीय जाहिरातींतील विविधता हरवली! ॲडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स कौन्सिल ऑफ इंडियाचा अहवाल काय सांगतो…
Addicted to junk food and can’t seem to stop Here’s how to overcome it
तुम्हाला जंक फूड खाण्याचे व्यसन आहे का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या कशी सोडावी ही वाईट सवय
enforcement directorate contact with apple to check kejriwal s mobile
केजरीवाल यांचा मोबाइल तपासण्यासाठी ‘अ‍ॅपल’शी संपर्क; मद्यधोरण गैरव्यवहारप्रकरणी ईडीचे पुढचे पाऊल  

अ‍ॅपल-गुगल संपर्क शोध उपयोजन (अप्लीकेशन) भारतात उपयोगी पडेल का ?
अजून तरी या उपयोजनाचा फारसा परिणाम होईल असे वाटत नाही. ज्या फोनमध्ये हे फीचर डाऊनलोड केलेले असेल त्यातच संपर्कातील रुग्ण शोधता येतील. या दोन कंपन्यांनी म्हटले आहे की, ही सोय म्हणजे अप्लीकेशनचा भाग नाही, त्याचा वापर आरोग्य संस्था एपीआयच्या मदतीने करू शकतात व नंतर ते लोक त्यांच्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करू शकतात. याचा अर्थ ते संपर्क शोधाचे सॉफ्टवेअऱ म्हणजे आज्ञावली असून कुठल्याही देशाचे सरकार त्यांच्या संपर्क शोध यंत्रणेला ही सुविधा जोडू शकते. एपीआय याचा अर्थ अप्लीकेशन प्रोग्रॅमिंग इंटरफेस असा आहे.

भारतानेही आरोग्य सेतू हे संपर्क व्यक्तींचा शोध घेणारे अप्लीकेशन तयार केले होते. पण ते अ‍ॅपल व गुगल एपीआयला जोडलेले नव्हते. एपीआयला ते जोडले असते तर संबंधित व्यक्तीचे ठिकाण कळले नसते. आरोग्यसेतूमध्ये तुमचे ठिकाण म्हणजे लोकेशन कळत होते. गुगल ब्लॉगमध्ये असे म्हटले आहे की, खरेतर सार्वजनिक आरोग्य अधिकाऱ्यांना तुमच्या फोनचे लोकेशन (ठिकाण) जाणून घेण्याचा अधिकार नाही, वापरकर्त्याचा फोन क्रमांक सुद्धा अधिकाऱ्यांना कळणे यात अपेक्षित नाही. आरोग्य सेतू या भारतातील संपर्क उपयोजनात व्यक्तींच्या मोबाईल क्रमांकासह सर्व माहिती गोळा केली जात होती.

एक्स्पोजर नोटिफिकेशन एपीआय हे नेहमीच बंद ठेवलेले असते. त्याचा पर्याय फोनधारकांना असतो. भारतातील वापरकर्ते हा पर्याय वापरू शकत नाहीत त्यामुळे त्यांच्या फोनमधील माहिती एपीआयवर जमा होत नाही.

ज्या देशात एपीआयचा वापर केला जातो तेथे ते कसे काम करते?
जेव्हा दोन लोक एकमेकांना पाच मिनिटांपेक्षा अधिक काळ भेटतात तेव्हा ब्लुटुथमार्फत एकमेकांना ओळखतात. जर त्या दोघांपैकी कुणी नंतर पॉझिटिव्ह निघाला तर ती माहिती सरकारी उपयोजनात नोंदली जाते. मग गेल्या १४ दिवसांतील तो ज्याच्या संपर्कात आला त्यांची माहिती क्लाउडवर अपलोड होते. मग त्या संबंधित व्यक्तींना सतर्क केले जाते. हे सॉफ्टवेअर करण्यापूर्वी या कंपन्यांनी उपयोजन म्हणजे अप्लीकेशन तयार केले होते. ते डाऊनलोड करावे लागत होते. आता अपडेट व म्हणजे अद्यतन हा त्यांच्या फोनमध्ये दिलेला एक पर्याय आहे. तो चालू किंवा बंद ठेवता येतो.

इतर देशांच्या संपर्क शोध उपयोजनांवर त्याचा काही परिणाम किंवा गुंतागुंत शक्य आहे का ?
या कंपन्यांनी संपर्क व्यक्ती शोधाची सोय करुन देतानाच मोबाइल वापरकर्त्याची व्यक्तीगतता धोक्यात येणार नाही याची काळजी घेतली आहे. त्यामुळे सरकार व कंपन्या यांच्यात संघर्ष सुरू आहेत. लोकांची कमी माहिती गोळा करण्यास सरकारांचा विरोध आहे तर या कंपन्या व्यक्तीगतता जपत आहेत. केंद्रीभूत व विकेंद्रीत प्रारूप असा हा वाद आहे. ब्रिटन सरकारच्या मते रुग्णांची माहिती केंद्रीय माहितीसंचात (डेटाबेस) संकलित करणे गरजेचे आहे तर अ‍ॅपल व गुगल यांनी असे म्हटले होते की, त्यांच्या प्रारूपात माहिती वापरकर्त्याच्या मोबाइल संचावर जमा होते व ती वेळ पडली तरच अपलोड केली जाते. फ्रान्समध्ये असाच वाद अ‍ॅपलबरोबर झाला होता. आरोग्य सेतू या भारतीय उपयोजनात बरीच माहिती ही वापरकर्त्याच्याच मोबाइलवर साठवली जाते व हवी तेव्हा अपलोड केली जाते. पण आरोग्यसेतूमध्ये जास्त माहिती गोळा केली जाते जे एपीआय़मध्ये नाही. कोविड १९ विरोधातील लढाईत अ‍ॅपल व गुगल यांनी व्यक्तीगत माहिती गुप्त ठेवण्याला प्राधान्य दिले आहे.

कोणते देश या कंपन्यांची सुविधा वापरत आहेत?
या कंपन्यांची कोविड संपर्क व्यक्ती शोध सुविधा कुठले देश वापरत आहेत याची कुठलीही माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. पण तरी ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रिया, ब्राझील, कॅनडा, क्रोएशिया, डेन्मार्क, जर्मनी, घाना, आय़र्लंड, इटली, जपान, केनया, लॅटव्हिया, फिलीपीन्स, पोलंड, सौदी अरेबिया, स्वित्झर्लंड, ब्रिटन, उरुग्वे या देशात त्याचा वापर चालू आहे. कॅनडा, नेदरलँडस, स्पेन व अमेरिकेतील काही राज्ये ते वापरण्याचा विचार करीत आहेत. नॉर्वेत त्यांचे स्वतचे अप्लीकेशन आहे. त्याची तुलना ते गुगल अ‍ॅपल यांच्या संपर्क शोध सुविधेशी करीत आहेत. ब्रिटनने घूमजाव केले असून त्यांचे स्वतःचे उपयोजन म्हणजे अप्लीकेशन न वापरता या कंपन्यांची संपर्क शोध सुविधा वापरण्यास सुरूवात केली आहे. जर्मनीनेही असेच केले आहे.

स्थान माहितीचे (लोकेशन डेटा) महत्व काय असते?
व्यक्तीगततेचा मुद्दा त्यात येतो. संपर्क व्यक्ती शोधताना संबंधित व्यक्तीचे ठिकाण शोधून हॉटस्पॉट कुठले हे कळते. पण यात व्यक्तीवर पाळतही ठेवली जाण्याचा धोका नाकारता येत नाही.