26 January 2021

News Flash

या वर्षी २८ टक्क्यांनी महाग झालं सोनं; जाणून घ्या २०२१ मध्ये कसे असतील सोन्याचे दर

२०१९ नंतर २०२० मध्येही सोन्याच्या दरांमध्ये झाली वाढ

(फोटो सौजन्य : रॉयटर्स)

भारतामध्ये या वर्षी सोन्याचे दर २८ टक्क्यांनी वाढले आहेत. या श्रेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार सोन्याच्या दरांमध्ये २०२१ सालीही वाढ होईल. दरवाढ होणार असली तरी गुंतवणुकदारांना सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचं आकर्षण कायम असेल आणि सोनं हेच भारतीयांसाठी गुंतवणुकीसाठी पहिली पसंती राहील असंही जाणकार सांगतात. जागतिक बाजारपेठेचा विचार करायचा झाल्यास २०२० मध्ये सोन्याचे दर २३ टक्क्यांनी वाढले आहेत. या वर्षी करोनामुळे बसलेला आर्थिक फटका, अर्थव्यवस्थांना झालेल्या नुकसानाचा भरपाई करण्यासाठी आणि वाढत्या महागाईमुळे यंदा सोन्याच्या दरांमध्येही वाढ झाल्याचे चित्र पहायला मिळालं. महागाईचा परिणाम कमी करण्यासाठी सोन्यातील गुंतवणूक हा उत्तम मार्ग असल्याचं मानलं जातं. २०२० हे सलग दुसरं असं वर्ष आहे जेव्हा सोन्याचे दर वाढलेत. यापूर्वी मागील वर्षी म्हणजेच २०१९ साली सोन्याच्या दरांमध्ये डबल दोन आकडी टक्केवारीत वाढ झाल्याचे पहायला मिळालं.

मार्चपासून सोन्याचे दर वाढतच गेले

या वर्षी सुरुवातीच्या दोन महिन्यांमध्ये सोन्याच्या दरांमध्ये सामान्य पद्धतीने वाढ दिसून आले. मात्र मार्च महिन्यामध्ये जागतिक स्तरावर करोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर सोन्याचे दर भरमसाठ वाढले. ऑगस्ट २०२० मध्ये सोन्याच्या भावाने उच्चांक गाठला. या वेळी एक तोळं सोनं (१० ग्रॅम) ५६ हजार २०० रुपयांपर्यंत गेलं होतं. जागतिक स्तरावर करोनाचा प्रादुर्भाव झाल्याने अनेक देशांमधील अर्थव्यवस्थांसंदर्भात संभ्रम निर्माण झाला आणि गुंतवणुकीचा उत्तम पर्याय म्हणून सोन्याची मागणी वाढल्याने त्याचे दरही वाढले. अनेक देशांमधील केंद्रीय बँकांनी लिक्विडीटीसंदर्भात महत्वाचे निर्णय घेतल्यानंतर गुंतवणुकदारांनी सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य दिलं.

नक्की वाचा >> Top 10 : या दहा देशांकडे आहे सर्वाधिक सोनं, पहिल्या स्थानावर आहे…

ऑगस्टपासून दर घसरले

मात्र सोन्याला आलेली झळाळी ऑगस्ट महिन्यानंतर हळूहळू उतरु लागली. सोन्याच्या दरांमध्ये दहा टक्क्यांपर्यंत घसरण झाली. करोनाची लसीसंदर्भातील सकारात्मक बातम्या समोर येऊ लागल्यानंतर गुंतवणुकदारांनी सोन्याकडे पाठ फिरवली आणि दुसऱ्या श्रेत्रांमध्ये गुंतवणुकीचे पर्याय शोधण्यास सुरुवात केली. सध्या बाजारामध्ये सोन्याची किंमत ५० हजार ३०० रुपये प्रति १० ग्रॅम इतकी आहे.

पुढल्या वर्षी काय होणार?

कमोडिटी मार्केटशी संबंधित जाणाकारांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार २०२१ मध्येही गुंतवणुकारांची नजर सोन्यावर असणार आहे. यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे जगभरातील अनेक केंद्रीय बँकांनी व्याजदर कमी केले आहेत. तसेच लिक्विडिटीसंदर्भातील नियमही शिथिल केले आहेत. आर्थिक विकास कायम रहावा या दृष्टीने हे बदल करण्यात आले असून गुंतवणुकदार याचा फायदा घेतील असं सांगण्यात येत आहे. अमेरिकेमध्ये सरकाराने नुकतच करोना पॅकेज जाहीर केलं आहे. त्यामुळे डॉलरची लिक्विडिटी वाढणार आहे. डॉलरचे दर पडल्याने सोन्याचे दर काम राहण्यास मदत मिळेल. तर दुसरीकडे करोनाची लस आणि कमी व्याजदर यामुळे सोन्यामधील गुंतवणुकीसाठी अनुकूल वातावरण २०२१ मध्ये असेल.

सध्याचा दर काय?

बुधवारी दिल्लीतील सराफा बाजारामध्ये सोन्याचा दर २५२ रुपयांनी गडगडला. दिल्लीतील सोन्याचा दर ५९ हजार ५०६ रुपयांपर्यंत खाली आला. बुधवारी चांदीच्या दरांमध्ये वाढ झाल्याचे चित्र पहायला मिळालं. चांदीचा भाव ९३३ रुपये प्रति किलोने वाढून ६६ हजार ४९३ रुपयांपर्यंत वधारला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 24, 2020 4:01 pm

Web Title: gold rates up 28 percent so far this year in india will 2021 be another good year scsg 91
टॅग Flashback 2020
Next Stories
1 Explained: पाकिस्तानच्या अत्याचारांविरोधात आवाज उठवणाऱ्या करिमा बलोच कोण होत्या?
2 समजून घ्या : काय आहे करोनाचा नवा प्रकार?
3 समजून घ्या : Boxing Day Test म्हणजे काय??
Just Now!
X