5G Interference With Flight Operations: विमान वाहतूक आणि दूरसंचार विभागातर्फे लवकरच विमानतळ भागात प्रवासी विमानांचे सुरक्षित उड्डाण सुनिश्चित करण्यासाठी 5G एअरवेव्ह झोन तयार करण्यात येणार असल्याचे समजत आहे. या नव्या योजनेनुसार दूरसंचार कंपन्यांना विमानांच्या उड्डाण मार्गापासून जवळील काही भागात 5G नेटवर्कची सिग्नल वाहून नेण्याची क्षमता कमी करावे लागणार आहे. ऑगस्ट २०२३ पर्यंत देशात कार्यरत असलेल्या सर्व विमानांचे अल्टिमीटर अपग्रेड करण्याची योजना केंद्र सरकारकडून आखण्यात येत असल्याचे समजत आहे.

भारताच्या विमान वाहतूक नियामकाने 5G सिग्नल्समुळे विमान उड्डाणात येणाऱ्या अडथळ्यांना दूर करण्यासाठी संबंधित कारवाई करण्याचे योजले आहे. या नवीन योजना सुद्धा दूरसंचार विभाग (DoT) सध्या तयार करत असलेल्या ऑपरेशनल मार्गदर्शक तत्त्वांचा भाग असण्याची अपेक्षा आहे. यापूर्वी जूनमध्ये, यूएस फेडरल एव्हिएशन ऑथॉरिटी (FAA) ने सुरक्षित एअरलाइन ऑपरेशन्स सुनिश्चित करण्यासाठी या पैलूंचा समावेश असलेली योजना जाहीर केली.

pune airport marathi news, pune airport no facility marathi news,
पुणेकरांचा हवाई प्रवास ठरतोय ‘वाऱ्यावरची वरात’!
Citizens object to concreting works at unnecessary places in navi mumbai
नको तेथे काँक्रीट रिते! अनावश्यक ठिकाणी काँक्रीटीकरणाच्या कामांना नागरिकांचा आक्षेप, शहरभर वाहतूककोंडी
Men travel in womens coaches Safety of women passengers of air-conditioned local at risk
मुंबई : महिला डब्यातून पुरुषांचा प्रवास, वातानुकूलित लोकलच्या महिला प्रवाशांची सुरक्षा ऐरणीवर
The debut of Bharti Hexacom itself gave investors a return of 43 percent
‘भारती हेक्साकॉम’चा पदार्पणालाच गुंतवणूकदारांना ४३ टक्क्यांचा परतावा

विमानाच्या उड्डाणामध्ये 5G मुळे नेमक्या काय समस्या येतात?

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, सप्टेंबरमध्ये, भारतीय नागरी उड्डयन महासंचालनालयाने (DGCA) दूरसंचार विभागाला पत्र लिहून विमान रेडिओ अल्टिमीटरसह 5G C-Band स्पेक्ट्रमच्या अडथळ्यांबाबत चिंता व्यक्त केली होती. रेडिओ अल्टिमीटर हे एक साधन आहे जे विविध विमान प्रणालींना उंचीवरूनच प्रदेशाची माहिती प्रदान करते. या वर्षाच्या सुरुवातीला, भारतीय वैमानिकांच्या पायलट- फेडरेशननेही नागरी विमान वाहतूक मंत्रालयाला पत्र लिहून अशीच चिंता व्यक्त केली होती.

दूरसंचार सेवा प्रदात्यांसाठी, सी-बँड ही 5G सेवा आणण्यासाठी एक सोयीची जागा ठरते. उत्तम कव्हरेज तसेच उच्च बँडविड्थमुळे वेगवान इंटरनेट गती या ठिकाणी मिळते. विमानाच्या ऑपरेशनसाठी, या बँडमधील अल्टिमीटरचा वापर करून विमानाच्या उंचीचे अचूक मोजमाप सुनिश्चित केले जाते मात्र 5G सिग्नल विमानांच्या अल्टिमीटरच्या तुलनेत खूप जास्त क्षमता पातळीवर कार्य करतात.

केंद्र सरकार काय पाऊल उचलणार?

इंडियन एक्सप्रेसच्या माहितीनुसार, “विमानतळांच्या जवळपास 5G नेटवर्कसाठी योजना तयार करण्यात येत आहे. यानुसार DGCA च्या सर्व समस्यांचे निराकरण करण्याचे संकेत दिले आहेत. विमानतळांपासून थोड्या अंतरावर 5G नेटवर्क सिस्टीम उभारणे आणि या सिस्टीमद्वारे उत्सर्जित होणार्‍या 5G सिग्नलची शक्ती कमी करणे असे काम या प्रणालीतून अपेक्षित आहे. एअरलाइन्स कंपन्यांना भारतात उड्डाण केल्या जाणाऱ्या काही विमानांमध्ये वापरल्या जाणार्‍या अल्टिमीटर्समध्ये सुधारणा करणे देखील आवश्यक असेल.

हे ही वाचा<< विश्लेषण: रेल्वे रुळावर टाकण्यात येणारे दगड मेट्रोच्या रुळावर का टाकले जात नाहीत? या रुळावरील दगडांचं काम काय?

जागतिक स्तरावर ही समस्या आहे का?

भारतात 5G नेटवर्क अलीकडेच सुरु झाले आहे. यापूर्वी यूएस एव्हिएशन अधिकार्‍यांनी विमानतळाजवळील 5G मुळे विमान उड्डाण अडथळ्यांची ८५ प्रकरणे नोंदवली आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला, एअर इंडियाला यूएसला जाणाऱ्या काही विमानांची उड्डाणे रद्द करावी लागली होती. यूएस मधील 5G ​​मोबाइल सेवांच्या रोलआउटमुळे विमान नेव्हिगेशन सिस्टममध्ये हस्तक्षेप होऊ शकतो. याच चिंतेमुळे एअरलाइन्सने जागतिक स्तरावर उड्डाणे पुन्हा शेड्यूल करण्यास सांगितले होते. यानंतर FAA ने 5G एअरवेव्ह त्यांच्या नेव्हिगेशन सिस्टममध्ये व्यत्यय आणू नयेत यासाठी काही फिल्टर स्थापित करण्याचे निर्देश जारी केले होते.