सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे. एका जागेवर बसून तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण आपले सर्व व्यवहार करू शकतो. या महिन्यात १ ऑक्टोबर रोजी भारतात ५ जी सेवा लाँन्च करण्यात आली. सध्यातरी भारतातील काही मोजक्या शहरांत ही सेवा सुरू आहे. काही दिवसानंतर ही सेवा संपूर्ण देशात पोहोचेल. दरम्यान, भारतात ५ जी सेवा सुरू नुकतीच लॉन्च झालेली असताना आता ‘६ जी’ची चर्चा होत आहे. २०३० सालापर्यंत जगभरात ६ जी सेवा येईल, असे म्हटले जात आहे.

हेही वाचा >>> विश्लेषण : ज्या बॉलिवूडने दुर्लक्षित केले तिथल्याच चित्रपटांना मागे टाकणारा ‘कांतारा’ स्टार रिषभ शेट्टी आहे तरी कोण?

६जी म्हणजे काय?

६ जी म्हणजे ६ जनरेशन कम्यूनिकेशन होय. हे एक वायरलेस तंत्रज्ञान आहे. ४ जी, ५ जी च्या तुलनेत ६ जी सेवा हायर फ्रिक्वेन्सीवर काम करणारी आहे. ही सेवा प्रत्यक्षात आल्यानंतर क्लाऊड बेस नेटवर्किंगच्या माध्यमातून सर्व तंत्रज्ञानाधारित कामे जलदगतीने आणि मायक्रोसेकंदाच्या विलंबाने करता येतील. ५ जी च्या तुलनेत ६ जी सेवा १०० पटीने जलद असणार आहे. ६ जी सेवा लॉन्च झाल्यानंतर जगभरात काम करण्याच्या पद्धतीमध्ये बदल होणार आहे. तसेच या ६ जीमुळे कामांमध्ये माणसांचा सहभाग, देखरेख कमी होऊ शकते. ६ जी सेवा प्रत्यक्षात आणण्यासाठी चीन, अमेरिका, जपान, दक्षिण कोरिया तसेच काही युरोपीयन देशांकडून प्रयत्न केले जात आहेत.

हेही वाचा >>> विश्लेषण: आपण रोज किती तास झोप घ्यायला हवी? कमी किंवा जास्त झोपेमुळे शरीरावर कसा परिणाम होतो जाणून घ्या

६ जी सेवेचा काय फायदा?

६ जी सेवेमुळे अनेक क्षेत्रांत मोठी क्रांती होण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने रोबोटिक्स, वेअरेबल टेक्नोलॉजी (तंत्रज्ञानाधारित उपकरणं ज्यांना आपण परिधान करू शकतो. उदा- स्मार्ट वॉच, स्मार्ट ग्लास) कॉम्यूटर्स, फोन तसेच अन्य काही उपकरणांमध्ये मोठे बदल होऊ शकतात. ६ जी सेवा प्रत्यक्षात आली तर आभासी आणि वास्तविक जगातील अंतर आणखी कमी होऊ शकते. ६ जी तंत्रज्ञानामुळे विश्लेषण, अभ्यास करणे सोपे होईल. ज्यामुळे तर्क, अंदाज यांच्या माध्यमातून अचुकतेच्या आणखी जवळ पोहोचता येऊ शकते.

हेही वाचा >>> विश्लेषण : क्षी जिनपिंग यांच्याविरोधात आंदोलन पेटलं, चीनमधील ‘ब्रिज मॅन’ची जगभरात होतेय चर्चा; जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?

६ जी सेवेमुळे जगावर काय परिणाम होणार?

भारत हा विकसनशील देश असल्यामुळे येथे वेगवेगळ्या क्षेत्रात प्रगतीला बराच वाव आहे. लॉजिस्टिक्स, शहरी आणि ग्रामीण भागातील नियोजन, शेती, आरोग्य, शिक्षण आदी क्षेत्रांना ६ जी सेवेचा फायदा होऊ शकतो. ६ जी सेवोचा हवामानाची स्थिती, वाहतूक नियंत्रणालाही फायदा होऊ शकतो. भारतीय शेतीला विशेषत: या सेवेचा चांगला फायदा होऊ शकतो. चक्रीवादळ, नैसर्गिक आपत्ती यांना तोंड देण्यासाठी ६ जीच्या मदतीने हवामानाचा अचूक अंदाज लावण्यासाठी मदत होऊ शकते. ६ जीच्या मदतीने ४डी फोटोज मिळवणे आणखी सोपे होऊ शकते. ज्याचा उपयोग महानगरांतील वाहतूक व्यवस्था स्वयंचलित करण्यासाठी करता येऊ शकतो. आरोग्य क्षेत्रातील सुविधादेखील अत्याधुनिक करता येऊ शकतील.