विविध क्षेत्रात ‘ड्रोन’चा उपयोग वाढतो आहे. केवळ मतदारांची गर्दी दाखविण्यासाठीचा कॅमेरा ही ड्रोनची ओळख आता जवळपास पुसली जात आहे. कृषी क्षेत्रात डिजिटल नोंदींना गेल्या पाच-सहा वर्षापासून सुरूवात झाली आहे. उपग्रहावरुन येणाऱ्या छायाचित्रांचाही उपयोग होत असताना ड्रोनची मदत घेऊन कीटकनाशक फवारणीच्या प्रयोगांना आता केंद्र सरकारच्या नव्या कार्यपद्धती विषयक नियमांमुळे प्रोत्साहन मिळाले आहे. ड्रोनच्या सहाय्याने पिकांवर कीटकनाशके फवारणीचा प्रयोग उस्मानाबादमध्ये नुकताच करण्यात आला. फवारणीमुळे कीटकनाशकांच्या वापरात ५० टक्क्यांपेक्षा अधिकची बचत होत असल्याचे निष्कर्ष आहेत. हा प्रयोग कृषी क्षेत्रात नवे बदल घडवू शकेल असा दावा केला जात आहे.

ड्रोनचा कृषी क्षेत्रात उपयोग कसा करता येईल ?

Notice of Maharashtra Pollution Control Board regarding polluting company Pune news
प्रदूषण करणाऱ्या कंपनीचे वीज, पाणी बंद करा! महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा दणका
Sharad pawar on ladki bahin scheme
मविआ सत्तेत आल्यावर लाडकी बहीण योजना बंद करणार?…
mpsc mains exams agricultural sector
MPSC मंत्र: राज्यसेवा मुख्य परीक्षा; शेतीपूरक क्षेत्रे आणि अन्नसुरक्षा
Bhoomipujan of Naina projects tomorrow by Prime Minister
कृषी क्षेत्राबाबत मोदी सरकारचा आणखी एक मोठा निर्णय
big decision of Modi government, agriculture sector,
कृषी क्षेत्राबाबत मोदी सरकारचा आणखी एक मोठा निर्णय जाणून घ्या, तिन्ही योजनांची सविस्तर माहिती
Presentation of Ladki bahin Yojana marathi news
लाडकी बहीण योजनेचे सादरीकरण उद्योग विभागात! उद्योगमंत्री म्हणतात…
new education policy, feasibility,
नवीन शैक्षणिक धोरण उत्तम आहेच, पण व्यवहार्यतेचे काय?
Make in India 10th anniversary
नरेंद्र मोदींचा विशेष लेख: ‘मेक इन इंडिया’ची दशकपूर्ती

जमिनीच्या मोजणीसाठी या पूर्वी ड्रोनचा उपयोग केला गेला आहे. तसेच तातडीच्या भौगोलिक सर्वेक्षणासाठी ड्रोन वापरता येतो. तो जीपीएसशी जोडलेला असल्याने मिळणाऱ्या नोंदी अचूक असतात. शेतीमधील कीटकनाशकांचा वापर महाराष्ट्रात अधिक होतो. तो कमी करण्यासाठी ड्रोनचा उपयोग होऊ शकतो. कारण ड्रोनच्या पंखामुळे पीक हालते राहते आणि फवारणी अधिक उपकारक ठरते.

पारंपारिक फवारणी व ड्रोनच्या फवारणीमध्ये काय फरक आहे?

पारंपरिक फवारणीसाठी एका व्यक्तीला ३०० रुपयांची मजुरी द्यावी लागते. याशिवाय काळजी न घेतल्यास त्यात जीवाचाही धोका असतो. विदर्भ- मराठवाड्यात असे अनेक मृत्यू झाल्याच्या नोंदी आहेत. त्यामुळे ड्रोनचा उपयोग अधिक उपयोगी ठरू शकेल. पाठीवर फवारणी यंत्रासह औषध फवारणी करताना ‘नोजल’चा आकार तुलनेने मोठा असल्याने कीटकनाशक वाया जाण्याचे प्रमाणही अधिक असते. ड्रोनमधील नोजलचा आकार, त्याची ३६० अंशात फिरण्याची क्षमता लक्षात घेता कमी कीटकनाशकामध्ये फवारणी अधिक होऊ शकेल. पण सध्या ड्रोनच्या फवारणीची किंमत पारंपरिक फवारणीच्या किंमतीपेक्षा दुप्पटच आहे. ती किंमत कमी करणे हे आव्हान असणार आहे.

काय संशोधन सुरू आहे या क्षेत्रात?

कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ व आयआयटी सारख्या संस्थेतील तंत्रज्ञांच्या मदतीने वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात यावर संशोधन सुरू आहे. साधारणत: तीन प्रकारचे ड्रोन असतात जे फवारणीसाठी वापरता येऊ शकतील. १० लिटरपर्यंत कीटकनाशके उचलणाऱ्या ड्रोनची किंमत सहा ते आठ लाख रुपयांपर्यंत जाते. वजन उचलण्याची क्षमता जेवढी अधिक तेवढी किंमत अधिक असे त्याचे गणित आहे. त्यामुळे कमी किंंमतीमध्ये वजन उचण्याची क्षमता वाढविण्यासाठी काही डिझाईन करण्याचे संशोधन सुरू आहे. त्यासाठी काही उपकरणेही परभणी कृषी विद्यापीठात मागिविण्यात आली आहेत. ड्रोनसाठी लागणारी बॅटरी आणि त्याची क्षमता यावरही संशोधन सुरू आहे. कारण एक एकर फवारणीसाठी बॅटरीचे तीन संच लागतात. कमी वेळात अधिक चार्जिंग व क्षमतेच्या बॅटऱ्या हे नवे आव्हान असल्याचे सांगण्यात येते.