भारतातील हवाई वाहतूक कंपनी एअर इंडिया आपल्या सेवेचा विस्तार करण्यासाठी पुढील १५ महिन्यांत आपल्या ताफ्यात ३० नव्या विमानांचा समावेश करणार आहे. मागील पाच वर्षांमधील एअर इंडियाचा हा विस्तारासाठीचा पहिलाच प्रयत्न आहे. त्यासाठी २५ नॅरो बॉडी आणि पाच वाइड-बॉडी असेली विमाने भाडेतत्वावर घेतली जाणार असून त्यासंबंधीचा करार करण्यात आला आहे. काही महिन्यांपूर्वी टाटा ग्रुपने या विमान वाहतूक कंपनीला अधिकृतपणे खरेदी केलेले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >> विश्लेषण : आपल्या विनोदबुद्धीमुळे कित्येकांचा रोष ओढवून घेणाऱ्या, वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या कुणाल कामराविषयी जाणून घ्या

एअर इंडिया आपल्या ताफ्यात कोणत्या विमानांचा समावेश करणार?

एअर इंडिया आपल्या ताफ्यात २१ एअरबस ए ३२० निओ विमान, ४ एअर ए ३२१ निओ विमान, आणि ५ बोईंग ७७७-२०० आरएल वाईड बॉडी विमानांचा समावेश करणार आहे. येणाऱ्या काही महिन्यांत ही विमाने वाहतुकीसाठी सज्ज असतील.

हेही वाचा >> विश्लेषण : २०२४ मध्ये मोदींना आव्हान देणारा नेता कोण? कोणते आहेत पर्याय?

सध्या एअर इंडियाकडे किती विमाने आहेत?

नव्याने ३० विमाने भाडेत्त्वावर खरेदी केलेल्या एअर इंडियाचा २५ टक्क्याने विस्तार होईल. सध्या एअर इंडियाकडे एकूण ७० नॅरो बॉडी विमाने आहेत. त्यापैकी ५४ सेवेत कार्यरत आहेत. तसेच एअर इंडियाकडे ४३ वाईड बॉडी विमाने आहेत. यापैकी ३३ कार्यरत आहेत. कार्यरत नसलेली विमाने आगामी वर्षाच्या सुरुवातीला सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >> विश्लेषण : ओव्हल क्रिकेट मैदानावर आता प्रिन्स विल्यम यांची मालकी; जाणून घ्या नेमके कसे?

नवी विमाने कोणकोणत्या देशात वाहतुकीची सेवा पुरवीली जाणार ?

एअर इंडियाच्या ताफ्यात बोईंग ७७७-२०० आएलएस हे विमाने डिसेंबर २०२२ पर्यंत ताफ्यात सामील होण्याची शक्यता आहे. ही विमाने सेवेत दाखल झाल्यानंतर देशातील मेट्रो शहरं ते अमेरिका असा प्रवास करतील. मुंबई-सॅन फ्रान्सिस्को, मुंबई- न्यू यॉर्क आंतरराष्ट्रीय विमानतळ, न्यूयॉर्क लिबर्टी येथे ही विमाने प्रवास करतील. तर बंगळुरु-सॅन फ्रान्सिस्को अशी सेवा आठवड्यातून तीन वेळा दिली जाईल. एअर नॅरो बॉडी असलेली विमाने ताफ्यात दाखल झाल्यानंतर एअर इंडिया ही कंपनी इंडिगो, विस्तारा, स्पाईस जेड, आकासा एअर, गो फस्ट या विमान वाहतूक कंपन्यांना प्रतिस्पर्धक ठरणार आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Air india will include 30 aircraft in next few months know about fleet expansion prd
First published on: 13-09-2022 at 16:57 IST