Treatment for Chemotherapy hair loss: एखाद्या आजारामुळे शरीरात होणारे बदल हे रुग्णांसाठी फार अवघड असतात. कर्करोग रुग्णांसाठी केमोथेरपीदरम्यान केस गळणे हा उपचारांच्या सर्वांत भावनिकदृष्ट्या कठीण भागांपैकी एक असतो. बहुतेक रुग्णांसाठी त्यांचे केस हा केवळ शरीराचा भाग नाही, तर त्यांची ओळख, आत्मविश्वास आणि आकर्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचे असतात. त्यामुळेच कर्करोग रुग्णांसाठी कोल्ड कॅप्स प्रत्येक रुग्णालयात साधारणपणे वापरल्या जात आहेत.

शेफिल्ड हॅलम विद्यापीठातील संशोधकांनी विकसित केलेली एक नवीन पद्धत सध्याच्या स्कॅल्प कूलिंग तंत्रज्ञानावर आधारित आहे, ज्याला कोल्ड कॅप्स, असेही म्हणतात. त्यामध्ये टॉपिकल अँटी-ऑक्सिडंट्स लोशनचा समावेश आहे. लाल द्राक्षांमध्ये आढळणाऱ्या घटकांचा वापर करून, टाळू थंड करण्यासाठी या लोशनचा वापर केला जातो. हे लोशन नक्की काय आहे आणि ते कसे काम करते हे जाणून घेऊ…

केमोथेरपीमुळे केस का गळतात?

केमोथेरपीदरम्यान केस गळणे हा केवळ एक दुष्परिणाम नाही, तर बहुतेकदा कर्करोगाचा अनुभव दृश्यमान करणारा असतो. शेफिल्ड हॅलम विद्यापीठातील सेल बायोलॉजीचे सहायक प्राध्यापक व ट्रान्स्फॉर्मिंग लाइव्हज फेलो डॉ. निक जॉर्जोपौलोस यांना कर्करोगाचा चेहरा, असे म्हटले जाते.

लोकांचे केस गळण्याचे कारण म्हणजे केसांच्या मूळाशी वेगाने विभाजित होणाऱ्या पेशी असतात, ज्यांना केमोथेरपी औषधांची विषाक्तता प्रत्यक्षात जाणवत असते, असे त्यांनी स्पष्ट केले. केमोथेरपीदरम्यान दिली जाणारी औषधे अशी आहेत, जी वेगाने विभाजित होणाऱ्या कर्करोगाच्या पेशींना मारतात. मात्र, ते कर्करोगाच्या पेशी आणि शरीरातील सामान्य पेशींना वेगाने विभाजित करणाऱ्यांमध्ये फरक करू शकत नाही, असेही ते म्हणाले.

आपल्या केसांच्या फॉलिकल्सच्या (केस आणि त्वचेच्या पेशी) तळाशी हे वेगाने विभाजित होणाऱ्या पेशी केराटिनोसाइट्स असतात. ते सतत वाढतात आणि खरे केस बनवतात. त्यामुळे उपचार सुरू केल्यानंतर काही आठवड्यांतच अनेक रुग्णांना केस पातळ होणे किंवा गळणे अशा समस्या दिसू लागतात. हे कमी करण्यासाठी सध्या उपलब्ध असलेल्या उपायांपैकी एक म्हणजे स्कॅल्प कूलिंग कॅप. हे कोल्ड कॅप्स केमोथेरपी सत्रादरम्यान स्कॅल्पचे तापमान कमी करतात, रक्तवाहिन्या अरुंद करतात आणि फॉलिकल्सपर्यंत पोहोचणाऱ्या विषारी औषधांचे प्रमाण कमी करतात. त्यामुळे केस निर्माण करणाऱ्या पेशींची क्रिया मंदावते.

कोल्ड कॅप्समुळे अनेक रुग्णांना त्यांचे केस वाचवण्यात मदत झाली असली तरी ते सर्वांसाठी तितकेच प्रभावी नाहीत. त्याचे परिणाम वापरल्या जाणाऱ्या केमोथेरपी औषधांवर, कूलिंग कॅप किती काळ लावली जाते. तसेच ते टाळूच्या आकारावर, तसेच केसांच्या जाडीवर अवलंबून असतात.

नवीन उपचारामार्फत नेमके काय होते?

शेफिल्ड हॅलम विद्यापीठातील संशोधकांनी विकसित केलेली ही नवीन पद्धत सध्याच्या स्कॅल्प कूलिंग तंत्रज्ञानावर आधारित आहे आणि त्यात टॉपिकल अँटी-ऑक्सिडंट लोशनचा समावेश आहे. या लोशनमध्ये रेझवेराट्रोल आणि एन-एसिटील सिस्टीनसारखी संयुगे आहेत. ही दोन्ही अँटी-ऑक्सिडंट्स आहेत. विशेष बाब म्हणजे रेझवेराट्रोल लाल द्राक्षांमध्येही आढळते. त्याच्या संभाव्य आरोग्याच्या फायद्यांसाठी त्याचा बराच काळ अभ्यास केला गेला आहे. फ्रंटियर्स फार्माकॉलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात संशोधकांनी टाळूपासून केसांचे कूप वेगळे केले आणि त्यावर प्रयोगशाळेत प्रयोग केले गेले. त्यानंतर त्याचे हुबेहूब परिणाम येण्यासाठी त्यांच्यावर केमोथेरपी औषधांनी उपचार केले गेले.

ठळक मुद्दे:

  • कर्करोग रुग्णांसाठी कोल्ड कॅप्स सध्या वापरल्या जात आहेत
  • शेफिल्ड हॅलम विद्यापीठातील संशोधकांनी विकसित केलेली एक नवीन पद्धत
  • लाल द्राक्षांमध्ये आढळणाऱ्या घटकांचा वापर लोशन तयार करण्यासाठी केला
  • टाळू थंड करण्यासाठी या लोशनचा वापर केला जातो
  • कोल्ड कॅप्स लर्च रूग्णांसाठी तितक्याशा प्रभावी नाहीत
  • अँटीऑक्सिडंट लोशनचा वापर करून पथकाला प्रयोगशाळेत सकारात्मक परिणाम दिसून आले

या संशोधनाचे नेतृत्व करणाऱ्या डॉ. निक जॉर्जोपौलोस यांनी सांगितले, “या प्रयोगात वापरलेले लोशन फरक दाखवू शकते. काही रुग्णांसाठी थंडावा काम करतो, तर काहींसाठी तो काम करत नाही. कारण- काहींचे डोके पुरेशा प्रमाणात थंड होत नाही.”

थंड होण्याच्या प्रक्रियेदरम्यान अँटीऑक्सिडंट लोशनचा वापर करून पथकाला प्रयोगशाळेत सकारात्मक परिणाम दिसले. असं असताना हे लोशन केवळ पुरेसं नाही. फक्त लोशन वापरल्यानं अँटी-ऑक्सिडंट्स पुरेसे नाहीत. त्याचं कारण म्हणजे थंडपणा एकाच वेळी वेगवेगळे परिणाम दाखवू शकतो, असंही त्यांनी सांगितलं. संशोधानात असं आढळलं की, १८ अंश सेल्सिअस तापमानापर्यंत टाळू थंड केल्यानं केसांच्या फॉलिकल्सचं नुकसान टाळण्यास मदत होते; तर सौम्य तापमान सुमारे २६ अंश सेल्सिअसमध्ये ते तितकंसं प्रभावी नाही. अँटी-ऑक्सिडंट मिश्रणासह योग्य तापमानाचं एकत्रीकरण केल्यानं कूप संरक्षणात लक्षणीय सुधारणा झाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केमोथेरपीच्या रुग्णांसाठी कूलिंग कॅप्स तयार करणारी कंपनी पॅक्समन स्कॅल्प कूलिंगसोबतही या पथकानं काम केलं, केमोथेरपीच्या ३० मिनिटे आधी उपचारादरम्यान आणि त्यानंतर ९० मिनिटांपर्यंत रुग्णांनी घातलेल्या फिटेड कॅपद्वारे हे कॅप्स शीतकरण द्रव प्रसारित करतात. भविष्यातील चाचणीसाठी या स्थानिक उत्पादनात कोणते अँटी-ऑक्सिडंट्स वापरायचे हे संशोधक अद्याप निश्चित करीत आहेत. जॉर्जोपौलोस यांचा असा विश्वास आहे की, हे एकत्रीकरण उपचारादरम्यान केवळ केसांचं जतनच करीत नाही, तर नंतर केसांची पुन्हा वाढदेखील करू शकतं.