जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर शुक्रवारी झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर चीनमध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आल्याचे वृत्त आहे. शिंजो आबे यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. या हल्ल्याबाबत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दु:ख व्यक्त ट्वीट केले आहे. ‘माझे प्रिय मित्र आबे शिंजो यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे मला खूप दुःख झाले आहे’,असे ट्वीट करत मोदींनी भारतात एक दिवसाचा दुखवटा जाहीर केला आहे.
एकीकडे शिंजो आबे यांच्या निधनाने दु:ख करण्यात येत आहे तर दुसरीकडे मात्र, चीनमध्ये शिंजो यांच्या निधनाने आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे. चीनी लोग आपल्या सोशल मीडियावर शिंजो आबे यांच्या मृत्यूची पोस्ट शेअर करत असून आबे यांची हत्या करणाऱ्या आरोपीला चीनच्या लोकांनी ‘हिरो’ म्हटले आहे.

Continue reading this story with Loksatta premium subscription
Already a subscriber? Sign in

हेही वाचा- विश्लेषण : शिंजो आबेंवर गोळ्या झाडणारा तोमागामी तेत्सुआ कोण आहे? जाणून घ्या JMSDF म्हणजे नेमकं काय?

जपानच्या अर्थव्यवस्थेत शिंजो आबे यांचे योगदान

जपानच्या अर्थव्यवस्थेच्या बळकटीसाठी शिंजो आबे यांचे महत्त्वाचे योगदान मानले जाते. मात्र, चीनच्या लोकांना शिंजो आबे यांचा चेहरा आवडत नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आबे यांच्या मृत्यूनंतर चीनमधील नागरिक आनंद साजरा करत आहेत. एवढचं नाही तर शिंजो आबे यांची हत्या करणाऱ्या आरोपीला चीनच्या लोकांनी आपला हिरो मानले आहे.

शिंजो आबे यांच्या मृत्यूनंतर चीनमध्ये आनंदोत्सव

चिनी नागरिक त्यांच्या पोस्टमध्ये सेलिब्रेशन करताना ‘वन प्लेट मोर राइस’ म्हणजे एक ताट जास्त भात खाण्याबाबत बोलत आहेत. त्याचवेळी, काहींनी म्हटले की, ‘आम्ही आशा करतो की सध्याचे जपानचे पंतप्रधान आणि दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष यांच्याबाबतही अशीच स्थिती होईल.’ या हल्ल्यानंतर चीनचे नागरीक एकमेकांच अभिनंदन करत आहेत. तसेच आम्ही शिंजो आबे यांच्या मृत्यूची वाट बघत होतो, अशी भावना काही चीनी नागरीकांनी व्यक्त केली आहे.

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा- विश्लेषण : भारताला बुलेट ट्रेनची भेट ते पद्मविभूषण पुरस्कार; शिंजो आबे यांचे भारताशी होते खास नाते

गोळीबारात शिंजो आबेंचा मृत्यू

पश्चिम जपानमधील नारा शहरामध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ६७ वर्षीय आबे भाषण देत असताना त्यांच्यावर अज्ञात हल्लेखोराने गोळीबार केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या आबे यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र डॉक्टारांनी अनेक प्रयत्न करुनही त्यांची मृत्यूशी सुरु असणारी झुंज पाच तासांनी संपली. भारतीय वेळेनुसार दुपारी १ वाजून ३३ मिनिटांनी म्हणजेच हल्ल्यानंतर दोन तासांनी आबे यांचा मृत्यू झाल्याची माहिती नारा मेडिकल युनिव्हर्सिटी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी दिली.आबे यांच्या मानेजवळ गोळी लागली होती. त्यांच्या शरीरावर गोळीमुळे झालेल्या दोन जखमा होत्या. अती रक्तस्त्राव झाल्याने आबे यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

शिंजो आबे यांच्या हत्येचे कारण

मिळालेल्या माहितीनुसार शिंजो आबे यांच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराचे नाव यामागामी तेत्सुआ असे असून तो ४१ वर्षीय आहे. तो जपान मेरिटाईम सेल्फ डिफेन्स फोर्स अर्थात जेएमएसडीएफचा माजी सदस्य आहे. याव्यतिरिक्त त्याने जपानमधील एका स्थानिक विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम केलेले आहे. आपण शिंजो आबे यांच्यावर असामाधानी होतो, त्यामुळे त्यांची हत्या करण्याची इच्छा होती असा खुलासा यामागामी तेत्सुआ केला आहे.

सुरक्षित देशांपैकी एक जपान

जपान जगातील सर्वात सुरक्षित देशांपैकी एक मानला जातो. येथे बंदूक नियंत्रणाचे कडक कायदे आहेत. अशा परिस्थितीत माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावरील हा हल्ला धक्कादायक आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Celebrations are being held in china after the death of shinzo abe dpj
First published on: 08-07-2022 at 20:04 IST