scorecardresearch

छठ पूजा: हा बिहारचा महत्त्वाचा सण का आहे?

छठ पूजा म्हणजे काय आणि ती का साजरी केली जाते? छठी मैया कोणती देवता आहे? छठ बिहारी लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय का आहे?

chhath puja
छठ पूजा

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी छठ पूजेसाठी नागरिकांना शुभेच्छा दिल्या. १९ नोव्हेंबर हा या वर्षीच्या छठ उत्सवाचा तिसरा दिवस होता आणि या सणाची सांगता आज होणार आहे. बिहार, पूर्व उत्तर प्रदेश आणि नेपाळच्या काही भागात शतकानुशतके छठ साजरी केली जाते, परंतु गेल्या दशकात किंवा त्याहून अधिक काळापासून देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी हा सण साजरा होत असल्याचे चित्र आहे. टेम्स किंवा पॅसिफिक महासागराच्या काठावरही दरवर्षी छठ साजरी होत असल्याची दृश्ये अनेक वृत्तवाहिन्यांनी दाखविली आहेत.

छठ का साजरी केली जाते काय आहे त्यामागील विश्वास?

छठ पूजा हा सूर्याच्या उपासनेचा चार दिवसांचा मोठा उत्सव आहे, या कालावधीत निर्जळी उपवास केला जातो. तसेच उषा आणि प्रत्युषेला, उगवत्या आणि मावळत्या सूर्याला पाणवठ्यात उभे राहून अर्ध्य देणे, नैवेद्य अर्पण करणे समाविष्ट आहे. छठ का साजरी केली जाते याबद्दल अनेक समजुती प्रचलित आहेत. माणसाने निसर्गाची उपासना केली त्या काळापासून ही प्रथा चालत आलेली आहे, असे काही अभ्यासकांचे मत आहे. तर काही जण प्रभू राम आणि देवी सीता लंकेतून अयोध्येत विजयी होऊन परतल्यानंतर त्यांनी सूर्यदेवासाठी उपवास आणि यज्ञ केला तेंव्हापासून ही प्रथा अस्तित्त्वात आल्याचे मानतात. याशिवाय प्रचलित समजुतींनुसार ही प्रथेला महाभारतापासून सुरुवात झाली असे मानतात. महाभारतात, पांडव वनवासात असताना, द्रौपदी धौम्य ऋषींकडे मदतीसाठी गेली, त्यांनी तिला उपवास आणि सूर्याची प्रार्थना करण्याचा सल्ला दिला आणि अखेरीस, तिच्या सर्व प्रार्थनांचे फळ तिला मिळाले. त्याच महाकाव्यात कर्णानेही त्याचे वडील सूर्य यांच्या सन्मानार्थ एका विस्तृत समारंभाचे आयोजन केले होते म्हणून छठ पूजा सुरु झाल्याचे सांगितले जाते.

education department
जातीय संघर्षांबरोबरच पक्षफुटीलाही निमंत्रण!
Favourite Zodiac Signs of Lord Ganesha
गणपतीच्या प्रिय राशी कोणत्या? ‘या’ लोकांवर नेहमी असते बाप्पाची कृपा; जाणून घ्या, ज्योतिषशास्त्र काय सांगते…
womens sexual desire feminist perspectives on sex cultural suppression of female sexuality
ग्रासरूट फेमिनिझम : ‘अंग झिम्माड झालं, हिरव्या बहरात..’
upsc mpsc essential current affairs
यूपीएससी सूत्र : समलैंगिक विवाह कायदा, भारत-इंडिया वाद अन् बरंच काही…

अधिक वाचा: Diwali 2023: दिवाळीत फटाके वाजविणे ही खरंच भारतीय प्राचीन परंपरा आहे का?

बिहारमधील छठ

आज, छठ हा बिहारमधील धार्मिकतेचे प्रतीक असलेला एक मोठा सण आहे. या कालखंडात काही लोक उपवास करतात, तर इतर संपूर्ण समाज हा उत्सव यशस्वी करण्यात सहभागी असतो. नदीचे पात्र आणि त्या काठापर्यंत जाणारे रस्ते स्वच्छ करणे, धार्मिक विधींसाठी आवश्यक असलेल्या सर्व छोट्या छोट्या गोष्टी गोळा करणे तसेच ठेकुआ, प्रसाद तयार करणे. ठेकुआ हा बिहारी पदार्थ आहे, जो प्रसादासाठी तयार करण्यात येतो. याशिवाय छठला इतर सणांपेक्षा वेगळे करणारी अनेक कारणे आहेत.

छठ कशी साजरी केली जाते?

छठ पूजा कार्तिक महिन्याच्या सहाव्या दिवशी साधारणपणे ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये सुरू होते. काही लोक चैत्र महिन्यात (एप्रिलमध्ये) साजरी करतात, ज्याला चैती छठ म्हणतात. छठी मैय्या किंवा माता छठी, सूर्याची बहीण आहे, ती एक कठोर परंतु उदार देवता मानली जाते. चार दिवसांच्या उत्सवाचे नियम अत्यंत कठोर असले तरी, जो कोणी ते सर्व यशस्वीपणे पाळतो त्याला अफाट आध्यात्मिक लाभ मिळतो, अशी धारणा आहे.
उत्सवाच्या पहिल्या दिवसाला ‘नाहा खा’ असे म्हणतात, उपवास करणारे नदी, तलाव किंवा समुद्रात (नाहाना) औपचारिक स्नान केल्यानंतरच जेवतात. जलाशयातून आणलेल्या पाण्याचा वापर चुली तयार करण्यासाठी केला जातो आणि उर्वरित कालावधीत उपवास करणाऱ्यांसाठी जेवण तयार केले जाते. अंघोळीनंतरच्या जेवणात भोपळ्याची भाजी असते. ज्यांना पाणवठ्यावर जाता येत नाही त्यांनी घरातच सर्व विधींचे पालन करणे सुरू केले आहे.

खरना

दुसर्‍या दिवसाला ‘खरना’ म्हणतात, या दिवशी उपवास करणारा रात्री एकवेळचे जेवण जेवतो ज्यात रोटी आणि खीर (तांदळाची खीर) असते . याच दिवशी मित्र आणि कुटुंब ठेकू तयार करण्यासाठी एकत्र जमतात, जे मूलतः साखर किंवा गूळ घालून तुपात तळलेले पिठाचे गोळे असतात. ठेकुआ, ज्याला खजूर देखील म्हणतात, ते देवतेसाठी योग्य आहेत याची खात्री करण्यासाठी अत्यंत सावधगिरी बाळगून तयार केले जातात. ते देवाला अर्पण केल्यावरच लोक ते खाऊ शकतात. रोटी-खीर जेवणानंतर ३६ तासांचा उपवास सुरू होतो, ज्या दरम्यान भक्त पाणीही पीत नाहीत.

तिसर्‍या दिवशी भाविक पाणवठ्यावर जातात. ज्यांना शक्य नाही ते त्यांच्या घरात तात्पुरता पूल बांधतात. दिवे, रांगोळी आणि उसाच्या देठांनी काठ सजवले जातात. देवाला अर्पण केलेले सर्व प्रसाद ‘रताळे, वॉटर चेस्टनट, पोमेलो, केळी यांसारखी हंगामी फळे’ दिव्यांबरोबर सूपात मध्ये ठेवली जातात. सूर्यास्त होताच, उपवास करणारी व्यक्ती अर्ध्य म्हणून सूप वाढवते. उपवास करणाऱ्याचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य सुपावर दूध किंवा पाणी शिंपतात. याला सांज का अर्ध्य किंवा संध्याकाळचे अर्पण म्हणतात. दुसर्‍या दिवशी, ‘भोर का अर्ध्य’ नावाचा उगवत्या सूर्यासाठी, पहाटेच्या वेळी विधी केला जातो. त्यानंतर देवतेकडे कृतज्ञता व्यक्त करून भाविक घरी येतात.

अधिक वाचा: इस्रायलची निर्मिती: ब्रिटिश का ठरले पॅलेस्टाईनच्या फाळणीस कारणीभूत?

छठ अद्वितीय कशामुळे?

पूर्वेकडील लोकांच्या हृदयात या सणाचे विशेष महत्त्व आहे. या उत्सवाच्या कालखंडात समाज एकत्र येतो. दूर देशी गेलेले आप्तजन, स्वकीय मायदेशी परततात. हे व्रत कोणतीही व्यक्ती करू शकते, यासाठी जातीचे बंधन नसते. यात कोणतेही पुजारी सहभागी नसतात, भक्त थेट उपवास करतात आणि उघड देवाची उपासना, त्यामुळे या सणाच्या माध्यमातून समानता प्रकट होते. देवतेला दिलेला नैवेद्य हा हंगामी, स्थानिक पातळीवर उत्पादित आणि त्यामुळे सहज उपलब्ध होणार्‍या फळांचा असतो. विशेष म्हणजे अनेकांना न आवडणाऱ्या भोपळ्याच्या भाजीचा नेवैद्य देवतेसाठी तयार केला जातो. पर्यायाने सर्वांनाच ही भाजी खावी लागते. छठचा उपवास स्त्री-पुरुष दोघेही करतात. इतर व्रतांप्रमाणे केवळ स्त्रियांना हे बंधनकारक नाही.

या उत्सवात तुम्ही कितीही श्रीमंत किंवा गरीब असलात तरी नियम सर्वांसाठी सारखेच असतात आणि सणाचे यश तुम्ही किती निष्ठेने नियम पाळता यात आहे, तुम्ही ते कोणत्या प्रमाणात पाळता यावर नाही.
शेवटचा, आणि सर्वात महत्त्वाचा, हा सणामागील संदेश म्हणजे ईश्वराची भक्ती आणि कृपादृष्टी सर्वांसाठी समान आहे. आपण निसर्गामुळे आहोत, या सणातून निसर्गाचा सन्मान केला जातो, ही महत्त्वाची बाब आहे. –

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Chhath puja why is it an important festival of bihar svs

First published on: 20-11-2023 at 09:42 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×