-राखी चव्हाण

हवामान बदलाचे लोकांवर होणारे परिणाम पाहणाऱ्या आयपीसीसी पॅनल कार्यगटाच्या दोन अहवालांत वसाहतवादाला केवळ हवामान संकटाचा चालक म्हणूनच नाही तर समुदायांची असुरक्षितता वाढवणारी एक सततची समस्या म्हणूनदेखील सूचीबद्ध करण्यात आले आहे. सुमारे तीन दशकानंतर आयपीसीसीच्या सहाव्या मुल्यांकन अहवालात अखेर वसाहतवाद हा शब्द आला. जगभरातील अधिकारी आणि शास्त्रज्ञ उष्णतामान वाढवण्यात वसाहतवादाची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे सांगतात. मागील वर्षी कॉप-२६ परिषदेत ब्राझिलियन कार्यकर्ता टेली टेरेना यांच्यासह त्यांच्या काही सहकाऱ्यांनी हवामानबदलास वसाहतवाददेखील कारणीभूत असल्याचे म्हटले होते.

Loksatta kutuhal Creator of artificial intelligence Judea Perl
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेचे रचनाकार – ज्युडेया पर्ल
Emphsises on right to be free from the adverse effects of climate change
“नागरिकांना हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांपासून मुक्त होण्याचा अधिकार”; सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयात महत्त्वपूर्ण काय आहे?
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
upsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : सामान्य विज्ञान

वसाहतवाद म्हणजे काय?

वसाहतवाद म्हणजे एखाद्या राज्याच्या लोकांद्वारे दुसऱ्या क्षेत्रात जागा बळकावणे, तिथे स्वतःच्या वसाहती स्थापित करणे, त्या टिकवून ठेवणे, त्यांचा विस्तार करणे होय. जमिनीचे, खनिजांचे, नैसर्गिक संसाधनांचे व स्थानिक लोकांचे शोषण करून स्वतःच्या राज्याची समृद्धी वाढवणे हा वसाहतवादाचा उद्देश असतो. वसाहतवादातून नंतर साम्राज्यवादाचा उदय झाला. वसाहतवादात थोड्या लोकांचे बहुतांवर राजकीय व आर्थिक नियंत्रण असते. आपली वांशिक व सांस्कृतिक श्रेष्ठता दाखवण्याचे वसाहतवादी राष्ट्राकडून प्रयत्न होतात. युरोपातील प्रगत राष्ट्रांनी अविकसित राष्ट्रांवर वसाहतवाद लादून आपली प्रगती करून घेतली.

वसाहतवादाची सुरुवात कधी झाली?

वसाहतवादाची सुरुवात १४५० च्या सुमारास झाली आणि तो १९७० पर्यंत वेगाने वाढत गेला. या कालावधीत मजबूत राष्ट्रांनी कमकुवत राष्ट्रे आपल्या ताब्यात घेण्यास सुरुवात केली. स्पेन, ब्रिटन, फ्रान्स, पोर्तुगाल, नेदरलँड्स या देशांनी आशिया, अफ्रिका आणि काही इतर क्षेत्रांमध्ये त्यांच्या वसाहती स्थापण्यास सुरुवात केली. या बलवान राष्ट्रांनी नैसर्गिक आणि मानवी संसाधनांचे वरदान असलेल्या देशांमध्ये वर्चस्व प्रस्थापित करत शोषण केले. त्यामुळे तेथील नैसर्गिक संसाधने नष्ट झाली. या नैसर्गिक संसाधनांमध्ये शेती, जंगल आदीचा समावेश आहे. ते नष्ट झाल्यामुळे त्याचा परिणाम हवामान बदलाच्या रूपाने समोर आला.

वसाहतवादामुळे पर्यावरणीय व आर्थिक नुकसान कोणते?

वसाहतवादामुळे वैयक्तिक आणि समुदायातील संबंध विस्कळीत झाले. जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये जागतिक हवामान बदल आणि घटणारी संसाधने यांच्याद्वारे वाढती पर्यावरणीय आपत्ती अनुभवली जात आहे. स्थानिक शेतकऱ्यांच्या पीक उत्पादनावर विसंगत हवामानाचा सर्वाधिक परिणाम झाला आहे. वसातहवादामुळे परिसंस्था नाहीशा झाल्याने त्याचा परिणाम हवामानावर जाणवत आहे.

वसाहतवादावर आयपीसीसी काय म्हणते?

भूतकाळातील आणि आजही हवामानावर वसाहतवादाचा होणारा परिणाम आधीच मान्य करायला हवा होता. वसाहतीकरणामुळे परिसंस्थेमध्ये गडबड झाली आहे, कारण वसाहतवाद्यांनी वनस्पती आणि प्राणी यांचे शोषण केले होते. याच वसाहतवाद्यांनी युरोपमध्ये असे रोग आणले ज्याचा हवामानावरही मोठा परिणाम झाला. प्रदूषण, जंगलतोड हे आजही आपल्याला जाणवणारे परिणाम आहेत. वसाहतवाद आजही हवामान बदलामध्ये भूमिका बजावते. 

आयपीसीसीच्या अंतिम अहवालात कोण सहभागी?

आयपीसीसीमध्ये मागील अहवालांपेक्षा अधिक सामाजिक शास्त्रज्ञ, रंगांचे शास्त्रज्ञ, महिला वैज्ञानिकांचा समावेश आहे. मॉडेल आणि डेटाऐवजी इतिहास आणि समाजाशी अधिक व्यवहार करणाऱ्या संशोधकांना यात सहभागी करुन घेण्यात आले.