२०२४ साली अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरण्याची शक्यता आहे. त्यासाठी त्यांनी तयारीदेखील सुरू केली आहे. दरम्यान, एकीकडे ते राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीची तयारी करत आहेत, तर दुसरीकडे मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर वेगवेगळे गंभीर आरोप करण्यात आले असून ते कायद्याच्या कचाट्यात सापडले आहेत. असे असतानाच २०२० सालच्या निवडणुकीतील पराभव टाळण्यासाठी त्यांनी थेट निकाल बदलण्याचा कट रचल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणी त्यांच्याविरोधात आरोप निश्चित करण्यात आले आहेत. दरम्यान, ट्रप्म यांच्याविरोधात नेमके काय आरोप आहेत? त्यावर ट्रम्प यांची काय भूमिका आहे, हे जाणून घेऊ या…

निवडणुकीचा निकाल बदलण्याचा कट रचल्याचा आरोप

याआधी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर दोन गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत. २०१६ साली राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पॉर्नस्टार स्टॉर्मी डॅनियलला तोंड बंद ठेवण्यासाठी त्यांनी पैसे दिले होते असे म्हटले जाते. यासह देशाचे संवेदनशील आणि महत्त्वाचे दस्ताऐवज ट्रम्प यांच्या निवासस्थानी आढळलेले आहेत. याप्रकरणीदेखील त्यांच्याविरोधात खटला सुरू आहे. त्यानंतर आता ट्रम्प यांच्यावर २०२० सालच्या निवडणुकीत पराभव टाळण्यासाठी कट रचल्याचा आरोप करण्यात आलेला आहे.

donald trump accept of not disclosing correct value of the assets
“डोनाल्ड ट्रम्प यांनी २०१६ च्या निवडणुकीत भ्रष्टाचारासाठी कट रचला”, हश मनी प्रकरणात सरकारी वकिलांचा आरोप
इंडिया सत्तेत आल्यास ‘सीएए’ रद्द करणार! माकपच्या टीकेवर चिदम्बरम यांचा खुलासा
prashant kishor
“…तर राहुल गांधींनी राजकारणातून बाजूला व्हावं”, प्रशांत किशोर यांचा सल्ला
Environment
निवडणुकीच्या जाहीरनाम्यात पर्यावरणाचा समावेश करावा, पर्यावरणप्रेमींचे निवडणूक आयोगाला पत्र

ट्रम्प यांच्यावर एकूण चार आरोप

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर ‘फेडरल ग्रॅण्ड ज्युरी’ने निवडणुकीचा निकाल बदलण्यासाठी कट रचल्याप्रकरणी आरोप निश्चित केले आहेत. अमेरिकेची फसवणूक करण्याचा कट रचणे, साक्षीदारांवर दबाव टाकणे, नागरिकांच्या हक्कांविरोधात कट रचणे, अधिकृत कार्यवाहीमध्ये अडथळा आणणे; असे चार आरोप ट्रम्प यांच्यावर करण्यात आलेले आहेत. ट्रम्प यांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळले आहेत.

बनावट मतांसाठी रचला होता कट?

ट्रम्प यांनी अमेरिकेतील एकूण सात राज्यांतील मतदानात बनावट मतदारांचा समावेश करून २०२० सालाची निवडणूक जिंकण्यासाठी बनावट मतं ग्राह्य धरली जावीत, तसेच ही मते अधिकृत असल्याचे म्हणत ते शासकीय अधिकाऱ्यांनी मान्य करावे, यासाठी कट रचला होता असा आरोप केला जातो. या सातही राज्यांत ट्रम्प यांचा पराभव झाला होता. आरोपीने अधिकाऱ्यांना आपल्या विरोधातील नेत्याला मिळालेली काही मतं ग्राह्य न धरण्यास भाग पाडले. त्यामुळे लाखो मतदार आपल्या अधिकारांपासून वंचित राहिले, असा आरोपही ट्रम्प यांच्यावर करण्यात आला आहे.

ट्रम्प यांच्यासोबत सहा सहआरोपी?

ट्रम्प यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपपत्रात ट्रम्प यांच्यासोबत आणखी सहा जणांनी हा कट रचला होता, असा दावा करण्यात आलेला आहे. मात्र, आरोपपत्रात त्यांची नावे देण्यात आलेली नाहीत. प्रत्यक्ष नाव देण्यात आले नसले तरी आरोपपत्रात कटात सामील असलेल्यांचे वर्णन करण्यात आले आहे. या वर्णनानुसार काही बाहेरचे (ट्रम्प यांना सल्ला देणाऱ्या गटात नसलेले) वकील, सल्लागार या कटात सहभागी आहेत.

ट्रम्प यांनी २०२० सालातील राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा निकाल नाकारण्यासाठी कट रचला होता. मात्र, या निवडणुकीत घोळ झाल्याचा ट्रम्प यांचा दावा प्रभावी नसल्याचे त्यांच्या सल्लागारांनी सांगितले होते. त्यानंतर सत्तेत कायम राहण्यासाठी त्यांनी ‘विदेशी षड्यंत्र सिद्धांत’ मांडण्यास इच्छुक असणाऱ्या वकिलांशी संपर्क साधला होता, असा दावा आरोपपत्रात करण्यात आलेला आहे. दरम्यान, या कटात सहभागी असलेल्या कोणकोणत्या व्यक्तींना सहआरोपी करण्यात येईल, हे अद्याप अस्पष्ट आहे.

कटास सहकार्य करण्याचा पेन्स यांच्यावर दबाव

२०२० सालच्या निवडणूक मतदानादरम्यान ट्रम्प यांनी माईक पेन्स यांच्यावरही दबाव टाकल्याचे सांगण्यात येत आहे. २५ डिसेंबर २०२० रोजी पेन्स यांनी ट्रम्प यांना ख्रिसमसच्या शुभेच्छा देण्यासाठी फोन कॉल केला होता. यासह २०२१ सालच्या जानेवारी महिन्यात ट्रम्प यांनी पेन्स यांना ‘तुम्ही निवडणुकीचा निकाल नाकारू शकता’, असे साधारण तीन वेळा सांगितले होते. मात्र, प्रत्येक वेळी पेन्स यांनी असे करण्यास नकार दिला होता. यावेळीदेखील ट्रम्प आणि पेन्स यांच्यात निवडणुकीच्या निकालाबाबत संवाद झाला होता. मात्र, पेन्स यांनी ट्रम्प यांना नकार दिला होता.

६ जानेवारीच्या हिंसाचाराचा ट्रम्प यांनी फायदा घेतला?

राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव झाल्याने त्यांच्या समर्थकांनी ६ जानेवारी २०२१ रोजी धुडगूस घालत हिंसाचार केला होता. या हिंसाचारादरम्यान ट्रम्प यांच्या समर्थकांनी वॉशिंग्टनमधील कॅपिटॉल इमारतीत घुसत तोडफोड केली होती. त्यावेळी ट्रम्प यांनी आपल्या समर्थकांना भडकावण्याचे काम केले होते. एकीकडे निवडणूक अधिकारी निवडणुकीचा निकाल जाहीर करत होते, तर दुसरीकडे ट्रम्प यांचे समर्थक वॉशिंग्टनमधील कॅपिटॉल इमारतीसमोर जमून तोडफोड करत होते. डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांच्या सल्लागारांनी या समर्थकांना कॅपिटॉल इमारातीच्या परिसरातून बाहेर पडण्याचे आवाहन करावे, असा सल्ला दिला होता. मात्र, ट्रम्प यांनी तसे आवाहन करण्यास नकार दिला होता, असेही या आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे.