Donald Trump On Harvard University :अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हार्वर्ड विद्यापीठाच्या मागे धावत असल्याच्या अफवा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या अफवांमागे एक महत्त्वाचं कारण असल्याची चर्चा आहे आणि ती म्हणजे त्यांचा धाकटा मुलगा बॅरन ट्रम्प याला आयव्ही लीग स्कूलने प्रवेश नाकारला होता. ही अफवा पसरल्यानंतर मेलानिया ट्रम्प यांनी लगेचच या अफवेला पूर्णविराम दिला. मेलानिया यांनी बॅरनने याआधी कधीही हार्वर्डमध्ये अर्ज केला नव्हता. त्यानंतर आता एक नवीन बाब समोर आली आहे, ती म्हणजे लेखक मायकेल वोल्फ यांनी म्हटले आहे की, विद्यापीठाविरुद्ध ट्रम्प यांचा द्वेष कदाचित आणखी कोणत्याही कारणापेक्षा वैयक्तिक जास्त असू शकतो.

वोल्फ यांच्या मते, ट्रम्प यांचा राग बॅरनच्या अस्तित्वात नसलेल्या नकारामुळे नाही, तर ट्रम्प स्वत:देखील कधीही हार्वर्डमध्ये पोहोचू शकले नाहीत या वस्तुस्थितीमुळे आहे. तसेच ट्रम्प यांचा उच्चभ्रू संस्थेशी असलेला संघर्ष खरंच त्यांच्या स्वत:च्या भूतकाळाबाबत आहे का? वोल्फ यांनी नक्की काय म्हटले आहे? व्हाईट हाऊस या दाव्याबाबत कसा प्रतिसाद देत आहे? ते जाणून घेऊ…

ट्रम्प यांना आयव्ही लीगबाबत नाराजी आहे का?

जोआना कोल्स यांनी त्यांच्या द डेली बीस्ट पॉडकास्टचा एक भाग नुकताच प्रसिद्ध केला. त्यामध्ये त्यांनी ट्रम्प यांच्या उच्चभ्रू विद्यापीठांबद्दलच्या स्पष्ट शत्रुत्वावर भाष्य केले. कोल्स यांनी यावेळी नमूद केले की, ट्रम्प यांच्या आजूबाजूला किती जण आयव्ही लीगचे माजी विद्यार्थी आहेत. “हे विचित्र आहे. कारण- डोनाल्ड ट्रम्प यांच्या आजूबाजूचे बरेच जण आयव्ही लीग विद्यापीठांमध्ये गेले आहेत. त्यापैकी बरेच जण हार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये गेले. त्यावर उत्तर देताना वोल्फ यांनी म्हटले, “आयव्ही लीगसंबंधी ट्रम्प यांच्या तिरस्कारामागे वैयक्तिक कारण अधिक प्रमाणात असू शकते. ट्रम्प जे काही करतात, त्याबाबत फार काही हिशोब किंवा नियोजनाचा वापर करणे महत्त्वाचे नाही. पण दुसरी गोष्ट अशी आहे की, ते हार्वर्डमध्ये प्रवेश घेऊ शकले नाहीत. म्हणूनच ट्रम्प यांच्या मनात आयव्ही लीगविरुद्ध कायम द्वेष असावा.”
मायकेल वोल्फ यांनी ‘फायर अँड फ्युरी’, सीज : ट्रम्प अंडर फायर’ व ‘ऑल ऑर नथिंग’ ही पुस्तकं लिहिली आहेत.

ट्रम्प यांनी हार्वर्डमध्ये कधी अर्ज केला होता की नाही याबाबत कोणतेही अधिकृत रेकॉर्ड उपलब्ध नाहीत. त्यांना नाकारण्यात आले होते की नाही हे तर त्याहून दूरच. वोल्फ यांच्या या वक्तव्यामुळे ट्रम्प यांचा आयव्ही लीगबाबतचा द्वेष त्यांच्या स्वतःच्या शैक्षणिक इतिहासात रुजलेला असू शकतो या मुद्द्याला आणखी बळकटी देणारा आहे.

न्यूयॉर्क मिलिटरी अकादमीमध्ये चार वर्षे काम केल्यानंतर ट्रम्प यांनी १९६४ मध्ये फोर्डहॅम विद्यापीठातून महाविद्यालयीन शिक्षण सुरू केले. दोन वर्षांनंतर ते पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातील व्हार्टन स्कूलमध्ये दाखल झाले. तिथे त्यांनी अर्थशास्त्र विषयात पदवी प्राप्त केली. मात्र, ट्रम्प यांच्या शैक्षणिक विश्वासार्हतेवर बराच काळ टीका होत आहे. २०२० मध्ये द वॉशिंग्टन पोस्टने राष्ट्राध्यक्षांच्या भाची मेरी ट्रम्प यांनी बनवलेल्या ऑडिओ रेकॉर्डिंगचा खुलासा केला होता. त्यामध्ये ट्रम्प यांच्या बहिणी, दिवंगत संघीय न्यायाधीश मेरीअॅन ट्रम्प बॅरी यांनी काही धक्कादायक दावे केले होते.

२०१८-१९ च्या रेकॉर्डिंगमध्ये बॅरी म्हणाल्या होत्या, “मी ट्रम्पला कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी न्यूयॉर्क शहरात फिरवले. तो एक वर्षासाठी फोर्डहॅमला गेला आणि नंतर त्याने पेनसिल्व्हेनिया विद्यापीठात प्रवेश घेतला. कारण- त्याने एक परीक्षा दिली होती.” बॅरी यांचा हा दावा त्यावेळी व्हाईट हाऊसने तातडीने फेटाळून लावला आणि इतर कोणी ट्रम्प यांची SAT (शैक्षणिक मूल्यांकन चाचणी) घेतली होती हे खोटे आहे.

त्याबाबत द पोस्टने याबाबत ट्रम्प यांना विचारले असता, त्यांनी फक्त- “कोणाला काळजी आहे?”, असे उत्तर दिले होते.
द न्यूयॉर्क टाइम्सचे रिपोर्टर रॉस बुएटनर व सुझान क्रेग यांच्या माहितीप्रमाणे, २०२४ च्या ‘लकी लूझर, ट्रम्प’ या पुस्तकात सांगितल्याप्रमाणे ट्रम्प फोर्डहॅममध्ये एक सामान्य विद्यार्थी होते. त्यांच्या पहिल्या वर्षात ते डीनच्या यादीतही आले नव्हते, ज्यासाठी फक्त B+ ही ग्रेड आवश्यक असते.

शिक्षण विभागाच्या नागरी हक्क कार्यालयाने ज्यू विद्यार्थ्यांचे संरक्षण करण्यासाठी नागरी हक्क कायद्यांतर्गत यूएससीने (युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्निया) त्यांच्या दायित्वांची पूर्तता करण्यात अपयशी ठरल्यानंतर ट्रम्प यांनी संघीय संशोधन निधीत कपात केली. त्यामुळे संस्थेला १७.५ दशलक्ष डॉलर्स एवढे नुकसान झाले.

‘ट्रम्प शो’

वोल्फ यांनी असा दावा केला की, दया बाळगण्याव्यतिरिक्त ट्रम्प यांची निर्माता म्हणून टीव्ही स्टारची प्रवृत्ती आयव्ही लीग विद्यापीठांविरुद्धच्या त्यांच्या कायदेशीर लढाईत महत्त्वाची भूमिका बजावते. “राष्ट्रपतींना नाटक आवडते आणि हे सर्व तेच दर्शविते”, असे वॉल्फ यांनी द डेली बीस्टला सांगितले. “त्यांनी जे करायचे ठरवले, ते केले आहे, मथळ्यावर वर्चस्व गाजवणे”, असेही त्यांनी पुढे म्हटले. वॉल्फ पुढे म्हणाले, “हार्वर्ड विद्यापीठ हे ‘ट्रम्प शो’ नाट्य उलगडत जाणाऱ्या नाटकातील आणखी एक पात्र बनले आहे.”

अलीकडच्या आठवड्यात हे नाटक आणखी वाढले आहे. ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील प्रशासनाने हार्वर्ड विद्यापीठाची नवीन आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची नोंदणी करण्याची क्षमता रद्द करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय अमेरिकेच्या न्यायाधीशांनी तात्पुरता रोखला आहे. दोन अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त संघीय निधी गोठवल्यानंतर ट्रम्प प्रशासनाने हार्वर्ड विद्यापीठाशी संघर्ष वाढवला आहे आणि करमुक्तीचा दर्जा रद्द करण्याची धमकी दिली आहे. ट्रम्प यांनी निधीवरील बंदी उठवण्याची ऑफर दिली होती; मात्र हार्वर्डने ती स्वीकारण्यास नकार दिला.

वोल्फ यांच्या दाव्यांवर व्हाईट हाऊसची प्रतिक्रिया

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हाईट हाऊसने वॉल्फ यांनी केलेल्या वक्तव्यांकडे दुर्लक्ष केलेले नाही. प्रशासनाचे प्रवक्ते टेलर रॉजर्स यांनी वॉल्फ व द डेली बीस्ट या दोघांवरही जोरदार टीका केली आणि त्यांचे दावे पूर्णपणे फेटाळून लावले.
“ते दोघेही खोट्या बातम्या विकतात”, असे रॉजर्स म्हणाले. “एक यशस्वी उद्योजक व इतिहासातील सर्वांत परिवर्तनकारी अध्यक्ष होण्यासाठी राष्ट्रपतींना हार्वर्डसारख्या अतिरेकी, भ्रष्ट संस्थेकडे अर्ज करण्याची आवश्यकता नव्हती”, असेही रॉजर्स म्हणाले. मेलानिया ट्रम्प या डोनाल्ड ट्रम्प यांच्यापासून वेगळ्या झाल्याचा दावाही व्हाईट हाऊसने याआधी फेटाळून लावला होता. व्हाईट हाऊसने वॉल्फ यांना ‘एक मूर्ख माणूस’ असे म्हणत प्रत्युत्तर दिले आहे.