बंगळुरू मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (बीएमआरसीएल)ला मेट्रोचे सहा डबे मिळाले आहेत; जे कम्युनिकेशन बेस्ड ट्रेन कंट्रोल (सीबीटीसी) प्रणालीचा भाग आहेत. गेल्या महिन्यात तयार झालेल्या यलो लाईनवर हे डबे धावणार असून त्यासाठी विविध सुरक्षा चाचण्या केल्या जाणार आहेत. बंगळुरूमधील यलो मेट्रो लाइन आर. व्ही. रोड ते बोम्मासांद्राला जोडणारी असून हा १८.८ किलोमीटर्सचा मार्ग आहे. याच मार्गावर चालकविरहित मेट्रो धावणार आहे. हा मार्ग बंगळुरूच्या दक्षिण भागातील टेक हबला जोडतो, त्या टेक हबमध्ये इन्फोसिस, विप्रो व टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांसारख्या कंपन्यांचा समावेश आहे.

हा मेट्रो मार्ग कर्नाटक आणि तमिळनाडूच्या सीमेला लागून असलेल्या होसूर रोडवर होणारी वाहतूक कोंडी कमी करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आला आहे. या मार्गावर एकूण १६ स्थानके आहेत. हा मार्ग आर. व्ही. रोड स्थानकावरील बंगळुरू मेट्रोच्या ग्रीन लाइनला आणि जयदेव हॉस्पिटल स्टेशनवरील पिंक लाइनला जोडते. यलो लाइनवरील मेट्रोमध्ये पहिल्यांदाच कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर होणार आहे.

Portfolio, Stock Market, knr constructions Limited Company, knr constructions Limited share, share market, road construction, bridge construction, construction of irrigation projects, Hybrid Annuity Model, BOT,EPC, knr road construction, knr constructions company share,
माझा पोर्टफोलिओ – कामगिरी उजवी, ताळेबंदही सशक्त! केएनआर कन्स्ट्रकशन लिमिटेड
Kulaba Bandra Seepz, Metro 3
मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून अल्प दिलासा, ‘कुलाबा वांद्रे सीप्झ मेट्रो ३’ मार्गिकेचे काम वेगात
Job Opportunity Recruitment at AI Airport Services Limited
नोकरीची संधी: एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये पदभरती
Yamaha introduces vibrant new color options across the MT15 V2 Fascino and Ray ZR portfolios Know Features And price
ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह यामाहा इंडियाने ‘या’ दुचाकींना केलं उपडेट; पाहा कलर ऑप्शन…
यलो लाइनवरील मेट्रोमध्ये पहिल्यांदाच कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर होणार आहे. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

सीबीटीसी चालकविरहीत मेट्रो म्हणजे काय?

भारतीय रेल्वेच्या हॅण्डबुकनुसार सीबीटीसी तंत्रज्ञान ही एक आधुनिक संवाद प्रणाली आहे; गाडीच्या परिचालनासंदर्भातील वेळेच्या बाबतीतील अचूक माहिती रेडिओ संवादाच्या माध्यमातून देण्यासाठी ही प्रणाली ओळखली जाते. कम्युनिकेशन बेस्ड ट्रेन कंट्रोल (सीबीटीसी) सिग्नलिंग तंत्रज्ञान हे मेट्रोची ये-जा आणि मेट्रोमध्ये तांत्रिक अडचण आल्यास त्याची स्वयंदुरुस्ती करू शकते. बेंगळुरू मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (बीएमआरसीएल)चे प्रकल्प व्यवस्थापक जितेंद्र झा यांनी सीबीटीसीबद्दल माहिती देताना सांगितले की, एक मेट्रोच दुसर्‍या मेट्रोबरोबर संवाद साधते, असे हे मानवरहित तंत्रज्ञान आहे.

यलो लाईनमध्ये अनअटेंडेड ट्रेन ऑपरेशन्स (यूटीओ) असल्यामुळे दरवाजे उघडणे आणि बंद करणे, गाड्यांचे थांबणे यांसारख्या गोष्टी स्वयंचलित असतील. ‘यूटीओ’मुळे ऑपरेशन्स कंट्रोल सेंटर (ओसीसी)ची कार्यक्षमतादेखील वाढेल, असे झा यांनी सांगितले. दररोज सकाळी मेट्रो ‘ओसीसी’च्या कमांडने सुरू होईल. त्याद्वारे मेट्रोच्या आतील लाइट्स आणि इंजिन सुरू होईल. मेट्रोच्या सुरक्षेसाठी तांत्रिक बाबींची स्वयंचलित तपासणी केली जाईल. ही मेट्रो प्लॅटफॉर्मवर जाण्यापूर्वी स्वच्छतेसाठी असणार्‍या स्वयंचलित वॉशिंग प्लान्टमध्ये स्वतःच जाईल. ओसीसीच्या कमांडनेच रात्री मेट्रो स्लीप मोडमध्ये जाईल.

या गाड्यांची निर्मिती आणि रचना कोणी केली?

मेक इन इंडिया इनिशिएटिव्हचा एक भाग म्हणून चालकविरहीत बंगळुरू मेट्रोसाठीचे डबे ‘सीआरआरसी नांजिन पंझेन को-ऑपरेटीव्ह लिमिटेड’ या चिनी कंपनी आणि त्यांच्या देशांतर्गत भागीदार असलेल्या ‘टिटागढ रेल सिस्टीम लिमिटेड’द्वारे तयार कऱण्यात आले आहेत. २०१९ मध्ये चिनी कंपनीने ‘बीएमआरसीएल’ला मेट्रोचे डबे पुरविण्यासाठी १५७८ कोटी रुपयांचा करार केला.

बंगळुरू मेट्रोमध्ये प्रथमच ‘एआय’चा वापर

बंगळुरू मेट्रोच्या यलो लाईनमध्ये सुरक्षिततेच्या अनुषंगाने नवीन मार्गावरील ट्रॅकचे निरीक्षण करण्यासाठी ‘एआय’चा वापर करण्यात येणार आहे. ‘एआय’ तंत्रज्ञानामुळे ट्रॅकवरील क्रॅक, झीज आणि इतर तांत्रिक विसंगती सहज शोधता येऊ शकतील; ज्यामुळे अपघातासारखे धोके टळतील. मेट्रोमध्ये बसवलेले कॅमेरे व्हिज्युअल डेटा कॅप्चर करू शकतील; ज्यामुळे ‘एआय’ तंत्रज्ञानावर चालणारी यंत्रणा रिअल-टाइममधील संभाव्य धोके ओळखू शकेल.

चालकविरहीत मेट्रोची इतर खास वैशिष्ट्ये

१. हॉट एक्सल डिटेक्शन सिस्टीम : ही एक ट्रेन मॉनिटरिंग सिस्टीम आहे; जी ट्रेनचे बेअरिंग जास्त गरम झाल्याचे सूचित करते. तापमानाचा डेटा आणि डायग्नोस्टिक डेटा हा ऑनबोर्ड अँटेना, वायरलेस उपकरणे आणि स्थानकांवर असलेल्या दूरसंचार नेटवर्कद्वारे ‘ओसीसी’ला पाठवला जातो. त्यामुळे बेअरिंगमध्ये लगेच सुधारणा करता येऊ शकते.

२. रिअल-टाइम लोकेशन : चालकविरहीत मेट्रोमध्ये एलसीडी नकाशा असतो. त्यामध्ये दरवाजे उघडणे किंवा बंद करणे, आगमन किंवा निर्गमनाची माहिती दिली जाते.

३. मेट्रोच्या पुढे आणि मागे कॅमेरे : मेट्रोच्या पुढे-मागे दोन्ही बाजूंना कॅमेरे असतात; जेणेकरून ट्रेन ऑपरेटर ट्रेन सुटण्यापूर्वी प्रवाशांना चढताना आणि उतरताना पाहू शकतो. मेट्रोच्या पुढील बाजूस असणारा कॅमेरा सुरक्षेसाठी समोरील दृश्य रेकॉर्ड करतो.

४. इमर्जन्सी इग्रेस डिव्हाइस (ईईडी) युनिट : आपातकालीन स्थितीत ओसीसी किंवा ऑपरेटरकडे संदेश पोहोचेपर्यंत प्रवासी ट्रेन स्वतः ऑपरेट करू शकतात. ओसीसी किंवा ट्रेन ऑपरेटरकडे आपातकालीन परिस्थितीचा संदेश पोहोचतो तेव्हा सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे परिस्थिती तपासून ट्रेनचे दरवाजे उघडले जातात.

बंगळुरूतील चालकविरहीत मेट्रो किती सुरक्षित?

बंगळुरूमध्ये चालकविरहीत मेट्रो सेवा सुरू होण्यापूर्वी विविध चाचण्या करण्यात येणार आहेत. सर्वप्रथम प्रोटोटाईप ट्रेनची चाचणी हेब्बागोडी डेपोमध्ये सुरू होईल. तीन ते चार दिवसांच्या चाचणीनंतर मेन लाइनवर ट्रेनच्या चाचण्या केल्या जातील. झा म्हणाले की, सिग्नलिंग चाचणी ८ मार्चपासून सुरू होईल. त्यानंतर एप्रिलच्या सुरुवातीला डायनॅमिक परिस्थितीत चाचणी होईल. त्यात ट्रेनच्या इतर वैशिष्ट्यांसह अडथळे शोधणे, टक्कर यांसारख्या चाचण्या केल्या जातील. सिग्नलिंग सिस्टीम, टेलिकम्युनिकेशन सिस्टीम आणि पॉवर सप्लाय सिस्टीमसह सिस्टीम इंटिग्रेशन चाचण्यादेखील केल्या जातील, असे झा यांनी सांगितले. वैधानिक सुरक्षा चाचण्यांमध्ये रिसर्च डिझाइन अॅण्ड स्टॅण्डर्ड ऑर्गनायझेशन (आरडीएसओ) आणि केंद्रीय मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त (सीएमआरएस) यांच्या चाचण्यांचाही समावेश असेल. त्यांच्या मंजुरीच्या आधारावर महसूल सेवेसाठी या गाड्या सुरू करण्यापूर्वी रेल्वे बोर्डाची मान्यता घेतली जाईल.

बंगळुरूमध्ये चालकविरहीत मेट्रो सेवा सुरू होण्यापूर्वी विविध चाचण्या करण्यात येणार आहेत. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

चालकविरहीत मेट्रोमध्ये खरेच चालक नसतील का?

बीएमआरसीएल अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, बंगळुरूला चालकविरहीत मेट्रो सेवा सुरू करण्यापूर्वी सुरुवातीला किमान सहा महिन्यांसाठी ट्रेन ऑपरेटर असतील. आणखी डबे मिळेपर्यंत १५ मिनिटांच्या अंतराने मेट्रो सुरू केल्या जातील. झा यांनी स्पष्ट केले की, दिल्लीच्या चालकविरहीत मेट्रो ट्रेनच्या तुलनेत ‘बीएमआरसीएल’ची मेट्रो सुरुवातीपासूनच चालकविरहीत वैशिष्ट्यांसह डिझाइन करण्यात आली आहे.

हेही वाचा : आधार- निवडणूक ओळखपत्र जोडणी: काँग्रेस नेत्याची आयोग आणि सरकारविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव कशासाठी?

चालकविरहित गाड्या कधी सुरू होणार?

चीनकडून रोलिंग स्टॉकच्या वितरणास विलंब झाल्यामुळे ही सेवा सुरू होण्यास विलंब झाला आहे. टिटागढ येथील कंपनीला स्टेनलेस स्टीलचे कोच तयार करण्याचा पूर्ण अनुभव नसल्याने याचे उत्पादनही संथ गतीने सुरू आहे. पुढे मेट्रो ट्रेनला चार महिन्यांसाठी मेन लाइनवर किमान ३७ चाचण्या आणि ४५ दिवस सिग्नलिंग चाचण्या कराव्या लागणार आहेत. २०२२ मध्ये कार्यान्वित होणारी यलो लाईनवरील मेट्रो सेवा आता डिसेंबर २०२४ पर्यंत सुरू होण्याची अपेक्षा असल्याचे सांगण्यात आले आहे.