थायलंडच्या पाटा प्राणीसंग्रहालयात राहणाऱ्या बुवा नोई या गोरिलाला कादचित आता स्वातंत्र्य कधीच उपोभगण्यास मिळणार नाही. थायलंडमधील पशू अधिकार कार्यकर्ते आणि अधिकाऱ्यांनी बुआ नोईला वाचवण्याची लढाई जवळपास हरली आहे. कारण, या प्राण्याच्या मालकाने तब्बल ७८०,००० डॉलर्स(६.४ कोटी रुपये) पेक्षा किमी किंमतीत त्याची विक्री नकार दर्शवल आहे. त्यामुळे आता जगातील सर्वात दु:खी गोरिला म्हणून बुवा नोईकडे पाहिले जात आहे.

२०१५ पासून थायलंड सरकार, पीपल फॉर एथिकल ट्रीटमेंट ऑफ एनिमल्स(पेटा) आणि पॉप गायक चेर हे नोईच्या सुटकेसाठी तिच्या मालकाकडे आग्रह करत आहेत. जेणेकरून अन्य गोरिलांच्या सहवासात तिचा शेवट होईल. जाणून घेऊयात बुवा नोईच्या आयुष्याबद्दलची माहिती.

survival of marine species in danger due to ocean warming
विश्लेषण : महासागर तापल्याने प्रवाळ पडू लागलेत पांढरेफटक… जलसृष्टीचे अस्तित्वच धोक्यात?
Why are total solar eclipses rare Why is April 8 solar eclipse special
विश्लेषण : ८ एप्रिलचे सूर्यग्रहण वैशिष्ट्यपूर्ण का ठरते? खग्रास सूर्यग्रहण दुर्मीळ का असते?
taiwan earthquake reason
Taiwan Earthquake: २५ वर्षांतील सर्वात मोठ्या भूकंपाने हादरला देश, तैवानमध्ये वारंवार भूकंप का होतात?
Video Of Baby Turtles Making Their First Voyage Will Give You Goosebumps
Video : डायनासोरच्या काळापासून अस्तित्वात आहे ही कासवांची प्रजाती, चिमुकल्या कासवांचा पहिला समुद्र प्रवास एकदा बघाच

बुआ नोई म्हणजे ‘लिटिल लोटस’ होतो. वर्षभराची असताना तिला पाटा येथील प्राणीसंग्रहालयात आणलं गेलं होतं. तिच्या मालकाने जर्मनीवरून जवळपास ६५ लाखांत तिला विकत घेतलं होतं. तेव्हापासून बुवा नोई पाटा पिंकलाओ डिपार्टमेंट स्टोरमध्ये एका बंदीस्त प्राणीसंग्रहालयात आहे.

बँकाँक पोस्टच्या अहवलानुसार नोईने एका दशकापूर्वी तिचा जोडीदार गमावला होता आणि आता तिच्यासोबतीला केवळ पशुवैद्य व अन्य काही प्राणी आहेत. खरंतर गोरिला हा प्राणी संग्रहालयात राहणारा एकमेव प्राणी नाही, जो दु:खी असू शकतो. मात्र द सन च्या म्हणण्यानुसार काही निरीक्षकांनी तिच्या डोळ्यात अश्रू पाहिले आहेत, कारण ती तिच्या पिंजऱ्यातून एका प्लास्टिकच्या स्क्रीनद्वारे पर्यटकांना पाहू शकते, जे की तिला पर्यटकांना थेट पाहण्यापासून विभक्त करते.सातव्या मजल्यावर गजांनी बनवलेल्या आवरातील तिचे आयुष्य निरस असल्याचे दिसून येते. ती अनेकदा जमिनीवर टेकून किंवा टेलिव्हिजिन पाहून, पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी पिंजऱ्यात फिरून वेळ मारून नेताना दिसते.

बँकाँक पोस्टच्या अहवलानुसार तिच्या आहारात केळी, संत्री, पेरू, उकडलेले कॉर्न, लाल द्राक्षे, सफरचंद आणि दूध अशा मोठ्या दोन वेळेच्या जेवणाचा समावेश आहे. साधारणपणे निरोगी गोरिलाचे आयुष्य हे ३५ ते ४० वर्षे असते आणि बुआ नोईचे वय ३० पेक्षा जास्त असल्याचे दिसून येते.

पशू अधिकार कार्यकर्त्यांचे म्हणणे काय? –

बुआ नोईची दुर्दशा आणि तिची राहण्याची स्थिती २०१५ मध्ये समोर आली. जेव्हा पशू अधिकार कार्यकर्त्यांनी नोईच्या सुटकेची आणि प्राणी संग्रहालय बंद करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर स्वाक्षरी केली. ही याचिका सिंजिरा अपैतन यांनी केली होती, ज्यांनी म्हटले होते की, “प्राण्यांना अशा अनैसर्गिक अधिवासात बंदिस्त केले पाहिजे असे मला वाटत नाही. मला आशा आहे की या उंच प्राणीसंग्रहालयात बंदिवान असलेल्या इतर सर्व प्राण्यांनाही याची मदत होईल.”

प्राणी संग्रहालयाचे अधिकारी काय म्हणतात? –

पाटा प्राणी संग्रहालयाने मंत्रालय आणि कार्यकर्त्यांच्या दावा फेटाळला आहे. डिपार्टमेंट स्टोअरचा असा दावा आहे की, बुवा नोईचे स्वातंत्र्य तिच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे, कारण इतक्या वर्षांनंतर ती आता नवीन घरात जुळवून घेऊ शकणार नाही.