आकाश निरीक्षणासाठी (star gazing) काही वर्षांपूर्वी शहराबाहेरची-गावाबाहेरची एखादी जागा सोयीची ठरायची. कारण प्रदुषण मुक्त वातावरण, कृत्रिम दिव्यांचा झगमगाट नसलेला परिसर यामुळे स्वच्छ आकाश सहज उपलब्ध व्हायचे. मात्र सध्या आकाश निरीक्षणासाठी जागा सपाडणे कठीण आहे अशी परिस्थिती सध्या आहे. तेव्हा खगोलप्रेमींसाठी, हौशी अभ्यासकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लडाखमध्ये देशातील पहिले आकाश निरीक्षणासाठीचे राखीव क्षेत्र हे उभारलं जात आहे. यामुळे आकाश दर्शनाची अनोखी अनुभूती मिळेलच पण त्याचबरोबर लडाखमधील पर्यंटन वाढण्यासही मदत होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतातील पहिलं आकाश निरीक्षणासाठी राखीव क्षेत्र ज्याला Dark Sky Reserve म्हणूनही ओळखलं जातं हे लडाखमध्ये हेनले वेधशाळेच्या परिसरात साकारलं जाणार आहे. अवकाशाचे निरीक्षण करणारी हेनले (Hanle Astronomical Observatory) ज्याला Indian Astronomical Observatory (IAO) म्हणूनही ओळखले जाते, लडाखमध्ये अग्नेय दिशेला स्थित असून लेहपासून सुमारे २६० किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे. ही जगातील उंचावरच्या वेधशाळांपैकी एक असून समुद्रसपाटीपासून चार हजार ५०० मीटर उंचीवर आहे. हा सर्व परिसर थंड वाळवंट (cold desert) म्हणूनही ओळखला जातो. स्वच्छ आकाश आणि प्रदुषण मुक्त परिसर म्हणून १९९२ च्या सुमारास या वेधशाळेच्या उभारणीला सुरुवात झाली. लवकरच हा परिसर Dark Sky Reserve -आकाश निरीक्षणासाठी राखीव क्षेत्र म्हणून ओळखला जाणार आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained indias first dark sky reserve for sky observation is being formed in ladakh asj
First published on: 06-09-2022 at 19:00 IST