इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासातील सर्वात यशस्वी असलेला मुंबई इंडियन्सचा संघ या हंगामात सलग आठ सामने गमावल्यानंतर अधिकृतपणे प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. तर चेन्नई सुपर किंग्जला सोमवारी सहाव्या पराभवाला सामोरे जावे लागले. मुंबई इंडियन्सने आतापर्यंत पाच वेळा आयपीएलची जेतेपदे जिंकली आहेत, तर चेन्नई सुपर किंग्जने चार आयपीएलची जेतेपदे जिंकली आहेत. पण या हंगामात या दोन्ही संघांना चांगली कामगिरी करता आलेली नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एमएस धोनी, रवींद्र जडेजासारखे दिग्गज खेळाडू असलेल्या चेन्नई सुपर किंग्जचा आयपीएल २०२२ मधील प्रवास कठीण होत चालला आहे. सोमवारी चेन्नईचा पंजाब किंग्जकडून ११ धावांनी पराभव झाला. या पराभवामुळे चेन्नई सुपर किंग्जचा प्लेऑफमध्ये पोहोचण्याचा मार्गही कठीण झाला आहे. मात्र, अद्याप प्रवास संपलेला नाही. चेन्नईने आठ पैकी फक्त दोन सामने जिंकले असून सहा सामने गमावले आहेत.

आयपीएलच्या इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाचा यशस्वी संघ असलेल्या चेन्नई सुपर किंग्जची अवस्था पाहता प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न पडतो की ते स्पर्धेच्या बाहेर पडले का? तर याचे उत्तर ‘नाही’ असे आहे. चेन्नईला अजूनही प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याची संधी आहे. त्यांचा मार्ग सोपा नसला तरी अशक्यही नाही.

नेट रन रेटकडे द्यावे लागणार लक्ष

चेन्नई सुपर किंग्जने यापूर्वी सहा सामने गमावले आहेत, परंतु आता त्यांना प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत उर्वरित सामने जिंकावे लागतील. आधी चेन्नई सुपर किंग्जला १४ गुणांची गरज होती. पण आता नवीन संघांसह चेन्नईला प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी उर्वरित सर्व सहा सामने जिंकणे आवश्यक आहे.

तसेच चेन्नईला फक्त सामने जिंकून हे करता येणार नाही. तर नेट रनरेटवरही लक्ष केंद्रित करावे लागेल. जर चेन्नई सुपर किंग्जने सर्व सहा सामने जिंकून गुण मिळवले, तर उर्वरित प्रतिस्पर्धी संघांसोबतचा सामना निव्वळ रनरेटवर होईल. चेन्नईचा सध्याचा रनरेट -०.५३४ आहे आणि रवींद्र जडेजाच्या नेतृत्वाखालील चेन्नईला त्यांची स्थिती सुधारण्यासाठी मोठ्या फरकाचा विजय आवश्यक आहे.

प्लेऑफसाठी पात्र होण्यासाठी १६ गुण पुरेसे असू शकतात. अशा परिस्थितीत चेन्नईने उर्वरित सामन्यांमध्ये सर्व सामने जिंकले आणि नेट रनरेटमध्येही सुधारणा केली तर त्यांच्याकडे प्लेऑफमध्ये पोहोचण्याची संधी आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained ipl 2022 chennai super kings still have a chance to reach the playoffs abn
First published on: 26-04-2022 at 12:14 IST