संतोष प्रधान

उत्तर प्रदेशची विधानसभा निवडणूक आता अंतिम टप्प्यात आली आहे. गुरुवारी होणाऱ्या सहाव्या टप्प्यात ५७ मतदारसंघात मतदान होत आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे भवितव्य या टप्प्यात ठरणार आहे. भाजपसाठी हा टप्पा निर्णायक आहे. अपना दल व छोट्या-छोट्या पक्षांची या टप्प्यात कसोटी लागणार आहे. शेवटच्या टप्प्यात सोमवारी मतदान होईल. त्यानंतर १० मार्चला मतमोजणी होऊन सत्ताधारी कोण हे स्पष्ट होईल.

Victory over division of voting caused by independents propaganda war on social media in last phase
अपक्षांमुळे होणाऱ्या मतविभाजनावर विजयाचा कौल? अंतिम टप्प्यात समाज माध्यमांवर प्रचारयुद्ध
२०१९ ते २०२४ मोदींचा मराठवाड्यातील पट पूर्णपणे बदलला !
narendra modi
पंतप्रधानांकडून प्रचारात जुनेच मुद्दे; विरोधकांची टीका, मित्रपक्षांचीही भिस्त मोदींवरच
maval lok sabha marathi news, shrirang barne marathi news
मित्र पक्षांच्या नेत्यांची नाराजी दूर करण्यावर श्रीरंग बारणे यांचा भर, गाठीभेटी सुरू

सहाव्या टप्प्यात कुठे मतदान होत आहे ?

गोरखपूर, आंबेडकरनगर, बलिया, बलरामपूर, बस्ती, देवराईया, कुशीनगर, महाराजगंज, संत कबीरनगर, सिद्धार्थनगर या जिल्ह्यांमधील ५७ मतदारसंघांमध्ये गुरुवारी मतदान होईल. ६७६ उमेदवार या मतदारसंघांमध्ये रिंगणात आहेत.

पाच वर्षांपूर्वी या मतदारसंघातील राजकीय परिस्थिती कशी होती ?

गेल्या निवडणुकीत भाजपने ४६ तर मित्र पक्षांनी दोन जागा जिंकल्या होत्या. ५७ पैकी ४८ जागा भाजप वा मित्र पक्षांना मिळाल्या होत्या. पूर्वांचलमधील हा भाग भाजपला अनुकूल मानला जातो. या वेळी मात्र समाजवादी पक्षाने भाजपला आव्हान दिले आहे.

भाजप आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासाठी हा टप्पा महत्त्वाचा का?

गुरुवारी गोरखपूरमध्येही मतदान होत आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे गोरखपूरमधून निवडणूक लढवित आहेत. पाच वेळा गोरखपूर मतदारसंघाचे लोकसभेत प्रतिनिधित्व केलेले योगी आदित्यनाथ हे पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक लढवित आहेत. २०१७ मध्ये मुख्यमंत्रिपदी निवड झाल्यावर त्यांनी विधान परिषदेवर जाण्याला पसंती दिली होती. मुख्यमंत्रीच रिंगणात असल्याने गोरखपूर व आसपासच्या परिसरात भाजपला अधिक यशाची अपेक्षा आहे. समाजवादी पक्षाने या भागात जातीचे समीकरण साधण्यावर भर दिला आहे. सहाव्या आणि अखेरच्या सातव्या टप्प्यात अपना दलासह छोट्या पक्षांची भूमिका महत्त्वाची आहे. भाजप व समाजवादी पक्षाने मित्र पक्षांसाठी बहुतांशी जागा याच भागात सोडल्या आहेत. भाजपला रोखण्याकरिता समाजवादी पक्षाने जातीची समीकरणे साधण्याबरोबरच वेगवेगळ्या समाजांना आपलेसे करण्यावर भर दिला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या लोकप्रियतेचा फायदा होईल का?

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे गोरखपूरमधून निवडणूक लढवित असल्याने त्यांच्या लोकप्रियतेचा फायदा घेत जिल्ह्यातील नऊही जागांवर विजय संपादन करण्याची भाजपची योजना आहे. गेल्या वेळी भाजपने नऊपैकी आठ जागा गोरखपूरमध्ये जिंकल्या होत्या. पण भाजपसाठी यंदा तेवढे सोपे नाही. सत्ताधाऱ्यांच्या विरोधातील नाराजीमुळे भाजपने चार विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी दिली नाही. नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली. योगींच्या इच्छेनुसार उमेदवार निश्चित करण्यात आले. गेल्या वेळी जिंकलेली एक जागा भाजपने मित्र पक्ष निषाद पक्षासाठी सोडली. योगींचे मताधिक्य उत्तर प्रदेशात सर्वाधिक असावे या उद्देशाने योगींची सारी यंत्रणा कामाला लागली आहे.