संतोष प्रधान

उत्तर प्रदेशातील पाचव्या टप्प्यात ६१ विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. त्यात भाजपाला १९९०च्या दशकात जेथील राम मंदिर आंदोलनामुळे राष्ट्रीय पातळीवर पाया विस्तारण्यास संधी मिळाली होती, त्या अयोध्येचा समावेश आहे. पाच वर्षांपूर्वी या टप्प्यातील ६१ पैकी ५१ जागा भाजपाने जिंकल्या होत्या. यामुळेच पाचवा टप्पाही भाजपासाठी महत्त्वाचा आहे.

Bihar Lok Sabha Election Nitish Kumar Tejashwi Yadav Narendra Modi
तेजस्वींचा उदय, तर नितीश कुमारांचा अस्त; बिहारच्या राजकारणात ‘मोदी फॅक्टर’ चालेल का?
mumbai high court on sawantwadi dodamarg wildlife corridor
विश्लेषण : सावंतवाडी-दोडामार्ग कॉरिडॉर पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील? न्यायालयाचा आदेश काय? होणार काय?  
BJP, Jats, Thakurs, anger of the Jats ,
पहिल्या टप्प्यामध्ये भाजपला जाट, ठाकुरांच्या रागाची धास्ती
BJP turf Cooch Behar in Bengal
पश्चिम बंगालमधल्या तीन जागा भाजपासाठी प्रतिष्ठेच्या; कूचबिहार कोण जिंकणार?

पाचव्या टप्प्यात कुठे कुठे मतदान आहे?

राम मंदिर आंदोलनाचा केंद्रबिंदू असलेल्या अयोध्येत रविवारी मतदान होत आहे. गेल्या वेळी या परिसरातील पाचही जागा भाजपाने जिंकल्या होत्या. आतापर्यंत ‘मंदिर वही बनाऐंगे’ अशी घोषणा देत भाजपकडून मतदारांना साद घातली जात असे. आता प्रत्यक्ष राममंदिराच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे. अयोध्येचा सारा कायापालट करण्याची योजना आहे. यामुळेच अयोध्या व आसपासच्या परिसरात चांगल्या यशाची भाजपला अपेक्षा आहे. याशिवाय राहुल गांधी यांनी प्रतिनिधित्व केलेल्या अमेठी मतदारसंघात काँग्रेसचा निभाव लागतो का, याचीही उत्सुकता असेल. गेल्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांचा अमेठी मतदारसंघात पराभव झाला होता. या पार्श्वभूमीवर अमेठीत काँग्रेसला यश मिळते का, हे महत्त्वाचे ठरेल. उपमुख्यमंत्री व भाजपाचा ओबीसी चेहरा केशव प्रसाद मौर्य यांचे भवितव्यही ठरणार आहे. अवध आणि पूर्वांचलमधील १२ जिल्ह्यांमध्ये मतदान होत आहे.

गतवेळच्या यशाची पुनरावृत्ती करण्याचे भाजपपुढे आव्हान

गत वेळी या ६१ पैकी ५१ जागा भाजपाने जिंकल्या होत्या. भाजपचा मित्र पक्ष असलेल्या अपना दलाला दोन जागा मिळाल्या होत्या. ९० टक्क्यांपेक्षा अधिक जागा जिंकलेल्या भाजपाला हे यश कायम राखण्याचे यंदा आव्हान असेल. मतदान होत असलेल्या सर्व १२ जिल्ह्यांमध्ये भाजपाची ताकद चांगली आहे. अयोध्येतील राम मंदिराचे बांधकाम सुरू झाल्याने भाजपने या मुदद्यावर प्रचारात भर दिला आहे. मतांच्या ध्रुवीकरणाकरिताच भाजपाला राम मंदिराचा मुद्दा फायदेशीर ठरू शकतो. शेतकरी कायद्यामुळे शेतकरी वर्गात नाराजी आहे. याशिवाय या पट्ट्यात गाई आणि बैलांनी शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केल्याचे प्रकार घडले आहेत. भटक्या प्राण्यांपासून शेतीचे संरक्षण करताना काही शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला. प्रचारात हा मुद्दा समाजवादी पक्षाने तापविला आहे. सत्तेत आल्यास मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत करण्याचे आश्वासन समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही शेतकऱ्यांना वाढीव मदत देण्याचे आश्वासन दिले आहे.

समाजवादी पक्षासाठी हा टप्पा किती महत्त्वाचा?

सरकारच्या विरोधातील नाराजीवर अखिलेश यादव यांनी भर दिला आहे. भाजपसाठी हा टप्पा अनुकूल असल्याने जास्तीत जास्त मतदार आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न समाजवादी पक्षाने केला आहे. समाजवादी पक्षाकडून राम मंदिराचा मुद्दा उपस्थित करीत मुस्लीम मतांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला जात असे. या वेळी पक्षाने जाणीवपूर्वक राम मंदिराचा मुद्दा टाळला आहे. भाजप सरकारच्या धोरणांवर टीका करीत सरकारच्या विरोधात वातावरण निर्मिती करण्याचा अखिलेश यादव यांचा प्रयत्न यशस्वी होतो का हे महत्त्वाचे असेल.

बसप पूर्वांचलमध्ये पुन्हा ताकद दाखविणार का?

उत्तर प्रदेशच्या निवडणूक प्रचारात बसपचा यंदा तेवढा बोलबाला नाही. मायावती या निवडणूक जिंकण्याचा दावा करीत असल्या तरी त्यांचा पूर्वीएवढा प्रभावही राहिलेला नाही. पूर्वांचलमध्ये समाजवादी पक्षापेक्षा बसपची ताकद पूर्वी जास्त होती. पण आता तशी परिस्थिती राहिलेली नाही.