‘आधार कार्ड’ ही आज प्रत्येक व्यक्तीची गरज बनली आहे. आज तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तर महत्त्वाची कामं करताना तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाद्वारे ( UIDAI ) आधार वापरकर्त्यांसाठी वेळोवेळी नवीन सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येतो. दरम्यान, नुकताच भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने ‘आधार मित्र’ हे नवीन चॅटबॉट सुरू केले आहे. याद्वारे आधार कार्डबाबत तुम्हाला असलेल्या प्रश्नांची किंवा तक्रारींची उत्तरं आता लगेच मिळणार आहेत. मात्र, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने सुरू केलेलं ‘आधार मित्र’ हे नवीन चॅटबॉट नेमकं काय आहे? आणि ते कसं वापरता येईल? जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – विश्लेषण: अधिक ‘पीएफ’ की अधिक ‘पेन्शन’ निश्चितीचा स्वेच्छाधिकार! सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काय सांगतो?

‘आधार मित्र’ काय आहे?

आधार नोंदणी केल्यानंतर त्याची सद्यस्थिती जाणून घेणे, पीव्हीसी कार्ड, आधार केंद्र, आधारला मोबाईल क्रमांक जोडणे आदी कामांसाठी तुम्हाला भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाशी संपर्क करावा लागतो. अशा परिस्थितीत ‘आधार मित्र’ या सर्व प्रश्नांची उत्तरं चॅटबॉटच्या माध्यमातून देईल. तसेच याद्वारे तुम्हाला तुमची तक्रार नोंदणी करण्याची सुविधाही मिळणार आहे. तुम्ही तुमची तक्रार नोंदवून त्या तक्रारींचा मागोवा घेऊ शकता. तसेच तुमच्या तक्रारीवर कारवाई झाली की नाही, याची माहितीही तुम्हाला मिळणार आहे.

हेही वाचा – विश्लेषण : ‘GRAP’ म्हणजे काय आणि प्रदूषण रोखण्यासाठी ‘दिल्ली-एनसीआर’मध्ये काय आहेत तातडीच्या उपाययोजना?

‘आधार मित्र’ कसे वापरायचे?

जर तुम्हाला आधारशी संबंधित सेवांसाठी ‘आधार मित्र’ हे चॅटबॉट वापरायचा असेल तर भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर (UIDAI) जाऊन तुम्हाला याचा वापर करता येईल. आधारच्या संकेतस्थळावर जाताच मुख्यपृष्ठावर ‘आस्क आधार’ असा एक निळ्या रंगाचा आयकॉन दिसेल. त्यावर क्लिक करताच तुम्हाला ‘आधार मित्र’ ही सुविधा वापरता येणार आहे. त्यासाठी तुम्हाला तुमचे प्रश्न किंवा तक्रार टाईप करावे लागेल. त्यानंतर चॅटबॉद्वारे लगेच तुमच्या प्रश्नांची उत्तरं दिली जाईल. ‘आधार मित्र’ हे हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषांमध्ये उपलब्ध आहे. तसेच ‘आधार मित्र’चा वापर नेमका कसा करायचा याचे मार्गदर्शन करणारे काही व्हिडिओसुद्धा आधारच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

हेही वाचा – विश्लेषण : ‘वन नेशन, वन आयटीआर फॉर्म’ काय आहे? करदात्यांना याचा कसा फायदा होणार?

‘आधार मित्र’ शिवाय इतरही पर्याय

‘आधार मित्र’ शिवाय तुम्ही १९४७ हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क करूनही तक्रार नोंदवू शकता. ही सुविधा आधार वापरकर्त्यांसाठी १२ भाषांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये इंग्रजी, हिंदी, उर्दू, मल्याळम, पंजाबी, गुजराती, मराठी, तेलुगू, कन्नड, तमिळ, उडिया, बंगाली आणि आसामी या भाषांचा समावेश आहे. तसेच तुम्हाला help@uidai.gov.in द्वारे किंवा https://resident.uidai.gov.in/ संकेतस्थळावरही तक्रार नोंवदता येऊ शकते.

हेही वाचा – विश्लेषण: वॉटर टॅक्सी नेमकी आहे तरी कशी? मुंबईकरांना तिचा किती उपयोग?

तक्रार निवारणाबाबतीत ‘आधार’ पहिल्या क्रमांकावर

प्रत्येक महिन्याला केंद्र सरकारच्या प्रशासकीय सुधार आणि सार्वजनिक तक्रार विभागाकडून (DARPG) नागरिकांच्या तक्रारारीचे निवारण करणाऱ्या सरकारी विभागांची यादी जाहीर करण्यात येते. या यादीत भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) सगल तिसऱ्या महिन्यात पहिल्या क्रमांकावर राहिले आहे. प्रत्येक महिन्याला UIDAI ने इतर सरकारी विभागापेक्षा जास्त तक्रारी निकाली काढल्या आहेत.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained what is aadhar mitra how to use aadhar mitra launch by uidia spb
First published on: 07-11-2022 at 09:22 IST