युट्यूबने पंजाबी गायक सिद्धू मूसवाला यांचे नवीन गाणे भारतातील त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून सरकारकडून आलेल्या कायदेशीर तक्रारीनंतर काढून टाकले आहे. सिद्धू मुसेवाला यांचे SYL हे गाणे इतर देशांमध्ये युट्यूबवर उपलब्ध आहे आणि भारतात स्पॉटिफाई, गाना, जिओसावन सारख्या ऑडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर देखील उपलब्ध आहे.

त्यामुळे दिवंगत पंजाबी गायक सिद्धू मूसवाला यांचे ‘SYL’ गाणे आता भारतात युट्यूबवर उपलब्ध नाही. मुसेवाला यांच्या हत्येनंतर हे गाणे रिलीज करण्यात आले आहे. हे गाणे मूसवाला यांनी लिहिले असून त्यांनीच संगीत दिले आहे. निर्मात्या एमएक्सआरसीआयने हे रिलीज केले होते. हे गाणे सतलज-यमुना लिंक (SYL) कालव्याबद्दल आहे, जो अनेक दशकांपासून पंजाब आणि हरियाणामध्ये वादाचा विषय आहे. भारतात यूट्यूबने रविवारी हे गाणे आपल्या प्लॅटफॉर्मवरून हटवले. गाणे ऐकल्यासाठी युट्यूबवर गेल्यावर, ‘व्हिडिओ उपलब्ध नाही. सरकारच्या कायदेशीर तक्रारीमुळे हे साहित्य या देशात उपलब्ध नाही, हा हा मेसेज येतो.

What does Putin's record-breaking victory mean? svs-89
पुतिन यांच्या रेकॉर्डब्रेक विजयाचा अर्थ काय?
is fear of banana extinction over Genetic variety developed in Australia will be decisive
विश्लेषण : केळी नामशेष होण्याची भीती संपली? ऑस्ट्रेलियात विकसित जनुकीय वाण ठरणार निर्णायक?
Why is the decision to beautify Siddhivinayak Mahalakshmi Mumbadevi temples with the funds of Brihanmumbai Municipal Corporation becoming controversial
सिद्धिविनायक, महालक्ष्मी, मुंबादेवी मंदिरांचे सुशोभीकरण मुंबई महापालिकेच्या निधीतून…पण हा निर्णय वादग्रस्त का ठरतोय?
vidharbh elelction Which political party will dominate Vidarbha in the Lok Sabha elections 2024
विदर्भातील राजकीय वारे कोणत्या दिशेने वाहणार? महायुती आणि मविआत बंडखोरीची शक्यता?

विश्लेषण : ‘टिब्बेयां दा पुत्त’ आणि सिद्धू मुसेवाला… काय आहे कनेक्शन?

युट्यूबने सिद्धू मूसेवालांच्या ‘SYL’ गाण्याचा व्हिडिओ का काढून टाकला?

यासाठी युट्यूबने दिलेले एकमेव कारण म्हणजे सरकारकडून आलेली कायदेशीर तक्रार. एका निवेदनात, युट्यूबच्या प्रवक्त्यांनी  म्हटले की, “आमच्याकडे एखादा व्हिडीओ हटवण्याबाबत जगभरातील सरकारच्या विनंत्यांबाबत स्पष्ट धोरणे आहेत. योग्य कायदेशीर प्रक्रियांद्वारे सूचित केल्यावर आम्ही सरकारी विनंत्यांची समीक्षा करतो आणि आमच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या उल्लंघनासाठी सामग्रीचे देखील पुनरावलोकन करतो. जेथे योग्य असेल, आम्ही स्थानिक कायदे आणि आमच्या सेवा अटींनुसार पूर्ण पुनरावलोकन केल्यानंतर ती सामग्री प्रतिबंधित करतो किंवा काढून टाकतो. या सर्व विनंत्या ट्रॅक केल्या आहेत आणि आमच्या पारदर्शकता अहवालात समाविष्ट केल्या आहेत.”

यूट्यूबवर रिलीज झाल्यानंतर, ‘SYL’ या गाण्याला ला २.७ कोटी व्ह्यूज मिळाले होते तर ३३ लाख लोकांनी लाइक केले होते. सिद्धू मुसेवाला या नावाने प्रसिद्ध असलेले गायक शुभदीप सिंग सिद्धू याची गेल्या महिन्यात २९ मे रोजी पंजाबमधील मानसा जिल्ह्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

विश्लेषण : १८ लाखांचे दागिने, ५ कोटी बँकेत, २६ लाखांची कार अन्… सिद्धू मुसेवालांकडे एकूण किती संपत्ती होती?

संगरूर पोटनिवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर या गाण्याचा व्हिडिओ भारतात युट्यूबवरुन काढून टाकण्यात आले होते. संगरूरमध्ये शिरोमणी अकाली दल (अमृतसर) प्रमुख सिमरनजीत सिंग मान यांनी आम आदमी पार्टीचे उमेदवार गुरमेल सिंग यांचा पराभव करून विजय मिळवला आहे. हे गाणे काढून टाकण्यात आल्यानंतर काही वेळातच शिरोमणी अकाली दलाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन या कारवाईचा निषेध करण्यात आला.

सिद्धू मूसवालाचे ‘SYL’ गाणे कशाबद्दल आहे?

SYL नावाचे गाणे हे निर्माणाधीन सतलज-यमुना लिंक कालव्यावर आहे. हे गाणे मुसेवालांच्या हत्येच्या काही आठवड्यांपूर्वी रेकॉर्ड करण्यात आले होते आणि ते २३ जून रोजी रिलीज झाले होते. हे गाणे पंजाब आणि हरियाणामधील पाण्याच्या समस्येवर आधारित आहे. व्हिडिओमध्ये १९८४ च्या शीख विरोधी दंगलीबद्दल भाष्य करण्यात आले होते. तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान दिल्ली मोर्चाचे प्रसंगही यात दाखवले आहेत. याशिवाय लाल किल्ल्यावर शीख समाजाचे निशाण साहिब फडकवल्याबद्दलही कौतुक करण्यात आले आहे.

विश्लेषण : सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येनंतर सूड घेण्याची घोषणा केलेली बंबिहा गॅंग कोणाची आहे?

SYL गाण्याचे बोल

ओह कलम नी रुकणी, नित नवा हुण गाणा आऊं… जे ना टले तां मुड़ बलविंदर जटाणा आऊं। फेर पुत्त बेगाने नहरां च डेगा ला ही दिंदे… ओन्हा चिर पाणी छड्‌डो, टुपका नीं देंदे।

(आता कलम थांबणार नाही, रोज नवे गाणे येईल. जर बाजूला झाला नाहीत तर पुन्हा बलविंदर जटाना येईल. मग पंजाबचे लोक देगा (हत्यार) कालव्यात टाकतील. पाण्याचा प्रश्न सोडा, आम्ही एक थेंबही देणार नाही.)

विश्लेषण: मुसेवालांची हत्या AN-94 ने; जाणून घ्या मिनिटाला १८०० गोळ्या झाडणाऱ्या या रशियन रायफलचं चीन, पाकिस्तान कनेक्शन

सतलज-यमुना लिंक कालवा

सतलज-यमुना लिंक कालवा (SYL) पंजाब आणि हरियाणा यांच्यातील पाणी वाटपासाठी बांधला जाणार होता. भाक्रा धरणाचे पाणी हरियाणातील यमुना नदीपर्यंत पोहोचण्यासाठी ते बांधले जाणार होते, परंतु कालवा बांधण्यापूर्वीच हे प्रकरण वादाच्या भोवऱ्यात सापडले.

१९७६ मध्ये आणीबाणीच्या काळात केंद्र सरकारने दोन्ही राज्यांना ३५ -३५ लाख एकर फूट पाणी देण्याची अधिसूचना जारी केली होती. यामध्ये दिल्लीलाही दोन लाख एकर फूट पाणी द्यायचे होते. सतलज-यमुना कालव्याची एकूण लांबी २१४ किमी आहे, त्यापैकी १२२ किमी पंजाब आणि९२ किमी हरियाणा बांधणार होते.

हरियाणाने आपल्या वाट्याचा कालवा बांधला आहे, तर पंजाबमध्ये हे काम अद्याप अपूर्ण आहे. कालव्याच्या कामावरून जवळपास पाच दशकांपासून वाद सुरू असून दोन्ही राज्यांतील वेगवेगळ्या सरकारांनी पाण्याबाबत न्यायालयात बाजू मांडली आहे.

सुशील गुप्ता यांच्या वक्तव्याने गाण्याची सुरुवात

हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, आम आदमी पक्षाचे राज्यसभा सदस्य सुशील गुप्ता यांनी एप्रिलमध्ये म्हटले होते की, , हरियाणात त्यांचा पक्ष सत्तेवर आल्यास यमुना आणि सतलजला जोडणाऱ्या कालव्याचे काम पूर्ण होईल आणि त्या कालव्याचे पाणी हरियाणातील प्रत्येक शेतापर्यंत पोहोचेल.

सिद्धू मूसवालांचे गाणे सुशील गुप्तांच्या या विधानाने सुरू होते. गुप्ता यांनी त्यांच्या वक्तव्यात म्हटले होते की, “२०२५ पर्यंत सतलज-यमुना कालव्याचे पाणी हरियाणाच्या शेतापर्यंत पोहोचेल. हे आमचे वचन नाही तर आमची हमी आहे.”

विश्लेषण : एखाद्या गुन्हेगाराला गॅंगस्टर कसे घोषित केले जाते?

बंदिवान शिखांची सुटका

या गाण्यात सिद्धू मुसेवाला १९८० च्या दशकात पंजाबमध्ये सुरू झालेल्या बंडखोरीदरम्यान हिंसक आणि दहशतवादी कारवायांच्या आरोपाखाली तुरुंगात बंद असलेल्या खलिस्तान समर्थक कैद्यांबद्दल बोलत आहेत.

त्यांना पंजाबमध्ये बंदिवान शीख असेही म्हणतात. गाण्यात सिद्धू मुसेवाला यांनी त्याच्या सुटकेची मागणी केली आहे. बंदीवानांपैकी अनेक शिख २५ ते ३० वर्षांपेक्षा जास्त काळ तुरुंगात आहेत. भारत सरकारने २०१९ मध्ये यापैकी आठ शीखांची सुटका करण्याची घोषणा केली होती परंतु हे प्रकरण अद्याप प्रलंबित आहे.

बलविंदर जट्टानाचा उल्लेख

गाण्याच्या शेवटी सिद्धू मुसेवाला यांनी जट्टाना गावातील बलविंदर सिंगचा उल्लेख केला आहे. बलविंदर सिंग पंजाबमधील रोपर जिल्ह्यातील चमकौर साहिब येथील होते. त्यांच्या गावाचे नाव जट्टाना असल्याने खलिस्तानी चळवळीतील लढाऊ मोहिमांमध्ये ते बलविंदर सिंग जट्टाना म्हणून ओळखले जाऊ लागले.

१९९० मध्ये, जट्टाना यांनी त्यांच्या काही साथीदारांसह सेक्टर २६, चंदीगड येथील एसवायएलच्या कार्यालयात या कालव्याच्या बांधकाम प्रकल्पात सहभागी मुख्य अभियंते एमएस सिक्री आणि अधीक्षक अवतार सिंग औलख यांच्यावर गोळीबार केला. या घटनेत दोघांचाही मृत्यू झाला आणि त्यानंतर कालव्याचे बांधकाम बंद करण्यात आले. नंतर जट्टानाच्या कुटुंबातील चार सदस्यांना घरात मारून जिवंत जाळण्यात आले. ४ डिसेंबर १९९१ रोजी जट्टाना पोलीस चकमकीत मारले गेले.