विश्लेषण : छत्रपती संभाजीराजेंनी राज्यसभेच्या उमेदवारीसाठी शिवसेनेत प्रवेश न करण्याचा निर्णय का घेतला?

छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी राज्यसभेच्या जागेसाठी शिवसेनेत सामील होण्याची ऑफर उघडपणे नाकारली आहे.

Chhatrapati Sambhajiraje
(फोटो सौजन्य – PTI)

राज्यसभेच्या सहा जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीत छत्रपती संभाजीराजे हे अपक्ष म्हणून लढण्यावर ठाम असल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली आहे. राज्यसभेसाठी खुल्या पद्धतीने मतदान होते. म्हणजेच पक्षाच्या अधिकृत प्रतिनिधीला दाखवूनच मतपत्रिका मतपेटीत टाकावी लागते. एखाद्या आमदाराने पक्षादेशाच्या विरोधात मतदान केल्यास आमदार म्हणून तो अपात्र ठरू शकतो. दरम्यान, आठवडाभराच्या सस्पेन्सनंतर, छत्रपती संभाजीराजे यांनी राज्यसभेच्या जागेसाठी शिवसेनेत सामील होण्याची ऑफर उघडपणे नाकारली आहे.

कोल्हापूरच्या राजघराण्याचे सदस्य आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज संभाजीराजे हे यापूर्वी संसदेच्या वरिष्ठ सभागृहाचे अध्यक्ष-नामनिर्देशित सदस्य होते. २००९ मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर कोल्हापुरातून लोकसभा निवडणूक लढवली होती.

गेल्या महिन्यात त्यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर, संभाजीराजे यांनी सर्व राजकीय पक्षांकडून पाठिंबा मागताना अपक्ष म्हणून राज्यसभेची निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती.

“मावळे असतात म्हणून राजे,” संजय पवारांचं नाव जाहीर करताना राऊतांचा संभाजीराजेंना अप्रत्यक्ष टोला

हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी १० जून रोजी मतदान होणार आहे. भाजपाकडे असलेल्या आमदारांची संख्या पाहता दोन जागा जिंकू शकतात. महाराष्ट्रात सत्ताधारी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी एक जागा मिळू शकते. त्यामुळे ते सहाव्या जागेसाठी निवडणूक लढवतील ज्यासाठी अपक्ष आमदारांचा पाठिंबा लक्षात घेता महाविकास आघाडी तुलनेने अधिक चांगल्या स्थितीत आहे.

संभाजीराजे सेनेसोबत गेले असते तर चुकीचे संकेत गेले असते. त्याच वेळी, छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज संभाजीराजे संघटनांकडून पाठिंबा मागताना दिसले, तेव्हा समाजातील अनेक सदस्य नाराज झाले, असे एका राजकीय विश्लेक्षकांनी सांगितले.

छत्रपती संभाजीराजे यांनी त्यांना पाठिंबा देण्याचे आवाहन केल्यानंतर, शिवसेनेने त्यांना प्रथम पक्षात सामील होण्यास सांगितले होते. पण ही ऑफर त्यांनी अनेक मराठा संघटनांचा विरोध लक्षात घेऊन स्वीकारली नाही.

“आता निवडणूक बिनविरोध होणार नाही, सगळा खेळ…”, राज्यसभा निवडणुकीबाबत अजित पवारांचे सूतोवाच!

मराठा आरक्षण आंदोलनातील एक प्रमुख व्यक्ती, छत्रपती शिवाजी यांचे वंशज म्हणून त्यांनी काही महिन्यांपूर्वी राज्य सरकारवर हल्ला चढवला तेव्हा त्यांना मोठा पाठिंबा मिळाला होता. त्यांच्या आंदोलनादरम्यान, सुप्रीम कोर्टाने आरक्षण विरोधी याचिका स्वीकारल्यामुळे सरकार समाजाला आरक्षण देऊ शकले नाही अशी टीका करताना अनेक मराठा संघटनाही त्यांच्यात सामील झाल्या.

दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी याबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट केली होती. “राज्यसभा सदस्यत्वासाठी शिवसेना कोणत्याही अपक्षाला पाठिंबा देणार नाही. पक्ष स्वतःच्या सदस्यांना प्राधान्य देईल, असे राऊत म्हणाले होते.

Rajya Sabha Election: शिवरायांसमोर नतमस्तक होणाऱ्या फोटोसहीत संभाजीराजेंची पोस्ट; म्हणाले, “महाराज, तुमच्या…”

राज्यसभेच्या सहापैकी दोन जागा लढविण्याचे शिवसेनेने जाहीर केले आहे. एका जागेवर संजय राऊत आणि दुसऱ्या जागेवर संजय कदम हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. भाजपाच्या वतीने सहा वर्षांपूर्वी राज्यसभेवर संभाजीराजे यांची नामनियुक्त सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. तेव्हाही संभाजीराजे यांनी अपक्ष म्हणूनच सहा वर्षे खासदारकी भूषविली. या वेळीही त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याची तयारी केली आहे. पण अपक्ष लढल्यास विजयाचे गणित जुळणे अशक्य आहे. भाजपकडे २२ अतिरिक्त मते असली तरी अतिरिक्त २० मते मिळविण्याचे त्यांच्यापुढे आव्हान असेल.

संभाजीराजेंची कोंडी करण्याचा प्रयत्न – फडणवीस

छत्रपती संभाजीराजे यांना राज्यसभा उमेदवारी देण्याबाबतचा विषय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुरू केला. त्यानंतर हा विषय वेगळय़ा दिशेने गेला. यातून संभाजीराजेंची कोंडी करण्याचा प्रयत्न झाला आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Explained why chhatrapati sambhaji raje decided not to join shiv sena for rajya sabha candidature abn

Next Story
विश्लेषण : पँगाँग सरोवरावरील (Pangong Tso) नव्या पूलाचा चीनला नेमका काय फायदा होणार आहे ?
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी