गेल्या काही वर्षांपासून चीनमधील नागरिकांचे इतर देशांमध्ये स्थलांतर होण्याचे प्रमाण वाढले आहे. शी जिनपिंग यांच्या सलग तिसऱ्यांदा राष्ट्रध्यक्ष होणे असेल किंवा करोना नियंत्रणासाठी चिनी सरकारने केलेल्या कठोर उपाययोजना असतील, यामुळे अनेक चिनी नागरिकांमध्ये असंतोष असल्याचे बोललं जात आहे. महत्त्वाचे म्हणजे स्थलांतर करणारे चिनी नागरिक हे मोठ्या प्रमाणात कॅनडामध्ये स्थलांतर होत आहेत. याची नेमकी काय कारणं आहेत? सविस्तर जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – विश्लेषण: उपांत्यपूर्व फेरीतून कोणते संघ करणार आगेकूच? फ्रान्स, अर्जेंटिना, ब्राझील…?

कॅनाडामध्ये सर्वाधिक स्थलांतर

चीनमधील नागरिक हे मोठ्या प्रमाणात कॅनडामध्ये स्थलांतर होत आहेत. कॅनडा हे नेहमीच चीनमधील नागरीकांचे आवडते ठिकाण राहिले आहे. कॅनडा इमिग्रेशन आणि नागरिकत्व खात्याच्या आकडेवारीनुसार, जुलै ते सप्टेंबर २०२१ दरम्यान, ९ हजार ९२५ चिनी नागरिकांनी कॅनाडामध्ये कायमस्वरुपी नागरिकत्त्वासाठी अर्ज केला आहे. करोनानंतर म्हणजेच २०१९ नंतर हा आकडा १५ टक्क्यांनी वाढला आहे.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, या स्थलांतराला कॅनडा सरकारची विदेश नितीही काही प्रमाणात जबाबदार आहे. यामुळेच चीनमधील तरुण कॅनाडाकडे आकर्षित होत आहेत. चीनमधील नागरिकाला जरी कॅनाडाचे नागरिकत्व मिळाले नाही, तरी तो त्याच्या मुलांना कॅनडामध्ये शिक्षणासाठी पाठवतो आहे. जेणेकरून त्याला कॅनडाचे ग्रीन कार्ड मिळेल.

सहा वर्षांपूर्वी कॅनडामध्ये शिक्षणासाठी आलेल्या ली लिटॉंग म्हणातात, ”चीनमधील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष आणि असुरक्षिततेची भावना आहे. त्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात चीनमधून स्थलांतर करत आहेत. इतर काही देशांमध्येही अराजकतेची स्थिती आहे. मात्र, तरीही विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षिततेची भावना आहे”. एका चिनी डायस्पोरा प्रकाशनाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

”चीनमधील नागरिकांना कॅनाडमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक संधी उपलब्ध होत आहेत. येथील लोकशाही वातावरणामुळे चीनमधील नागरीक कॅनडाकडे आकर्षित होत आहेत. कॅनडा चिनी नागरिकांना स्वतःचे आणि त्यांच्या कुटुंबासाठी भविष्य घडवण्याची संधी देते”, असंही लिटॉंग म्हणाल्या आहेत.

हेही वाचा – विश्लेषण : उमर खालिद, खालिद सैफी यांची दिल्ली दंगलप्रकरणी का करण्यात आली सुटका?

इतर देशांमध्येही स्थलांतर

महत्त्वाचे म्हणजे चीनमधील लोकं कॅनडामध्येच स्थलांतर होत आहेत, असं नाही. येथील लोकं कॅनाडाबरोबरच अमेरिका आणि ऑस्ट्रेलियातही स्थलांतर होत आहेत. चांगल्या आर्थिक संधी, निर्बंध मुक्त वातावरण, लोकशाही समाज, अभ्यासाच्या संधी मिळाव्या यासाठी चिनी नागरिक जगभरातील विविध देशांमध्ये स्थलांतर करण्याच्या प्रयत्नात आहेत.

हेही वाचा – विश्लेषण: ८० हून अधिक लोकांचे प्राण घेणारा ‘Blackout Challenge’ चा ऑनलाईन ट्रेंड नेमका आहे तरी काय?

चीनमधील उद्योपतीही स्थलांतराच्या प्रयत्नात

विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांबरोबरच चीनमधील श्रीमंत नागरीक आणि उद्योपती सुद्धा चीनमधून इतर देशांमध्ये स्थलांतर होण्याच्या प्रयत्नात आहेत. तज्ज्ञाच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही वर्षांपासून चीनची अर्थव्यवस्था मंदावली आहे. त्यामुळे येथील उद्योगपतींना त्यांचे उद्योग आणि भविष्याची चिंता आहे. त्यामुळे अनेक उद्योगपती सुद्धा आपल्या कुटुंबियांसह अमेरिका आणि कॅनाडासारख्या देशांमध्ये स्थलांतर होताना दिसून येत आहे.

चीनमधील राजकीय स्थिती सध्या ठिक असली, तरी अधूनमधून राजकीय अस्थितरता निर्माण झाल्याचे दिसून आलं आहे. त्यामुळे सुद्धा अनेक नागरिक राजकीय स्थिरता असलेल्या देशांमध्ये स्थलांतर करण्याच्या प्रयत्नात आहेत. अमेरिका आणि कॅनाडा सारख्या देशांमध्येसुद्धा अनेकदा राजकीय अस्थितरता निर्माण झाली आहे. मात्र, तरीही हे देश चीनपेक्षा सुरक्षित असल्याची भावना चिनी नागरिकांमध्ये आहे.

एकंदरीतच, चीनमधील नागरिकांमध्ये सामाजिक आणि आर्थिक विकासाच्या संधी मर्यादित असल्याची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे इतर देशामध्ये जाऊन येथील नागरिक नवीन संधीच्या शोधात आहेत.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained why chinese people migration toword canada has increase spb
First published on: 09-12-2022 at 07:00 IST