देशाच्या तीनही सैन्यदलांचे दुसरे संरक्षण प्रमुख (चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ – सीडीएस) म्हणून लेफ्टनंट जनरल (निवृत्त) अनिल चौहान यांची नियुक्ती झाली आहे. त्यांच्याकडे ११ गोरखा रायफल्सची देखील जबाबदारी सोपवण्यात आली होती. यानिमित्ताने गुरखा रेजिमेंटमधून संरक्षण दलांस दुसरे सीडीएस लाभले आहेत. तसेच, रावत यांच्याप्रमाणेच चौहान हेही उत्तराखंडचे मूळ निवासी आहेत.

39 बटालियनमधील ३० हजार गोरखा सैनिक नऊ रेजिमेंटमध्ये विभागले गेले आहेत, भारताकडे असे बरेच शूर योद्धे आहेत ज्यांनी देशाची सेवा केली आहे. बिपिन रावत हे गोरखा रेजिमेंटमधून आलेले लेफ्टनंट जनरल होते आणि गोरखा रेजिमेंटच्या गणवेशाची टोपी थोडीशी ‘तिरकस’ असते. गोरखांच्या तिरकस टोपीचे नाव ‘गोरखा तराई हॅट’ असे नेपाळमधील तराई प्रदेशावरून पडल्याचे सांगितले जाते.

गार्ड ड्युटी आणि परेडच्या वेळी परिधान केली जाणारी ही रुंद काठ असलेली तिरकस टोपी खाकी रंगाची असते. शिवाय टोपीला असलेला पट्टा (चिन स्ट्रॅप) उजव्या बाजूला कमी झुकलेला असतो, जेणेकरून टोपीच्या एका बाजूचा स्पर्श कानाला होईल.

गोरखा रेजिमेंटमधील जवानांची उंची ही अन्य सैनिकांच्या तुलनेत काहीशी कमी असते, असे दिसून आले आहे. त्यामुळे त्यांच्या सर्वांच्या टोप्या अशा पद्धतीने बनवलेल्या असतात जेणेकरून ते सर्व एकसमान दिसावेत. शिवाय या टोपीचा पट्टा हा ओठांच्या बरोबर खाली हनुवटीवर असतो, ज्यामुळे सहजरित्या बोलणे काहीसे कठीण जाते. जे की युद्धाच्या प्रसंगात जेव्हा गोरखा रेजिमेंटकडून एखाद्या ठिकाणी नियोजनबद्धरित्या हल्ला केला जातो, तेव्हा गोरखा सैनिकांकडून बोलले जाऊ नये यासाठी देखील उपयोगी ठरते. याशिवाय कृतीतून बोला असा देखील यातून संदेश जातो. गोरखा सैनिकांची टोपी ही पारंपारिक असून तिचा आकार बदलला जात नाही ती परंपरेप्रमाणेच ठेवला जाते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गोरखा हॅट ही प्रत्येक गोरखा अधिकाऱ्यासाठी अतीव अभिमानाची गोष्ट असते. ती हॅट परिधान करण्यासारखा दुसरा कुठलाच सन्मान नाही असे प्रत्येक अधिकाऱ्याला वाटते. गोरखांचे शस्त्र म्हणजे खुकरी (एक विशिष्ट प्रकारचा सुरा) असते.