इराणचे माजी सरकारी अधिकारी अलिरेझा अकबरी यांना सोडण्याचं आवाहन ब्रिटनच्या परराष्ट्र कार्यालयानं इराणला केलं आहे. इराणने अकबरी यांना ब्रिटनसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावणी आहे. त्यांना लवकरच फाशी होण्याची शक्यता आहे. इराणी वृत्तसंस्था तस्नीमच्या हवाल्यानं रॉयटर्सनं याबाबतचं वृत्त दिलं आहे. मात्र, अलिरेझा अकबरी नेमके कोण आहेत? त्यांची राजकीय कारकीर्द नेमकी कशी राहिली आहे? आणि इराणने त्यांच्यावर नेमके काय आरोप केले आहेत? सविस्तर जाणून घेऊया.

हेही वाचा – विश्लेषण: जिवंत कोंबड्यांचे हत्यार! शीतयुद्धातील ऑपरेशन ब्ल्यू पिकॉकचे हादरवून टाकणारे सत्य जाणून घ्या

Abhishek Ghosalkar, murder,
अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण : एकापेक्षा जास्त व्यक्तींच्या सहभागाच्या दृष्टीने तपास केला का ? उच्च न्यायालयाची पोलिसांना विचारणा
Neelam Gorhe criticize Uddhav Thackeray said he has lost his base politically
“उद्धव ठाकरे यांचा राजकीयदृष्ट्या जनाधार संपला,” निलम गोऱ्हे यांची टीका; म्हणाल्या…
sanjay raut narendra modi
“रोज नवे जोक, देशात जॉनी लीवरनंतर…”, मेरठच्या सभेतील मोदींच्या ‘त्या’ वक्तव्यावरून संजय राऊतांचा टोला
chirag paswan interview
काका-पुतण्यांमधील राजकीय लढाईचा अंत? काय म्हणाले चिराग पासवान?

कोण आहेत अलिरेझा अकबरी?

अलिरेझा अकबरी इराणमधील एक राजकीय नेते आहेत. इराणमधील एक मवाळ राजकारणी म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या राजकीय कारकीर्दीत त्यांनी अनेकदा पाश्चात्य देशांशी संवाद साधताना मध्यस्थ म्हणून काम केलं आहे. इराण-इराक युद्धादरम्यानही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. यावेळी त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या निरीक्षकांबरोबरही काम केलं होतं. अकबरी हे १९९७ ते २००५ या काळात इराणचे अध्यक्ष मोहम्मद खतामी यांच्या सरकारमध्ये उपसंरक्षण मंत्री होते. त्यावेळी, अकबरी यांनी इराण आण्विक कराराचं समर्थक केलं होते. २०१५ मध्ये पाश्चात्य देश आणि तेहरान यांच्यात हा करार झाला होता. इराणची अण्वस्त्रे विकसित करण्याची क्षमता मर्यादित करण्यासाठी या करारांवर स्वाक्षरी करण्यात आली होती. याबदल्यात, पाश्चात्य देशांनी इराणवरील काही व्यापारी निर्बंध हटवण्यास सहमती दर्शविली होती. याबरोबरच इतर देशांना इराणमधील आण्विक साइट्सची तपासणी करण्याची द्यावी, अशी भूमिका त्यांनी मांडली होती. यामुळे पाश्चात्य देशांशी भविष्यातील संबंध मजबूत होण्यास मदत होईल, असं त्यांचं मत होतं.

अकबरी यांच्यावर काय आरोप आहेत?

बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांचे अनेक देशात वास्तव्य होते. पुढे ते ब्रिटनमध्ये स्थायिक झाले. २०१९ पासून ते सार्वजनिक जिवनातही फारसे दिसले नाहीत. त्यांनी ब्रिटनमध्ये अनेक सरकारी अधिकाऱ्यांची भेट घेतल्याच्या वृत्तानंतर त्यांनी इराणची संवेदनशील माहिती ब्रिटनला दिल्याचा आरोप इराणकडून करण्यात आला. बीबीसीच्या म्हणण्यानुसार, अकबरी यांना इराणच्या एका वरिष्ठ राजनैतिक अधिकाऱ्यानं भेटण्यासाठी इराणला बोलावलं होतं. अकबरी तिथे गेल्यावर त्यांच्यावर ब्रिटनची गुप्तचर एजन्सी ‘एमआय ६’साठी काम केल्याचा आरोप करत त्यांना अटक करण्यात आली. याप्रकरणी त्यांना इराणने फाशीची शिक्षाही सुनावली आहे.

हेही वाचा – विश्लेषण : Hajj Yatra 2023 – मोदी सरकारने का रद्द केला हज यात्रेचा ‘VIP कोटा’? जाणून घ्या, कुणाकडे किती होता कोटा

अकबरींच्या पत्नीने आरोप फेटाळले

‘द गार्डियन’ने दिलेल्या वृत्तानुसार, अकबरी यांची पत्नी मरियम यांनी इराणने केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. “साधारण १० ते १२ वर्षांपूर्वी अकरबी यांनी ब्रिटीश अधिकार्‍यांची औपचारिक भेट घेतली होती. यावेळी अकबरी हे आपल्या पदावर होते. त्यानंतर ब्रिटनच्या अधिकाऱ्यांशी त्यांची कधीही भेट झाली नाही. ते गुप्तहेर नाहीत. इराणच्या गुप्तचर अधिकाऱ्यांनी अकबरी यांनी इस्टेट एजंटच्या घेतलेल्या भेटीचा चुकीचा अर्थ लावला आहे”, अशी प्रतिक्रिया मरियम यांनी दिली. विशेष म्हणजे, बीबीसी पर्शियनला अकबरी यांच्या काही ऑडिओ क्लिपही मिळाल्या आहेत. ज्यामध्ये ते इराणकडून कथितपणे छळ करण्यात आला आणि कबुलीजबाब देण्यास भाग पाडल्याबद्दल बोलत आहेत.

ब्रिटनची भूमिका काय?

ब्रिटनच्या परराष्ट्र कार्यालयानं एक निवेदन जारी करत अलिरेझा अकबरी यांना सोडण्याचं आवाहन इराण सरकारला केलं आहे. “हे एका क्रूर राजवटीचं राजकीय कृत्य आहे. या प्रकरणामध्ये मानवी जीवाची पूर्णपणे अवहेलना करण्यात आली आहे.” असं ब्रिटनने या निवेदनात म्हटलं आहे. तसेच “आम्ही अकबरी यांच्या कुटुंबियांच्या पाठिशी असून वारंवार इराण सरकारकडे अकबरी यांची बाजू मांडली आहे. तसेच आम्हाला कॉन्सुलर अ‍ॅक्सेस द्यावा, अशी मागणीही या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

हेही वाचा – विश्लेषण : सौदी अरेबियात नागरिकत्वाच्या नियमांत बदल, जाणून घ्या नवे नियम?

कॉन्सुलर अ‍ॅक्सेसच्या मागणीला इराणचा विरोध

‘द गार्डियन’ने अकबरी यांच्या पत्नीचा हवाला देत त्यांच्याकडे ब्रिटीश नागरीकत्व असल्याचे म्हटलं आहे. इराणमध्ये दुहेरी नागरित्वाला मान्यता नाही. त्यामुळे आम्ही परदेशी नागरिकांना आरोपीला भेटण्यासाठी किंवा संबंधित खटल्याला उपस्थित राहण्यासाठी परवानगी देऊ शकत नाही, अशी इराणची भूमिका आहे.