फिफा विश्वचषक २०२२ ला २० नोव्हेंबरपासून सुरूवात होत आहे. फुटबॉल विश्वचषकाच्या या महाकुंभमेळ्याला यजमान कतार आणि इक्वेडोर यांच्या सामन्याने सुरुवात होणार आहे. फिफा विश्वचषक स्पर्धेत एकूण ३२ संघ सहभागी होत असून त्यांची 8 गटात विभागणी करण्यात आली आहे. या दरम्यान, एकूण ४८ लीग सामने खेळवले जातील, ज्यामध्ये १६ सर्वोत्तम कामगिरी करणारे संघ पुढील फेरीत पोहोचतील. जवळपास महिनाभर चालणाऱ्या या स्पर्धेचा अंतिम सामना १८ डिसेंबरला होणार आहे. पण त्याआधीच हा विश्वचषक वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

मानवाधिकार उल्लंघनापासून ते देशात बनावट चाहते आणण्यापर्यंतच्या अनेक मुद्द्यांमुळे हा विश्वचषक चर्चेत आला आहे. आता आणखी एक मुद्दा समोर आला आहे, जो विश्वचषक स्पर्धेपूर्वीच वादग्रस्त बनलेल्या गोष्टींच्या यादीत भर घालतो. विश्वचषकाचा आनंद लुटण्यासाठी जगभरातून फुटबॉल चाहते कतारला पोहोचले आहेत. फुटबॉल सामन्यादरम्यान चाहत्यांमध्ये एक वेगळाच उत्साह पाहायला मिळतो, मात्र इस्लामिक देश कतारमध्ये होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत चाहत्यांवर अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत, ज्यामुळे त्यांची मजा ही खिळखिळी होईल. अशा परिस्थितीत, फिफा विश्वचषकादरम्यान कतारमध्ये येणाऱ्या चाहत्यांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत आणि इथले नियम न पाळणाऱ्यांना काय शिक्षा होऊ शकते हे जाणून घेऊया.

IPL 2024 CSK Themed Wedding Invitation Card Went Viral
IPL 2024: चेन्नईच्या चाहत्यांचा नाद खुळा! CSK ची थीम अन् आयपीएलच्या तिकीटासारखी लग्नपत्रिका होतेय व्हायरल
wresters deepak punia sujeet denied entry to asia olympic qualifiers tournament
आशिया ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत दीपक, सुजितला प्रवेश नाकारला! दुबईतील पावसामुळे बिश्केकमध्ये पोहोचण्यास उशीर
bjp to defeat mamta banerjee in loksabha
ममतादीदींच्या तृणमूलचा पराभव करण्यासाठी भाजपाला ‘या’ जागा जिंकण्याची गरज; पश्चिम बंगालमध्ये पक्षाची स्थिती काय?
Rahul Gandhi Helicopter
हेलिकॉप्टरचे इंधन संपल्यामुळे राहुल गांधींवर शहडोलमध्येच रात्र काढण्याची वेळ, प्रशासनाची धावपळ

हेय्या कार्ड

कतारमध्ये फिफा विश्वचषक पाहण्यासाठी हैय्या कार्ड ही एक पूर्व अट आहे. या कार्डाशिवाय कोणालाही कतारमध्ये प्रवेश मिळू शकत नाही. केवळ कार्डधारकांनाच फुटबॉल सामने पाहण्यासाठी स्टेडियममध्ये जाता येणार आहे. या कार्डद्वारे चाहते सामन्याच्या दिवशी सार्वजनिक वाहतूक विनामूल्य वापरू शकतात. कतारमध्ये येणाऱ्या मुलांसाठीही हे कार्ड आवश्यक असेल. या हैय्या कार्डसाठी फिफाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन नोंदणी करावी लागेल. नोंदणी प्रक्रियेदरम्यान, लोकांना त्यांचे तपशील भरावे लागतील, ज्यात त्यांच्या कतारमधील वास्तव्याचे तपशील, आपत्कालीन संपर्क इत्यादी. या कार्डामुळे कतारमध्ये व्हिसाची गरज भासणार नाही आणि २३ जानेवारी २०२३ पर्यंत चाहते हे कार्ड दाखवून राहू शकतात.

मद्यपान करण्यावर बंदी

इस्लामिक देश असल्याने कतारमध्ये दारूवर बंदी आहे. त्याचबरोबर जगभरातून येथे येणाऱ्या फुटबॉलप्रेमींसाठी दारूबाबत काही नियम करण्यात आले आहेत. युरोपमध्ये, फुटबॉल सामन्यादरम्यान चाहत्यांसाठी मद्यपान करणे ही सामान्य बाब आहे, परंतु कतारमध्ये ते तसे करू शकणार नाहीत. फिफा विश्वचषकासाठी कतार सरकारने दारूसाठी काही नियम ठरवले आहेत. याअंतर्गत चाहत्यांना सामना सुरू होण्याच्या तीन तास आधी आणि तो संपल्यानंतर एक तासच दारू खरेदी करता येणार आहे. त्याचबरोबर त्याला सामन्यादरम्यान मद्यपान करण्यास बंदी घालण्यात आली आहे. अशा परिस्थितीत जर कोणी हा नियम मोडण्याचा प्रयत्न केला तर त्यांना कठोर शिक्षा होऊ शकते.

कपड्यांबाबत विशिष्ट नियम

आपल्या फुटबॉल टीमला चिअर करण्यासाठी इतर देशांतून आलेल्या महिला चाहत्यांना नीट कपडे घालण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसे न केल्यास त्यांना कतार येथील कायद्यानुसार तुरुंगात जावे लागू शकते. इस्लामिक नियमांनुसार, महिला चाहत्यांनी त्यांच्या शरीराचा वरचा भाग झाकणे आवश्यक आहे. याशिवाय त्यांना गुडघ्यापेक्षा वरचे कपडे घालण्याची परवानगी दिली जाणार नाही. याव्यतिरिक्त, पुरुष चाहत्यांना स्टेडियममध्ये त्यांचे शर्ट काढण्याची परवानगी दिली जाणार नाही. महिला चाहत्यांना स्टेडियममध्ये पूर्ण कपड्यांमध्ये येणे बंधनकारक आहे. गर्दीत कोणी पुरुष असो किंवा महिला यांनी सामना सुरू असताना त्यांचा शर्ट काढून जल्लोष केला, तरी त्यांना जेल होऊ शकते. स्टेडियममध्ये असे कॅमेरे आहेत की ते कृत्य सहज पकडून शकतात. त्यानंतर त्या व्यक्तीची रवानगी थेट तुरुंगात होऊ शकते.

कतारमधील कायद्यांनुसार महिलांना सार्वजनिक ठिकाणी कपडे परिधान करण्यासंदर्भात विशिष्ट नियम घालून दिले आहेत. हा नियम मोडल्यास तो दंडनीय गुन्हा मानला जातो. तथापि, फिफाच्या वेबसाइटवर असे म्हटले आहे की महिलांना त्यांच्या आवडीचे कपडे घालण्याची परवानगी आहे, परंतु त्यांनी कतारमध्ये प्रचलित असलेल्या कायद्यांचा आदर आणि जाणीव ठेवली पाहिजे. “लोक साधारणपणे त्यांच्या आवडीचे कपडे घालू शकतात. संग्रहालये आणि इतर सरकारी इमारतींसारख्या सार्वजनिक ठिकाणी भेट देताना पाहुण्यांनी व्यवस्थित पेहराव करणे अपेक्षित आहे,” असे फिफाची वेबसाइटवर सांगण्यात आले आहे.