scorecardresearch

विश्लेषण: भारताच्या UPI सिस्टीममध्ये PayNow ची जोडणी; या बदलाने नेमका तुम्हाला कसा फायदा होणार?

UPI Update: भारतात गूगल पे चा वापर आता सर्वत्र सर्रास केला जातो. अगदी महागड्या मॉलपासून ते नाक्यावरील भाजीवाले, चहावाले सर्वत्र आता ऑनलाईन पेमेंटचे स्कॅनर पाहायला मिळतात.

Google Pay UPI Linked With Pay Now System How This Change Will Benefits Indians Explained
विश्लेषण: भारताच्या UPI सिस्टीममध्ये PayNow ची जोडणी (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

Google Pay Update: भारतात गूगल पे चा वापर आता सर्वत्र सर्रास केला जातो. अगदी महागड्या मॉलपासून ते नाक्यावरील भाजीवाले, चहावाले सर्वत्र आता ऑनलाईन पेमेंटचे स्कॅनर पाहायला मिळतात. आता याच युपीआय पेमेंटबाबत एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे. BharatPe व Paytm सारख्या अॅप्सद्वारे जलद डिजिटल पेमेंट करणारी भारताची रिअल-टाइम रिटेल पेमेंट सिस्टम युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI), आणि सिंगापूरमधील Pay Now नावाचे त्याचे समतुल्य नेटवर्क आता एकत्रित करण्यात आले आहेत. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास आणि सिंगापूरचे चलन प्राधिकरण (MAS) व्यवस्थापकीय संचालक रवी मेनन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे पंतप्रधान ली सिएन लूंग यांच्या उपस्थितीत नवीन लिंकेज लाँच केले.

UPI काय आहे?

युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) ही भारताची मोबाइल-आधारित जलद पेमेंट प्रणाली आहे, जी ग्राहकांनी तयार केलेला व्हर्च्युअल पेमेंट अॅड्रेस (VPA) वापरून ग्राहकांना चोवीस तास त्वरित पेमेंट करण्याची सुविधा देते. पैसे पाठवणार्‍याद्वारे बँक खात्याचे तपशील शेअर करण्याची गरज नसल्याने धोका दूर होतो. UPI पर्सन-टू-पर्सन (P2P) आणि पर्सन टू मर्चंट (P2M) दोन्ही पेमेंटसाठी वापरता येते.

PayNow काय आहे?

PayNow ही सिंगापूरमधील एक जलद पेमेंट प्रणाली आहे. हे पीअर-टू-पीअर फंड ट्रान्सफर सेवा सक्षम करते, जी किरकोळ ग्राहकांना सिंगापूरमधील सहकारी बँका आणि नॉन-बँक वित्तीय संस्थांद्वारे (NFIs) उपलब्ध करून देण्यात आली आहे. वापरकर्त्यांना त्यांचा मोबाईल नंबर, सिंगापूर नॅशनल रजिस्ट्रेशन आयडेंटिटी कार्ड (NRIC)/फॉरेन आयडेंटिफिकेशन नंबर (FIN), किंवा VPA वापरून ही सेवा वापरता येते. सिंगापूरमधील बँक किंवा ई-वॉलेट खात्यातून दुसऱ्या बँकेत त्वरित निधी पाठवण्याची आणि प्राप्त करण्याची सोय या प्रणालीद्वारे मिळते.

UPI- PayNow मधील जोडणीने काय फायदा होईल?

दोन देशांच्या अंतर्गत रिटेल पेमेंट्स सामान्यतः कमी पारदर्शक असतात आणि देशांतर्गत व्यवहारांपेक्षा अधिक महाग असतात. UPI-PayNow लिंकेज हे भारत आणि सिंगापूर दरम्यान सीमापार पेमेंटसाठी एक महत्त्वपूर्ण जोडणी ठरू शकते. G20 च्या आर्थिक उद्दिष्टांनुसार, अधिक वेगाने, स्वस्त आणि अधिक पारदर्शक क्रॉस-बॉर्डर पेमेंट चालवण्यासाठी ही प्रणाली कामी येऊ शकते.

या वर्षी रोटेशनल सदस्यत्व रचनेच्या आधारावर भारत G20 चे अध्यक्षपद भूषवत आहे. सिंगापूर, जरी G20 सदस्य नसला तरी, २०१० ते २०११ आणि २०१३ ते २०२३ या कालावधीत G20 शिखर परिषद आणि त्याच्याशी संबंधित प्रक्रियांमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. दोन्ही देशांमधील व्यापार, प्रवास याच्याशी संबंधित जलद, अधिक कार्यक्षम आणि पारदर्शक सीमापार व्यवहार सुलभ करण्यासाठी दोन्ही जलद पेमेंट प्रणालींना जोडण्याचा प्रकल्प सप्टेंबर २०२१ मध्ये सुरू करण्यात आला.

हे ही वाचा<< विश्लेषण: स्वरा भास्करने विशेष विवाह कायद्यानुसार केलं लग्न; या कायद्याच्या अटी व नियम काय आहेत, कोणाला होतो फायदा?

UPI- PayNow लिंकचा नागरिकांना कसा फायदा होईल?

आरबीआय रेमिटन्स सर्व्हे, २०२१ नुसार. २०२० -२१ मध्ये भारतात आलेल्या एकूण आवक रेमिटन्सपैकी सिंगापूरचा वाटा ५.७ टक्के होता. UPI- PayNow लिंकेजमुळे प्रत्येक दोन जलद पेमेंट सिस्टमच्या वापरकर्त्यांना इतर पेमेंट सिस्टममध्ये प्रवेश न करता परस्पर वेगवान पेमेंट करता येईल. हे सिंगापूरमधील भारतीय रहिवाशी, विशेषत: स्थलांतरित कामगार आणि विद्यार्थ्यांना, सिंगापूरमधून भारतात तात्काळ आणि कमी खर्चात पैसे हस्तांतरित करण्यासाठी सुद्धा मदत होऊ शकते.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-02-2023 at 17:32 IST
ताज्या बातम्या