Hi Mum Scam on WhatsApp: व्हॉट्सअप जगभरात सर्वाधिक वापरलं जाणारं मेसेजिंग अॅप आहे. कोट्यवधी लोकं या अॅपचा दररोज वापर करतात. सध्या याच मेसेजिंग अॅपवर कोट्यवधी रुपयांची चोरी करणारा एक स्कॅम होत आहे. सध्या ‘Hi Mum’ नावाच्या स्कॅमची जोरदार चर्चा सुरू आहे. २०२२ मध्ये ऑस्ट्रेलियातील शेकडो व्हॉट्सअ‍ॅप यूजर्संना ५७ कोटी रुपयांहून अधिकचा गंडा घालण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियाच्या ग्राहक व स्पर्धा आयोग (ACCC) नुसार, मागील तीन महिन्यात या घोटाळ्यात १० पट अधिक नागरिकांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

काय आहे Hi Mum’ स्कॅम?

प्राप्त माहितीनुसार यामध्ये सुरुवातीला आपल्याला व्हॉट्सअ‍ॅपवर एक कुटूंबातील सदस्य किंवा मित्र असल्याचे सांगत मॅसेज केला जातो. माझा फोन त्यांचा फोन हरवला आहे किंवा डॅमेज झाला आहे म्हणून मी या नंबरवरून मेसेज करतोय असे सांगून तुम्हाला जाळ्यात अडकवले जाते. आपल्या सध्या मदतीची गरज आहे म्हणून संबंधित नंबरवर पैसे पाठवण्यास सांगितले जाते. अर्थात अशा परिस्थितीत संशयाला फार कमी जागा असल्याने अनेकजण सांगितलेली रक्कम त्या नंबरवर पाठवतात.

दरम्यान, भारतात अजूनपर्यंत अशा घोटाळ्याची तक्रार प्राप्त झालेली नाही. फसवणुकीचे प्रकार ऑस्ट्रेलियात घडले असले तरी भारतीयांनी याबाबत सतर्क राहिले पाहिजे. भारतातही सायबर गुन्ह्यांची प्रकरणे वाढली आहेत. अलीकडे सिम स्वॅपिंग, क्यूआर कोड स्कॅम आणि फिशिंग लिंकना अनेकांना कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले होते. काही दिवसांपूर्वी भारतात सुद्धा एका व्यक्तीला कॉल मॅसेज नव्हे तर चक्क मिसकॉल देऊन लुटण्यात आले होते. यापासून सुरक्षित राहण्यासाठी ACCC ने काही खास मार्ग सांगितले आहेत.

हे ही वाचा<<विश्लेषण: आपला मृत्यू कधी होणार हे सांगू शकते एक ‘डेथ टेस्ट’? एखाद्याच्या मृत्यूची भविष्यवाणी कशी केली जाते?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सर्वात मुख्य म्हणजे जर तुम्हाला अनोळखी क्रमांकावरून मॅसेज आला असेल तर निदान ज्या माणसाचं नाव घेऊन मॅसेज केलाय त्याला कॉल करून शहानिशा करावी. स्कॅमर वैयक्तिक माहिती देखील विचारू शकतात, ज्याचा वापर नंतर कुटुंबातील इतर सदस्यांना फसवण्यासाठी केला जाऊ शकतो.