देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) अल्पवयीय मुलांसाठी बचत खाते उघडण्याची सुविधा देत आहे. १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी त्यांचे पालक सहजपणे खाते उघडू शकतात. स्टेट बँक ऑफ इंडिया मुलांना दोन कॅटगरीमध्ये खाती उघडण्याची सुविधा देते. पहिल्या कॅटगरीचे नाव पहला कदम (PehlaKadam) आणि दुसऱ्या कॅटगरीचे नाव पहली उड़ान (SBI Pehli Udaan) आहे. मात्र, हे खाते उघडण्यामागचे नेमके फायदे काय आहेत आणि खाते उघडण्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्कता आहे. जाणून घेऊया.

हेही वाचा- विश्लेषण : म्हाडा सोडतीत बदल? आता तपासली जाणार अर्जदारांची पात्रता!

Competition among 7 companies under incentive scheme for ACC production
‘एसीसी’ उत्पादनासाठी प्रोत्साहन योजनेअंतर्गत ७ कंपन्यांमध्ये चढाओढ
nestle India shares slip after reports says baby food contain high levels of added sugar
नेस्लेला ८,१३७ कोटी बाजार भांडवलाची झळ; दुग्धजन्य पदार्थांबाबतच्या वृत्ताने भांडवली बाजारात समभागात घसरण
sewage treatment plants for residential complexes from thermax
‘थरमॅक्स’कडून निवासी संकुलांसाठीही सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प; पुनर्वापरामुळे पाण्याची ८० टक्के बचत शक्य
Efforts continue to rescue a six-year-old boy who fell into a borewell in Madhya Pradesh'
VIDEO : ४० फूट खोल बोअरवेलमध्ये अडकला चिमुकला, १२ तासांपासून आपत्कालीन प्रतिसाद दलाकडून शर्थीचे प्रयत्न

ही दोन्ही बचत खाती ग्राहक घरबसल्या एसबीआय मोबाईल बँकिंग अॅप योनो (SBI YONO) वरून उघडू शकतात. या दोन्ही खात्यांची खास गोष्ट म्हणजे या दोन्ही खात्यांमध्ये किमान शिल्लक ठेवण्याची कोणतीही अडचण नाही. यासोबतच या खात्यात नेट बँकिंग (Net Banking), मोबाईल बँकिंग (Mobile Banking) यासारख्या सुविधाही उपलब्ध आहेत.

पहला कदम बँक बचत खाते

पहला कदम बँक बचत खाते कोणत्याही वयोगटातील अल्पवयीन मुलासाठी उघडले जाऊ शकते. हे खाते पालक किंवा पालकांसोबत एकत्रितरित्या देखील उघडले जाऊ शकते. फक्त मुलाच्या नावाने खाते उघडता येत नाही. हे खाते मुलगा आणि पालक दोघेही स्वतंत्रपणे हाताळू शकतात. या खात्यावर, बँक डेबिट कार्ड जारी करते, ज्यामधून तुम्ही ५ हजार रुपये काढू शकता. या खात्यात तुम्हाला २ हजार रुपयांच्या मोबाईल बँकिंग व्यवहारांची परवानगी मिळते. या खात्यात एक चेकबुक देखील उपलब्ध आहे, ज्यामध्ये १० चेक आहेत. हे चेकबुक पालकाच्या नावाने दिले जाते. हे खाते उघडताना मोबाईल क्रमांक नोंदविणे आवश्यक आहे.

हेही वाचा- विश्लेषण : चित्रपटांचं अर्थकारण, कोटींचं बजेट आणि कमाईच्या आकड्यांमागील तथ्य जाणून घ्या

पहली उड़ान बचत खाते

स्टेट बँक पहली उड़ान बचत खाते १० वर्षांपेक्षा जास्त आणि १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी उघडता येते. हे खाते फक्त मुलांच्या नावाने एकल खाते म्हणून उघडता येते. अल्पवयीन मुले हे खाते एकटे हाताळू शकतात. या खात्यात डेबिट कार्ड सुविधा देखील उपलब्ध आहे, ज्याची दैनिक मर्यादा ५ हजार रुपये आहे. यासोबतच नेट किंवा मोबाईल बँकिंगद्वारे या खात्यात २ हजार रुपये ट्रान्सफर करता येतील. तसेच, खातेधारकाला एक चेकबुकही देण्यात येतं. ज्यामध्ये १० चेक देण्यात आले आहेत.

हेही वाचा- विश्लेषण : सुब्रमण्यम स्वामींची संविधानाच्या प्रास्ताविकेतून समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता शब्द काढण्याची मागणी, या वादाचा इतिहास काय?

खाते उघडण्याची प्रक्रिया

तुम्ही स्टेट बँक पहला कदम बचत खाते आणि पहली उडान बचत खाते ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही उघडू शकता. मोबाईल बँकिंग अॅप योनोवर ऑनलाईन पद्धतीने खाते उघडू शकता. याशिवाय तुम्ही तुमच्या घराजवळील एसबीआयच्या शाखेत जाऊन ऑफलाईन खाते उघडू शकता. यासाठी तुम्हाला आधार कार्ड, पालकांचे आधार आणि पॅन आवश्यक असेल.