आग्नेय आशियातील लाओस या देशात मद्यपान केल्याने सात परदेशी पर्यटकाचा मृत्यू झाला. या पर्यटकांनी ‘मिथेनॉल’मिश्रित मद्याचे सेवन केल्याने त्यांना प्राण गमवावे लागले, असे तेथील अधिकाऱ्यांनी सांगितले. अमेरिकी प्रशासनाने परदेशी पर्यटकांना मिथेनॉल विषबाधेच्या संभाव्य धोक्याबाबत सावध राहण्याचा इशारा दिला आहे. मिथेनॉल काय आहे आणि ते मिसळलेले मद्य घातक कसे याविषयी…

लाओसमध्ये काय घडले?

लाओसमधील वांग व्हिएंग येथे मिथेनॉल विषबाधामुळे आतापर्यंत सहा परदेशी पर्यटकांचा मृत्यू झाला. या आठवड्याच्या सुरुवातील एका अमेरिकी व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यानंतर १९ व २० वर्षीय दोन डॅनिश तरुणींचाही अशाच परिस्थिती मृत्यू झाला, तर गुरुवारी १९ वर्षीय ऑस्ट्रेलियन पर्यटकाचा बळी गेला. शुक्रवारी मिथेनॉल विषबाधामुळे दोन ऑस्ट्रेलियन किशोरवयीन मुलींचा तर एका ब्रिटिश महिलेचा मृत्यू झाला, अशी माहिती स्थानिक प्रशासनाने दिली. या प्रकरणातील व्यक्तींच्या मृत्यूचा तपास केल्यानंतर पीडितांनी मिथेनॉलयुक्त पेये सेवन केल्याचे आढळले. हा विषारी पदार्थ स्थानिक अवैध अल्कोहोलमध्ये आढळतो. स्वस्तामध्ये मिथेनॉलयुक्त मद्य मिळत असल्याने पर्यटक याचे सेवन करतात, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

patient dies due to negligence culpable homicide case registered against doctor
हलर्गजीपणामुळे रुग्णाचा मृत्यू; डॉक्टर विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
1.5 thousand people committed suicide in Vasai Bhayander in 5 years
५ वर्षात वसई, भाईंदर मध्ये दिड हजार जणांच्या आत्महत्या;२०२४ मध्ये गळाफास घेऊन सर्वाधिक आत्महत्या
buldhana students hospitalized loksatta
बुलढाणा : शेगाव गतिमंद विद्यालयातील १४ विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; एकाचा मृत्यू
Makar Sankranti motorcyclist died after nylon manja got stuck in his neck
नाशिकमध्ये नायलाॅन मांजामुळे युवकाचा मृत्यू
nitin gadkari
Nitin Gadkari : करोना, दंगली, लढायांपेक्षा अधिक मृत्यू अपघातांमुळे… खुद्द गडकरींनीच…
Excessive use of chemical fertilizers disrupts the natural chain says MLA Arun Lad
रासायनिक खतांच्या बेसुमार वापरामुळे निसर्ग साखळी विस्कळीत – आमदार अरूण लाड
Tirupati stampede
Tirupati stampede : तिरुपती बालाजी मंदिरात चेंगराचेंगरी, सहा भाविकांचा मृत्यू

हेही वाचा : Volkswagen: अ‍ॅडॉल्फ हिटलरने स्वप्नपूर्तीसाठी ‘फोक्सवॅगन’ गाडीला आकार का दिला?

मिथेनॉल म्हणजे काय?

अल्कोहोलचे तीन मुख्य प्रकार आहेत… इथेनॉल, मिथेनॉल आणि आयसोप्रोपिल. बहुतेक मद्यामध्ये इथेनॉलचाच वापर करतात. इथेनॉल हेच अल्कोहोल मद्याच्या वापरासाठी बनवलेले आहे. मात्र बहुतेक अवैध मद्यनिर्मिती करणारे मिथेनॉल आणि आयसोप्रोपिल या अल्कोहोलचाही वापर करतात. हँड सॅनिटायइझरच्या बाटलीवर समाविष्ट घटकामध्ये आयसोप्रोपाइल अल्कोहोल असे छापलेले असते. कारण आयसोप्रोपाइल अल्कोहोलचा वापर जंतूनाशक म्हणून केला जातो. मद्यनिर्मितीमध्ये या अल्कोहोलचा वापर केल्यास मानवी शरीरास हे मद्य अपायकारक ठरू शकते. मिथेनॉल हे एक सेंद्रिय संयुग असून त्यातील क्रियात्मक गट अल्कोहोल आहे. त्याला लाकूड अल्कोहोल असेही म्हणतात कारण ते लाकूड ऊर्धपातनचे उपउत्पादन आहे, ते वारंवार इंधन म्हणून आणि अँटीफ्रीझ आणि सॉल्व्हेंट्स यांसारख्या उत्पादनांमध्ये वापरले जाते.

मिथेनॉलचे सेवन केल्यास काय होते?

मेथेनॉल उद्योगासाठी असलेल्या ‘मेथेनॉल इन्सिटट्यूट’ या जागतिक व्यापर संघटनेने सांगितले की, केवळ २५ ते ९० मिलिलिटर मिथेनॉल प्राशन केले तर लवकर वैद्यकीय उपचार न केल्यास अपायकारक ठरू शकते. मिथेनॉल प्राशन केल्याचे समजल्यानंतर तात्काळ वैद्यकीय उपचाराची आवश्यकता असते. अमेरिकेतील ‘सेंटर फॉर डिसीज कंट्रोल’च्या म्हणण्यानुसार मिथेनॉल विषबाधामुळे डोकेदुखी, चक्कर येणे, मळमळ, उलट्या, अंधूक दृष्टी अशी अनेक लक्षणे दिसून येतात. त्यासह चेतना कमी हाेणे आणि शुद्ध हरपणे अशीही लक्षणे दिसून येतात. ब्रिटनच्या लीड्स विद्यापीठातील विषविज्ञान तज्ज्ञ ॲलिस्टर हे यांनी सांगितले की, मिथेनॉलची प्रतिक्रिया प्रत्येक व्यक्तीमध्ये भिन्न असते. काही व्यक्तींमध्ये अधिक सहन करण्याची क्षमता असते. कारण आपल्या सर्वांमध्ये एन्झाईम्सच्या डिटॉक्स क्षमतेमध्ये परिवर्तनशीलता आहे. मात्र तरीही मिथेनाॅलचे सेवन अपायकारकच असते.

हेही वाचा : किम जोंग उनचे सैन्य रशियाच्या मदतीला; याचा काय परिणाम होणार? कोण आहेत सैन्याचे नेतृत्व करणारे जनरल किम योंग बोक?

मिथेनॉल मद्यामध्ये का वापरतात?

अवैध मद्यनिर्मिती करणारे आणि मद्यविक्री करणारे मिथेनॉल अल्कोहोलचा वापर करतात. कमी पैशात अधिक नशा देणारे हे मद्य असल्याने अट्टल मद्यपींना त्याची भुरळ पडते. इथेनॉल असलेले मद्य अधिक किमतीची असल्याने, त्याशिवाय त्यासाठी कर भरावा लागत असल्याने पैसे वाचविण्यासाठी नियमांचे उल्लंघन करून मिथेनॉल असलेली मद्ये तयार केली जातात. बहुधा अविकासित देशांमध्ये अशा प्रकारच्या मद्याची निर्मिती केली जाते. कठोर नियंत्रणाशिवाय घरगुती मद्यनिर्मिती करणारे मिथेनॉल अल्कोहेाल असणारे मद्य तयार करतात.

हेही वाचा : विश्लेषण : दिल्लीतील भीषण प्रदूषणास बाजूच्या राज्यांतील शेती कशी कारणीभूत? कृषी कचरा जाळण्याची गरज तेथील शेतकऱ्यांना भासते?

मिथेनॉल विषबाधा कशी टाळता येईल?

मिथेनॉल अल्कोहोल असलेली मद्ये पिऊ नका हेच याचे उत्तर असेल. मात्र ही मद्ये रंगहीन, गंधहीन आणि चवहीन असल्याने ती ओळखणे एक आव्हान असू शकते. लाओसच्या विषबाधानंतर जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, ब्रिटनच्या परराष्ट्र कार्यालयाने फक्त परवानाधारक दारूच्या दुकानांमधूनच मद्य खरेदी करण्याची शिफारस केली आहे. परवानाधारक बार आणि हॉटेलमधूनच पेये खरेदी करा, मद्य खरेदी करताना चौकशी करा, बाटलीचे झाकण तपासून घ्या आणि बाटलीवरील मुद्रण गुणवत्ता आणि लेबल तपासा, असे ब्रिटनच्या परराष्ट्र कार्यालयाने सांगितले. कारण काही बाटल्यांवर खराब मुद्रण गुणवत्ता किंवा चुकीचे स्पेलिंग असलेले लेबल असते, असे त्यांनी सांगितले. मोफत किंवा कमी किमतीच्या मद्य पेयांपासून सावध राहा, असा इशारा देण्यात आला आहे.

sandeep.nalawade@expressindia.com

Story img Loader