आजकाल सोशल मीडिया आणि त्यावर चालणारा हॅशटॅग याचा जोर इतका वाढला आहे की, अगदी कोणतीही गोष्ट किंवा व्यक्ती झटक्यात व्हायरल होऊ शकतो. याचंच एक उदाहरण म्हणजे जानेवारीच्या सुरुवातीला काही भारतीयांनी एक्सला सुरू केलेला #बोयकॉटमालदीव हा हॅशटॅग इतक्या व्यापक स्वरूपात वापरण्यात आला की, पसंतीचे ठिकाण असलेल्या मालदीवला जाणे भारतीय पर्यटक टाळू लागले. मालदीवला जानेवारीमध्ये जाणाऱ्या अनेक पर्यटकांनी आपल्या बुकिंग रद्द केल्या.

बोयकॉट मालदिव हॅशटॅग प्रत्यक्षात किती प्रभावी आहे? आणि महत्त्वाचे म्हणजे मालदीवमध्ये निर्माण झालेल्या या परिस्थितीला राजकीय वाद कारणीभूत आहे का?

Indian Cyber Slaves Rescued In Cambodia Cyber scam
नोकरीच्या आमिषाने कंबोडियात ६०० हून अधिक भारतीयांना केले ‘सायबर स्लेव्ह’; सुटकेसाठी प्रयत्न सुरु
How is the tourism sector in cities in Europe
पर्यटकांनो परत जा… बार्सिलोनाचे लोण इतर युरोपियन शहरांत? अतिपर्यटकांचा फटका? 
Navi Mumbai, Vashi Sector 9, Park encroachment, Navi Mumbai municipal Authorities, Encroached Park Spaces in navi Mumbai, CIDCO redevelopment,Municipal Corporation, Property Department, Urban Planning, Godrej Developers,
नवी मुंबई : टॉवरच्या आडून उद्यानांवर घाला? गिळंकृत झालेली उद्याने मिळविण्यासाठी महापालिकेची धडपड
Bombay High Court, Demolition of 41 Unauthorized Buildings in Nalasopara, High Court Orders Demolition of 41 Unauthorized Buildings Nalasopara, Displacing 2000 Families, vasai, virar, latest news, loksatta news, nalasopara news
सर्वसामान्य माणसांचेच मरण….
guard at the ozarde waterfall brutally beaten up by nine drunken tourists from karad
बंदी असलेल्या पर्यटनस्थळावर सोडण्यासाठी मद्याधुंद पर्यटकांची चौकीदारास मारहाण, साताऱ्यातील ओझर्डेतील घटना
Indian passports to 42 Bangladeshis through forged documents Pune news
बनावट कागदपत्रांद्वारे ४२ बांगलादेशींकडे भारतीय पारपत्र; दलालांचा शोध सुरू
European tracking device, vultures,
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील १० पांढऱ्या गिधाडांना युरोपातील ट्रॅकिंग डिव्हाईस!
Mumbai, Inspection, new buildings,
मुंबई : नव्या इमारतींची आयआयटीकडून तपासणी, ताबा घेतलेल्या म्हाडाच्या २०७ पैकी ९६ घरांमध्ये बदल

भारतीय पर्यटकांनी फिरवली पाठ

मालदीवमध्ये प्रवास करणाऱ्या भारतीय पर्यटकांची संख्या कशी कमी झाली आहे हे जाणून घेण्याआधी, या लहान द्वीपसमूहात नेमके कोणते पर्यटक येतात हे जाणून घेऊया. मालदीवची अर्थव्यवस्था मुख्यत्वे पर्यटनावर अवलंबून आहे. जागतिक बँकेच्या मते, मालदीवच्या अर्थव्यवस्थेचा अंदाजे एक तृतीयांश भाग पर्यटनावर अवलंबून आहे.

या पर्यटनापैकी २०२३ मध्ये या बेटाला भेट देण्यात इतर देशांतील दोन लाखांहून अधिक पर्यटकांमध्ये भारत हा सर्वोच्च देश होता. याचा अर्थ असा की, इतर देशांतील पर्यटकांपेक्षा भारतातील पर्यटक मालदीवला जास्त भेट द्यायचे. भारतासह रशिया, चीन, युनायटेड किंगडम आणि जर्मनी हे इतर प्रमुख पाच देश आहेत, ज्यातून लोक मालदीवमध्ये पर्यटनासाठी गेले.

मात्र, यावर्षी जानेवारीमध्ये परिस्थिती बदलल्यामुळे हे चित्र बदलले. मालदीवच्या पर्यटन मंत्रालयाने सामायिक केलेल्या आकडेवारीनुसार, २८ जानेवारीपर्यंत १३,९८९ पर्यटकांनी मालदीवला भेट दिली. एकूण १,७४,४०० पर्यटकांपैकी, द्वीपसमूह राष्ट्राच्या आठ टक्के पर्यटन बाजारपेठेसह पाचव्या स्थानावर घसरले. जानेवारीच्या पहिल्या २८ दिवसांत द्वीपसमूहात सर्वाधिक पर्यटक आलेले देश रशिया (१८,५६१), इटली (१८,१११) आणि चीन (१६,५२९) होते.

डिसेंबर २०२३ मध्ये तुलनात्मकदृष्ट्या मालदीवमध्ये १,७४,४१६ रशियन पर्यटकांच्या येण्याने २४.१ टक्के बाजारपेठेसह रशिया पहिल्या स्थानावर होता. १,६१,७५१ पर्यटक आणि २३.४ टक्के आकडेवारीने भारत दुसऱ्या क्रमांकावर होता. मालदीवमधील टूर ऑपरेटर्सनीदेखील भारतीय पर्यटकांच्या या द्वीपसमूहाकडे कमी होणारा हा कल लक्षात घेतला आहे. मालदीव गेटवेज या मालदीवमधून कार्यरत पर्यटन कंपनीचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक अखमीम रज्जाक यांनी ‘द प्रिंट’ला सांगितले की, गेल्या काही महिन्यांत भारतीय पर्यटक कमी होत आहेत.

“भारतीय पर्यटक मालदीवमध्ये दोन विभागांमध्ये प्रवास करतात – लक्झरी आणि स्थानिक पर्यटन. उच्च पगार असलेल्या लक्झरी पर्यटकांची संख्या स्थिर होती, मात्र नंतर यात घसरण दिसली आहे”, असे रज्जाकने ‘द प्रिंट’ला सांगितले. “अलीकडच्या काळात कुठले बुकिंग रद्द करण्यात आलेले नाही, परंतु नवीन बुकिंगमध्ये नक्कीच मंदी आली आहे.” रज्जाक यांच्या विधानांना भारतीय टूर ऑपरेटरनेही संमती दर्शवली. यापूर्वी त्यांनीही नोंदवले होते की, मालदीवमध्ये विद्यमान बुकिंग रद्द केले जात नाही, बुकिंगमध्ये पूर्वीपेक्षा घट पाहायला मिळाली आहे.

काहींसाठी, डेटा दुसरा नमुनादेखील सूचित करतो. खरं तर काही भू-राजकीय तज्ज्ञांनी डेटा पाहिल्यानंतर असे मत व्यक्त केले आहे की, हे बीजिंगच्या मुत्सद्देगिरीचा विजय म्हणून पाहिले जाऊ शकते. कारण चिनी पर्यटकांच्या वाढीचा संबंध अध्यक्ष मुइझ्झू यांच्या अलीकडील भेटीशी जोडला जाऊ शकतो. त्यांच्या भेटीदरम्यान मुइझ्झू यांनी त्यांचे चिनी समकक्ष शी जिनपिंग यांना माले येथे अधिक पर्यटक पाठवण्याची विनंती केली. “कोविडपूर्वी चीन ही आमची (मालदीवची) प्रथम क्रमांकाची बाजारपेठ होती आणि चीनला हे स्थान पुन्हा मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न तीव्र करावेत, अशी माझी विनंती आहे,” असे त्यांनी तेव्हा उद्धृत केले.

बोयकॉट मालदीव वाद काय होता?

बहुतेक लोक मालदीवमध्ये भारतीय पर्यटकांची घट झाली असण्याला दोन्ही देशांमधील अलीकडच्या राजनैतिक वादाला कारणीभूत ठरवतात. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपला प्रवास करून तेथील नैसर्गिक सौंदर्याची प्रशंसा केली, तेव्हाच या वादाला सुरुवात झाली. तथापि, पंतप्रधानांच्या भेटीमुळे मालदीवच्या काही अधिकाऱ्यांमध्ये नाराजी पसरली. या अधिकाऱ्यांनी मोदींच्या लक्षद्वीप येण्याच्या आवाहनाला मालदीववरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न समजले.

जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लक्षद्वीपला भेट. (छायाचित्र संग्रहित)

मालदीवच्या मंत्रिमंडळातील उपमंत्री मरियम शिउआना यांनी मोदींना “इस्रायलची कठपुतली” आणि एक्सवर “विदूषक” असे संबोधले. त्यांचे इतर दोन सहकारीदेखील यात सामील झाले आणि त्यांनी पंतप्रधान आणि भारतीयांबद्दल अपमानास्पद टिप्पण्या पोस्ट केल्या, ज्यामुळे हा वाद अधिक चिघळत गेला.

या पोस्ट नंतर हटवल्या गेल्या आणि तीन अधिकाऱ्यांना निलंबित केले गेले. यावरून असे लक्षात आले की, या टिप्पण्यांमुळे मालदीवचे नुकसान झाले. या टिप्पण्यांमुळे भारतीय संतप्त झाले आणि त्यांनी मालदीववर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले. अनेक सेलिब्रिटीज, ज्यांच्यासाठी मालदीव हे सुट्टीचे पसंतीचे ठिकाण आहे, त्यांनीही या वादात उडी घेतली आणि लोकांना भारतातील ठिकाणांना भेट देण्यास सांगितले. अभिनेते अमिताभ बच्चन यांनी एक्सवरील एका पोस्टमध्ये लक्षद्वीपच्या पर्यटनाला प्रोत्साहन दिले, तर अक्षय कुमारनेदेखील यावर आपले मत जाहीर केले आणि लक्षद्वीपला निवडण्याचे आवाहन केले.

देशातील आघाडीच्या ऑनलाइन ट्रॅव्हल प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या ‘ईझ माय ट्रीप’ ने मालदीवसाठी कोणतेही बुकिंग स्वीकारले जाणार नाही असे घोषित केले. तेव्हा या बहिष्काराला आणखी खतपाणी मिळाले. मात्र, त्यानंतर त्यांनी आपली भूमिका बदलून बुकिंग स्वीकारले. अनेकांसाठी मालदीवच्या अधिकाऱ्यांच्या टिप्पण्यांचा परिणाम असलेला बहिष्कार भारत आणि मालदीव यांच्यातील बिघडत चाललेल्या संबंधाला कारणीभूत असू शकतो.

मालदीवचे नवे अध्यक्ष मोहम्मद मुइझ्झू, जे गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये निवडून आले होते, ते कट्टर चीन समर्थक म्हणून ओळखले जातात आणि यामुळे चीनकडे त्यांचा झुकाव जास्त आहे. या वादानंतर त्यांनी भारतविरोधी मोहीम हातात घेतली. भारताला देशातून आपले सैन्य मागे घेण्यास सांगितले. पूर्वी मालदीवला नवी दिल्लीने रडार स्टेशन आणि पाळत ठेवणारी विमाने यांसारखी उपकरणे पुरवली होती आणि त्यांची देखभाल करण्यासाठी सुमारे ७० कर्मचारी तैनात केले होते.

मालदीवला भारतीय पर्यटक भविष्यात भेट देतील का?

बहुतेक जण सहमत आहेत की, प्रामुख्याने मालदीववर टाकण्यात आलेल्या बहिष्कारामुळे भारताच्या पर्यटकांची संख्या इथे कमी होत आहे. काहींचा असा विश्वास आहे की, यामागे आणखी एक घटक आहे. मालदीवमधील काही टूर ऑपरेटर्सचे म्हणणे आहे की, भारतीय प्रवाशांसाठी इतर जागतिक बाजारपेठा खुल्या झाल्यामुळे भारतीय संख्येत घट झाली आहे.

हेही वाचा : आता समुद्राशिवाय तयार होणार ‘सीफूड’; प्रयोगशाळेत तयार होणारे मासे म्हणजे नक्की काय? वाचा सविस्तर

हेही लक्षात घ्यायला हवे की, अलीकडच्या काळात केनिया, इंडोनेशिया, थायलंड, मलेशिया, श्रीलंका असे अनेक देश भारतीयांना व्हिसा मुक्त प्रवासाची परवानगी देत आहेत. अजून काही देश आहेत, जे भारतीयांसाठी प्रवास अधिक सुलभ बनवत आहेत. या पार्श्वभूमीवर, भारतीय पर्यटक मालदीवऐवजी इतर ठिकाणांची निवड करत असल्याचीही शक्यता आहे.